दालचीनी चा वजन/ चरबी कमी करण्यासाठी उपयोग

Submitted by तनुदि on 2 July, 2013 - 13:44

दालचीनी चा वजन/ चरबी कमी करण्यासाठी उपयोग होतो असे नेट वरुन समजले. या बद्दल कोणाला माहिती आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दालचीनीवजन/ चरबी कमी करण्यासाठी उपयोग माहिती नाहित . पण लिंबू दररोज पाण्यामधून घेतले तर उपयोग होतो.
अंतरजालावर कुठे वाचले हे पण सांगितले तर बरे, म्हणजे WEBMD इत्यादि असेल तर, विश्वास ठेवता येईल .
खर तर, दररोज थोडसं चालता आले तर जास्त चागले .

गोड खाण्याची इच्छा झाल्यास दालचिनी किंवा व्हॅनिला यांचे ऑइल/इसेन्स/एक्स्ट्रॅक्ट चा वास घेतल्याने गोड खाण्याची इच्छा मरते (कमी होते) असे वाचले/ऐकले आहे.

म्हणजे गोड कमी खल्ले तर वजन कमी होइलच ना Wink

वजन्/चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहार (+ हाता-तोंडावर ताबा), नियमित आणि योग्य व्यायाम आणि शांत डोकं (व्यवस्थित झोप आणि स्ट्रेसफ्री रहाणे) हे सगळ्यात महत्वाचे Happy

हे सर्व कसे जुळवुन आणायचे याचेच जास्त टेंन्शन येते ते सोडाच Lol

माझे वजन ६ महिन्यांपुर्वी ७५ किलो होते आता ५८ किलो आहे. एका आयुर्वेदीकमध्ये डीग्री घेतलेल्या डॉक्टर कडे कन्स्ल्ट केले होते. १० दिवस पंचकर्म केले होते आणि पुढील पथ्य काटेकोरपणे पाळले.
(ते केरला वाले डॉक्टर्स आणि त्यांची औषधे काही माझ्या कामी आले नाहीत.)

रोज सकळी १ तास चालणे.

वजन कमी करण्यासाठी : -
पुढील पदार्थ पुर्ण पणे खायचे बंद करावेत : - बटाटा , भात, गहु (भात आणि गव्हाच्या जागी फक्त ज्वारीची भाकरी खाउ शकता, त्यामुळे अशक्तपणा येत नाही) , सर्व बेकरी पदार्थ (केक , ब्रेड , बिस्किटे, खारी बिस्किटे , टोस्ट , बटर) , सर्व आंबवलेले पदार्थ ( दही , ताक, ईडली , डोसा, उतप्पा ) , सर्व बेसनाचे पदार्थ , मुग वगळता बाकी सर्व कडधान्ये वर्ज्य , लोणचे , उडदाचे पापड , पनीर, चीझ , बटर , मैदयाचे पदार्थ , चिंच (चिंचेच्या जागी कोकम (आमसुले) , लिंबु , टोमॅटो वापरु शकता) , वांगी, गवार, सोयाबीन, मश्रुम्स , तुप, नारळ, शेंगदाणे, तळलेले पदार्थ , कोबी , चिकन, मटन, अंडी, नुडल्स , पास्ता, कोल्डड्रिन्क्स , गोड पदार्थ पुर्ण बंद , साखरे ऐवजी गुळाचा वापर करु शकता. शक्यतो केमिकल विरहीत गुळ वापरा.

(अजुन काही राहीले असेल तर पुढे लिहिन)

पुढील पदार्थ खाउ शकता : दोन्ही वेळ - ज्चारीची भाकरी , भाज्या : - पालेभाज्या , भोपळा, सुरण , दुधी , तोंडली , मुगाची डाळ , मुगाची भाजी , शेवग्याच्या शेंगा , ज्वारीचे पिठले , टोमॅटोची भाजी , पडवळ , ज्वारीचे वेगवेगळे पराठे (कधी दुधी किसुन घालुन, कधी भोपळा किसुन घालुन, कधी भोपळा कसुरी मेथी घालुन , कधी कांदा लसुण , जिरे घालुन) कधी किसलेला भोपळा, दुधी , कांदा , टोमॅटो, आले लसुण , जीरे घालुन इंस्टंट डोसा. आणि भरपुर मासे पण फक्त कढी (आमसुले आणि टोमॅटो घालुन) , माबोवर कणकेच्या धिरड्यांची रेसिपी आलीये तशीच आख्खे मुग दळुन धिरडी खाल्ली.
फळे (केळी सोडुन)

