आले! आले!! आले!!!
यंदा परत एकदा 'मायबोली' टीशर्ट आले!
मधले एक वर्ष मायबोलीकरांना टी-शर्ट विना करायला लागलेल्या विरहाचे आनंदात रुपांतर करायला यंदा परत एकदा 'मायबोली टीशर्ट' आणि त्याबरोबरच 'मायबोली बॅग' उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
ह्या वर्षाच्या सुरुवातीला गाजलेल्या मायबोली शीर्षक गीतातील दोन ओळी यंदा टी-शर्ट वर असणार आहेत.. आणि त्याचे सुलेखन केले आहे पल्लीने.
गेल्या काही वर्षातील वाढती मागणी लक्षात घेऊन यंदा तीन प्रकारात टी-शर्ट असणार आहेत.
१. खिश्यासहीत कॉलर टी-शर्ट. (चारकोल रंग)
२. राऊंडनेक टी-शर्ट (चारकोल रंग)
३. महिलांसाठी व्ही-नेक टी-शर्ट (मोरपंखी रंग)
४. बॅग
बॅगचा आकार - ९ इंच X ७ इंच X ४ इंच. बॅग खांद्यावर घेता येईल अशा पाऊच सारखी आहे.
राऊंडनेक व व्हीनेक टी-शर्ट वर पुढे सुलेखन असेल, डाव्या बाहीवर मायबोलीचा लोगो असेल आणि मागच्या बाजूला मायबोलीचा वेबसाईट अॅड्रेस असेल.
खिश्यासहीत कॉलर टी-शर्ट वर खिश्यावर मायबोलीचा लोगो असेल आणि मागच्या बाजूला मायबोलीचा वेब अॅड्रेस असेल.
लहान मुलांसाठी राऊंडनेक चारकोल रंगाचे आणि व्ही-नेक मोरपंखी रंगाचे टीशर्ट उपलब्ध आहेत.
लहान मुलांच्या टीशर्टसाठी अंदाजे साईज.
वय वर्षे १-२ साठी --> २२
वय ३-४ साठी --> २४
वय ५-६ साठी --> २६
वर ७-८ साठी --> २८
वय ९-१० साठी --> ३०
वय ११-१२ साठी --> ३२
आणि तिथून पुढे रेग्युलर साईज
(हे फक्त एक कोष्टक आहे जे शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मुलगा प्रत्यक्षात कसा आहे त्यानुसारच ऑर्डर नोंदवा.)
खिश्यासहीत कॉलर टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु.३५०/-
राऊंड नेक व लेडिज टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु.२५०/-
लहान मुलांच्या टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. २००/-
आणि बॅगची देणगीसह किंमत असेल रु.२५०/-
(महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टाच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.)
यंदाची देणगी प्रगती प्रतिष्ठान, जव्हार ह्या संस्थेस देण्यात येणार आहे. प्रगती
प्रतिष्ठानबद्दल आधिक माहिती पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.
टीशर्टांचे पैसे भरण्याची माहिती थोड्याच दिवसात देण्यात येईल. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टाची ऑर्डर नोंदवायची, कारण ४ जुलै, २०१३ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.
ऑर्डर कशी नोंदवाल?-
इथे टिचकी मारुन
ऑर्डर फॉर्म मध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी वेगळा साईज असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
साईज-------रुंदी(2 L)-------उंची(H)
XXL-------46"-------33"
XL -------44"-------31.5"
L -------42"-------30"
M -------40"-------28.5"
S -------38"-------27"
XS -------36"-------25.5"
XXS-------34"-------24"
फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टी-शर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात टोटल हवे असलेले टी-शर्ट लिहायची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या मेलबॉक्स मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंक मधे बघितल्यास बघता येईल.
महत्त्वाचे-
१. टीशर्ट 'राऊंड नेक' प्रकारचे आहेत. हे टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे-मुंबई आणि नाशिक मधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे -
२. हिमांशु कुलकर्णी -
हे टीशर्ट आपल्याला आपल्या वर्षाविहारापर्यंत मिळणार आहेत!! वविला सर्व मायबोलीकर हे टीशर्ट घालून आले, तर काय धमाल येईल, कल्पना आली ना? तर, झटपट ऑर्डर नोंदवा.