दोन्ही वेळ - ज्चारीची भाकरी , भाज्या : - पालेभाज्या , भोपळा, सुरण , दुधी , तोंडली , मुगाची डाळ , मुगाची भाजी , शेवग्याच्या शेंगा , ज्वारीचे पिठले , टोमॅटोची भाजी , पडवळ , ज्वारीचे वेगवेगळे पराठे (कधी दुधी किसुन घालुन, कधी भोपळा किसुन घालुन, कधी भोपळा कसुरी मेथी घालुन , कधी कांदा लसुण , जिरे घालुन) कधी किसलेला भोपळा, दुधी , कांदा , टोमॅटो, आले लसुण , जीरे घालुन इंस्टंट डोसा. आणि भरपुर मासे पण फक्त कढी (आमसुले आणि टोमॅटो घालुन) ,
फळे (केळी सोडुन)
>>>>>> हे खायचं की खायचं नाही?

दालचीनी चा वजन/ चरबी कमी करण्यासाठी उपयोग होतो असे नेट वरुन समजले>>> नेटवरच डिटेलमध्ये रेसिपी आहे की ...

उष्णता होऊ शकते दालचिनी अशी उगीचच घेतली तर.

६ महिन्यात - ७५ किलो होते आता ५८ किलो आहे.
एकूण १७ किलो
शक्य असेल तर सांगा कोणता डॉक्टर . अगदी टेम्प करणारे आकडे आहेत हे.

६ महिन्यात - ७५ किलो होते आता ५८ किलो आहे.>>> ग्रेट आकडे. Happy
पण त्याच वेळी बॉडी फॅट पर्सेण्टेजेस मध्ये कसे कसे फरक पडले ते ही आकडे येवु देत.
बोन डेन्सिटी आधी किती होती आता किती आहे ते ही लिहा माहिती असेल तर..

काहि खाण्यासाठी औषधेही दिलेली होती का?

झकासराव -

<<पण त्याच वेळी बॉडी फॅट पर्सेण्टेजेस मध्ये कसे कसे फरक पडले ते ही आकडे येवु देत.
बोन डेन्सिटी आधी किती होती आता किती आहे ते ही लिहा माहिती असेल तर<<>>

हे सगळं चेक केलं नव्हतं , १० डिसेंबर पासुन सुरुवात केली होती. फेब्रुवारी एन्ड पर्यंत ६६ किलो झालं , एप्रिल ५ ला ऑफिस मधे मेडीकल चेकअप झालं तेव्हा वजन ६२ किलो होतं , जुन पर्यंत ५८ किलो झालं आणि काल केलं तेव्हा सुदधा ५८ किलो होतं.

<<<काहि खाण्यासाठी औषधेही दिलेली होती का?>>>>
औषधे म्हणाल तर मिक्स होती. मला अ‍ॅलर्जी च्या सर्दीचा त्रास होता. बी. पी. लो व्हायचा, हातापायाला वळ यायचे . पण सगळ्यासाठी एकच औषध आहे. डिसेंबर पासुन आजपर्यंत यापैकी कुठलाही त्रास जाणवला नाही. साधा ताप ही जाणवला नाही. डिसेंबर पासुन आजपर्यंत एक ही अ‍ॅलोपथीची गोळी घेतली नाही.

मृणाल १ -
<<<शक्य असेल तर सांगा कोणता डॉक्टर . अगदी टेम्प करणारे आकडे आहेत हे.>>>

डॉक्टर जनार्दन पाटील.
चैतन्य आयुर्वेदीक क्लिनीक
डहाणु

पण जास्तीत जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागते. शेवटी आपला तोंडवरचा कंट्रोल महत्त्वाचा आणि आपली शारीरीक मेहनत (व्यायाम) महत्त्वाची.
रोज सुर्यनमस्कार करायला सांगितले होते आणी जेवल्यानंतर लगेचच वज्रासन करायला सांगितले पण ते काही माझ्याच्याने झाले नाही.

मृणाल १ -

दोन्ही वेळ - ज्चारीची भाकरी , भाज्या : - पालेभाज्या , भोपळा, सुरण , दुधी , तोंडली , मुगाची डाळ , मुगाची भाजी , शेवग्याच्या शेंगा , ज्वारीचे पिठले , टोमॅटोची भाजी , पडवळ , ज्वारीचे वेगवेगळे पराठे (कधी दुधी किसुन घालुन, कधी भोपळा किसुन घालुन, कधी भोपळा कसुरी मेथी घालुन , कधी कांदा लसुण , जिरे घालुन) कधी किसलेला भोपळा, दुधी , कांदा , टोमॅटो, आले लसुण , जीरे घालुन इंस्टंट डोसा. आणि भरपुर मासे पण फक्त कढी (आमसुले आणि टोमॅटो घालुन) ,
फळे (केळी सोडुन)

इतकं केलं तरी खुप फरक पडेल. पण आपल्या तोंडवरचा कंट्रोल महत्त्वाचा. एकदा खाल्लं तर चालतं हा अ‍ॅटीटयुड ठेवायचा नाही, मित्रमंडळी , नातेवाईकांच्या सांगण्यावरुन खाल्लं तर नुकसान आपलंच. ब-याचदा मित्रमंडळी , नातेवाईक जेलसीमुळे सुद्धा खायला लावुन आपला नियम तोडायला लावतात कारण त्यांना स्वत:ला असं करणं जमत नाही. मला मित्रमंडळीचा खुप वाईट अनुभव आला या बाबतीत. माझे सख्खे मित्र म्हणवणा-यांनी माझे मनोबल खचवण्याचा खुप प्रयत्न केला. पण आपली इच्छाशक्ती महत्त्वाची.

बरं थंड आणि नॉर्मल टेंपरेचरच्या पाण्याऐवजी - गरम पाणी प्यावे आणि शिळे अन्न खाउ नये.

रोज सकाळी १ तास चालणे - यात कशामुळेही खंड पडता कामा नये.

आणि मुख्य म्हणजे वजन कमी झालं आता काहिही खाउ शकतो असे करु नका. वजन खुप मुश्किलीने कमी होतं एकदा कमी झालं कि ते मेन्टेन करा.

टकाटक, तुमचं अभिनंदन.. तोंडावर (खाण्याच्याबाबतीत) कंट्रोल ठेवणे सोपे नाही.. एकदम टकाटक Happy

धन्यवाद. मला आता घरचे , मित्रमंडळी आणि नातेवाईक हेच सांगतात. पण मला हे सांगायचे आहे कि आपण मनात आणलं की काहीही होउ शकतं . आपला स्वतः वरचा ताबा आणि आत्मविश्वास महत्त्वाचा. कुणी म्हणाले की तुझ्याच्याने नाही होणार तर हिंमत सोडायची नाही.

आपली इच्छाशक्ती महत्त्वाची.
एकदा खाल्लं तर चालतं हा अ‍ॅटीटयुड ठेवायचा नाही,
आणि मुख्य म्हणजे वजन कमी झालं आता काहिही खाउ शकतो असे करु नका. वजन खुप मुश्किलीने कमी होतं एकदा कमी झालं कि ते मेन्टेन करा ------------
सोला आने सच
पण तिथेच तर घोड अडतंय

टकाटक, अभिनंदन!!!
जरा ते रेसीप्यांचं मनावर घ्या आता अन इकडेच टाका शॉर्ट मधे. >>> +१

टकाटक ..तुला सा.न. ...

images.jpg

मला एक सान्गा --- बिट , फरस बी , परवर , करटोली , फ्लावर , गाजर, मटार , भेन्डी , खायचे का ?

इथे ज्वारी चे पिठ मिळत नाही ह्यावर काही दुसरा उपाय आहे का ?

सुहस्य : धन्यवाद . बिट , फरस बी , फ्लावर , मटार , बंद.

परवर , करटोली , भेन्डी , गाजर खाउ शकता. ज्वारी चे पिठ रेडीमेड मिळत नाही आख्खी ज्चारी घेउन दळा.

दीप्स : रेसिपीज लवकरच टाकण्यात येतील.

टकाटक -- धन्यवाद .... पचकर्मा मुळे किति वजन कमी झाले होते ?

मी कुवेत ला असते म्ह्णुन ज्वारी चे पीठ किवा दळणे सोय नाही . पचकर्म पण सोय नाही ... म्हणुन दुसरा उपाय विचारला ......

>>>> खाल्ले काय ते सांगा. <<<< Lol Lol Lol
(नै त कै मेलं) मी मोठ्या उत्साहाने ते छापुन घेऊन लिम्बीला देणार होतो, पण खायचे काय ते सान्ग अशा तिच्या तिरसटून विचारल्या जाऊ शकणार्‍या संभाव्य प्रश्नाला उत्तर काय द्यावे या बेचैनीमुळे अजुन छापुन घ्यायचे धाडस झाले नाहीये. Proud असो

उपयुक्त माहिती, धन्यवाद.