टीशर्टचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना
पुणे , मुंबई आणि नाशिक येथे ७ जुलै २०१३ या एकाच दिवशी टीशर्टचे पैसे जमा केले जातील.
टीशर्टचे पैसे जमा करण्याचे ठिकाण,दिवस आणि वेळ खालीलप्रमाणे:-
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकच्या मायबोलीकरांनी पैसे भरण्यासाठी मायबोली आयडी विदिपा म्हणजेच विजय दिनकर पाटील यांच्याशी ९८८१४९७१८७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा.
नोंदणी केलेल्यांचे पैसे ७ जुलैच्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.
टी शर्टस मिळण्यासंदर्भातली सूचना:-
टी शर्टस मिळण्याचे ठिकाण, तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे:-
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - इथला तपशील लवकरच देण्यात येईल.
ज्यांनी पोस्टाने टीशर्टस मागवले आहेत त्यांना पोस्टेज खर्चाची माहिती लवकरच मेलने पाठविण्यात येईल. आणि ७ जुलैच्या आत त्यांचे टी शर्ट+पोस्टेजचे पैसे आले असतील तर त्यांना २१ जुलै नंतर टीशर्टस पाठविले जातील. टी शर्ट पाठविल्यावर तशी त्यांना संयोजकांकडून मेलही करण्यात येईल.
लोकहो, टी शर्ट संदर्भात काही चौकशी करायची असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.
अत्यंत महत्त्वाची सूचना - ऑनलाईन पैसे भरणार्यांनी कृपया नवीन ऑर्डर्स करु नयेत. कारण योग्य वेळेत म्हणजेच ७ तारखेपर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही..
प्रत्यक्ष पैसे भरणारे अजूनही ऑर्डर बुक करु शकतात. त्यांच्यासाठी ऑर्डर नोंदविण्याची मुदत ६ जुलै पर्यंत करण्यात आलेली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.
ऑर्डर केली, (स्पॅममधे) मेल
ऑर्डर केली, (स्पॅममधे) मेल आली.
टीशर्ट मुंबईला लाडकी उर्फ लीनाकडे द्यावेत. पैसेदेखील तिच्याचकडून घ्यावेत. धन्यवाद.
ऑर्डर केली आहे. मेल आली आहे
ऑर्डर केली आहे.
मेल आली आहे
नोंदणी केली आहे..
नोंदणी केली आहे..
मेल आली आहे. (माल कलेक्ट
मेल आली आहे. (माल कलेक्ट करण्यासाठी कुणाला पकडावे यंदा )
भ्रमा मला पकड
भ्रमा मला पकड :p
भ्रमा, स्वतःलाच पकडावे आणि २१
भ्रमा, स्वतःलाच पकडावे आणि २१ जुलै, २०१३ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता शिवाजीपार्कात उद्यान गणेशापाशी आणून पोचवावे. आणि इतकी वर्ष टांग मारल्याचे प्रायश्चित्त म्हणून तिथे उपस्थित सर्वांना वडापाव-भजीपाव खाऊ घालावा.
मीही ऑर्डर केली आहे. ईमेल
मीही ऑर्डर केली आहे. ईमेल सुध्दा आली आहे.
पैसे भरण्यासाठी ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे.. पुढचे डिटेल्स कसे/कधी मिळतील?
ऑर्डर केली आहे. ईमेल पण आली
ऑर्डर केली आहे. ईमेल पण आली आहे. ऑनलाइनचा पर्यायाचे डिटेल्सचा ईमेल येणार का?
मीही नाव नोंदवले आहे.
मीही नाव नोंदवले आहे.
आज सकाळ पर्यंत ऑर्डर
आज सकाळ पर्यंत ऑर्डर नोंदविलेल्या सर्वांना ऑनलाईन पेमेंट संदर्भातील पुढची मेल पाठविण्यात आलेली आहे.
भ्रमा मला पकड >> म्हंजे यंदा
भ्रमा मला पकड >> म्हंजे यंदा भ्रमाच्या टीशर्टचा मानकरी इंद्रा होणार..