सुहास्य - ज्चारीच्या पीठाला दुसर पर्याय नाही कारण ज्वारीमुळे आपल्याला भरपुर एनर्जी मिळते. तरीही ज्वारी मिळत नसल्यास गव्हाची चपाती चालेल (पुरी नाही). पण भात टाळा.
पंचकर्म १० दिवसच केले होते. पंचकर्मात बस्ती आणि स्वेदन केले होते. त्यामुळे पोट शुदध झाले. शरीर हलके वाटु लागले.

गीतांजली , दिप्स , मृणाल १ , सुहास्य : - सुरुवात तर करा. जेव्हा जेव्हा नियम मोडाल तेव्हा तेव्हा ह्या धाग्यावर कबुली दयायची. आम्ही सगळे आहोत तुमच्या पाठीशी. पहा नक्की जमेल. ६-७ महीन्यात ८-१० किलो कमी झालं तरी जिंकलात समजा. पण पुढे चालु ठेवा.

टकाटक : अभिनंदन. खूपच अवघड गोष्ट साध्य केलीत.
तुम्ही खाण्याच्या वेळा त्या त्या वेळच्या पदार्थांबरोबरही सांगा. कारण तेही खूप महत्वाचे असेल.

आयुर्वेदामधे खाण्याच्या वेळा आणि त्यावेळचा पदार्थ असे काहि नाही. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण असे असते. शक्यतो ज्याने गॅस होईल असे पदार्थ टाळावेत.

नाश्त्याला - थोडेसे कांदापोहे किंवा ज्चारी चपाती आणि भाजी किंवा ज्चारीचा पदार्थ , फळे (मला शिरा , उपमा, लापशी बंद आहे)
जेवण : ज्चारी चपाती आणि भाजी किंवा ज्चारी चपाती आणि मासे.
पिण्याचे पाणी : - गरम पाणी.

ओढुन ताणुन काहीही करु नका, हसत मुखाने करा, मला वजन कमी करायचंच आहे आणि ते ही माझ्यासाठी असे ठरवुन करा. मी हे खाउ शकत नाही ते खाउ शकत नाही म्हणुन मी बिचारा /मी बिचारी असा विचार करु नका . नो दया , नो सहानुभुती.

मला वाटलं <<काय खाल्लं>>मधे दालचिनी असेल, म्हणून या बाफवर प्रतिसाद टंकला.
'वजन कसे कमी केले' अश्या आशयाचा एक बाफ आहे मायबोलीवर, तिथे असायला हवे टकाटकांचे हे सगळे प्रतिसाद.

वजन वाढवायचे कसे?
वीस वर्षांपूर्वी माझे वजन ४३/४५ च्या दरम्यान होते. (फूऽऽऽ करुन फुन्कर मारली तर उडून जाईल की काय असे बघणार्‍याला वाटावे Proud )
नन्तरच्या पन्धरासोळा वर्षात ते वाढून ५०/५२ पर्यन्त गेले.
२००८ नन्तर आहारविहारविषयक विशिष्ट नियम पाळले अन वजन शूट आऊट होऊन एक वर्षात ५८ च्या पुढे गेले. सध्या ६०/६२ चे दरम्यान अस्ते. पाच फूट आठ इन्च उन्चीला भारतीय हवामानात जास्तीत जास्त किती वजन असावे? मला वजन वाढवायची गरज आहे का? Happy

हा हा हा , limbutimbu जी , तुम्हाला डॉक्टरांशीच कन्सल्ट करावे लागेल. वजन कमी करण्याचा मला जो अनुभव होता तो मी ईथे शेअर केला.

संपादक महाशय

क्रुपया हा धागा बंद करा! हा शुद्ध अन्याय आहे!!

आणी ट्काट्क्जी...काळ्जी घ्या! हे डॉक्टर लोक असेच सांगतात!

यक्ष
(वजनदार अस्सोसिएशन)

वजनः १००+ (!)

टकाटक
तुमची उंची किती?

लिंबाजीराव bmi calculator असे गूगला.
रफली जितके इन्च तितके किलो भरतीय पुरुशाला. स्त्री यतून उणे६-७

मी अस एकलय की दालचीनी मुळे metabolism rate वाढतों म्हणुन हा प्रश्न विचारला होता. पण त्या मुळे
अजुन ही भरपुर माहिती मिळाली.
सगळ्या ना धन्यवाद

Pages