म्हंजे यंदा भ्रमाच्या
म्हंजे यंदा भ्रमाच्या टीशर्टचा मानकरी इंद्रा होणार. >>>> भ्रमात राहु नका .....
Himashuchya accountla paise
Himashuchya accountla paise transfer kele aahet. Himya/Tshirt Samiti kRupaya poch dene.
लाडकीला कुनीतरी फोन करून कळवा
लाडकीला कुनीतरी फोन करून कळवा रे. गटगची माहिती तिला अवश्य द्या.
पैसे ट्रान्सफर केले...स्रीन
पैसे ट्रान्सफर केले...स्रीन शौट सुध्दा इमेल केला आहे....
टि शर्ट समिती, एक ईमेल पाठवला
टि शर्ट समिती, एक ईमेल पाठवला आहे. बघाल का?
.स्रीन शौट- म्हणजे काय तो
.स्रीन शौट- म्हणजे काय तो कसा इ मेल करायचा ??
@ किरणकुमार >> स्क्रीन शॉट
@ किरणकुमार >> स्क्रीन शॉट आहे ते.. टायपिंग चूक झाली. टी शर्ट समिती तुमची पोच ईमेल मिळाली...धन्यवाद..
ऑर्डर नोंदवली आहे. ईमेल पण
ऑर्डर नोंदवली आहे. ईमेल पण आली आहे. ऑनलाइन पेमेंट्च्या डिटेल्सचा ईमेल येणार का?
ऑनलाइन पेमेंट्च्या डिटेल्सचा
ऑनलाइन पेमेंट्च्या डिटेल्सचा ईमेल येणार का?...>>> हो. टी-शर्ट समितीकडुन ईमेल येईल.
टीशर्ट / ब्याग बुक केले
टीशर्ट / ब्याग बुक केले म्हणजे वविला यायलाच पाहिजे असे कम्पल्शन आहे का?
रच्याकने, सध्या तरी मी एक टीशर्ट (कॉलर-खिसावाला) अन एक ब्याग बुक् केली आहे.
मी आधी ४ टिशर्ट ची ऑर्डर दिली
मी आधी ४ टिशर्ट ची ऑर्डर दिली आहे. त्याचे इमेलीने कन्फर्मेशनही आलेय
आज मला अजून एक ओर्डर करायच आहे, तर करू देत नाहिये
दक्षिणा, ऑर्डर फॉर्म उघडून
दक्षिणा, ऑर्डर फॉर्म उघडून 'संपादन'वर क्लिक कर, ऑर्डरमधे बदल आणि सेव कर.
बदल केलेल्याचं कन्फर्मेशन येणार नाही.
मंजूडे धन्यवाद. केलं
मंजूडे धन्यवाद. केलं
लिंब्या अॅडव्हेंचरस खेळ
लिंब्या
अॅडव्हेंचरस खेळ खेळायच्येयत ना!
ई मेल मिळाली.पैसे आज ऑनलाईन
ई मेल मिळाली.पैसे आज ऑनलाईन भरते.टी शर्ट आणि बॅग आयडु ठाण्यातुन कलेक्ट करेल.धन्यवाद
मी टिशर्ट बुक केलेत पण मी
मी टिशर्ट बुक केलेत पण मी वविला येणार नाहीये.
असे अनेक जण आहेत की.
मल व्ही नेक वेगळ्या साईझ चे २
मल व्ही नेक वेगळ्या साईझ चे २ टी-शर्ट, नोंदवायचे होते. मग मी साईझ , कॉमा देवुन लिहिली आहे. चालेल का?
मी १ व्ही-नेक टी-शर्ट आणि एक
मी १ व्ही-नेक टी-शर्ट आणि एक बॅग यांचे रु.५०० बागुलबुवाकडे (अमित देसाई) दिलेले आहेत.
मी सुद्धा माझे २ टी-शर्ट्स (१
मी सुद्धा माझे २ टी-शर्ट्स (१ कॉलरवाला ग्रे आणि १ व्ही नेक), १ बॅग आणि वविचे पैसे बागुलबुवाकडे (अमित देसाई) दिले आहेत.
Pages