कढीतली कोथिंबीर वडी

Submitted by स्वप्ना_राज on 30 June, 2013 - 04:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ वाटी दही, १ वाटी कोथिंबीर, ४-५ टेबलस्पून भाजलेले बेसन, तेल, तिखट, हळद, जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कांदा, मीठ

क्रमवार पाककृती: 

कढईत तेल गरम करा. त्यात तळून कोथिंबीर कुरकुरीत करा.
ही कोथिंबीर bowl मध्ये घालून त्यात तिखट, हळद, मीठ घाला. ३ चमचे भाजलेले बेसन घाला. पाणी घालून कमी आंचेवर शिजवा.
मग तेल लावलेल्या थाळीत हे मिश्रण थापा. सुरीने वड्या कापा. १० मिनिटं वाफवून घ्या.
pan मध्ये तेल गरम करून त्यात वड्या shallow fry करा.

दही फेटून त्यात पाणी आणि २ चमचे भाजलेले बेसन घाला. नीट एकजीव करा.

तेल गरम करा. त्यात जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कांदा (पातळ लांब) घालून परता.
हळद, तिखट, वरचे दह्याचे मिश्रण, पाणी घालून उकळी काढा.
मीठ, हवं तर साखर घाला.
तळलेल्या कोथिंबीर वड्या घाला.

माहितीचा स्रोत: 
खवय्ये, झी मराठी, ६ एप्रिल, २०११
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी कोथिंबीर तळा, मग तिला शिजवुन घ्या, मग शिजवलेले मिश्रण थापुन, वड्या पाडुन त्या वड्या वाफवा आणि मग परत तळा......

नक्कीच आम्ही सारे खवय्ये मध्ये बघितलेला दिसतोय हा प्रकार.. Light 1

रेसिपी वेगळीच आहे, कढीत घालून मस्तही लागेल पण

>>कढईत तेल गरम करा. त्यात तळून कोथिंबीर कुरकुरीत करा.
ही कोथिंबीर bowl मध्ये घालून त्यात तिखट, हळद, मीठ घाला. ३ चमचे भाजलेले बेसन घाला. पाणी घालून कमी आंचेवर शिजवा.
मग तेल लावलेल्या थाळीत हे मिश्रण थापा. सुरीने वड्या कापा. १० मिनिटं वाफवून घ्या.>>

कोथिंबीर तळायची खरंच गरज आहे का? एरवी आपण कोथिंबीरीत सगळं घालून वाफवतो तसं करुन चालणार नाही का?
तसंच पाणी घालून कमी आंचेवर शिजवा आणि पुन्हा वाफवा??

स्वप्ना, स्वैपाकघरातल्या सगळ्या प्रक्रीया एकाच पाकृमध्ये ठासून बसवल्यात. Proud

कापणे, तळणे, वाफवणे, भाजणे, शिजवणे, शॅलो फ्राय, उकळणे ......

चव चांगली लागत असेल पण कोथिंबीर तळणे आणि बेसन शिजवणे या दोन क्रीया गाळूनही काही फरक पडेल असं वाटत नाही. उलट ताज्या कोथिंबीरीची चव जास्त छान लागेल.

अरे बाप रे! पाकृ केली, चांगली लागली, इतरांना आवडेल म्हणून इथे टाकली. पण इथल्या प्रतिक्रिया बघून उगाच ह्या फंदात पडले असं झालं.

स्वप्ना, प्लीज गैरसमज नको. रेसिपी चांगली आहे आणि चांगलीच लागेल ह्याबद्दल वादच नाही पण जे कोण शेफ आहेत त्यांनी स्वतःचा वेगळेपणा दाखवण्यासाठी उगाच काँप्लिकेटेड केली आहे असं वाटलं. जे काम नेहमीप्रमाणे कोथिंबीर वड्या करुन घेऊन सोप्पं होऊ शकतं त्यात उगाचच कोथिंबीर तळा, शिजवा, पुन्हा वाफवा आणि पुन्हा शॅलोफ्राय करा हे सांगून काम दुप्पट केलं आहे.

कढीमधे बेसनाचे गोळे करतो तसंच आहे हे फक्त कोथिंबीर प्रचंड प्रमाणात वापरावी लागेल. मी तरी ते तळणं मग शिजवणं, वाफवणं आणी शॅलो फ्राय ऐवजी वड्या वाफवून मग कढीत सोडेन. (पण आमच्याकडे अजून कोथिंबीरच मिळत नाहीये) मिळलयावर नक्की करून बघणार.

छान वाटत्येय पाकृ...

करुन बघणार पन विदाऊट कोथिंबीर तळणे बिझनेस.

कोथिंबिरी ऐवजी पालक/मेथी पण छान लागेल Happy

चांगली आहे कि. तेलाची फोडणी करुन त्यात कोथिंबीर परतून मग भिजवलेले बेसन घालून त्याच कढईत शिजवले तर बराच वेळ वाचेल.

पाटवड्यांची कढी करतात तिचीच बहीण वाटते आहे ही. Happy
बाकी अतिरिक्त स्टेप्सबद्दल वर अनेकांनी लिहिलं आहेच.

तळलेली कोथिंबिरवडीच आमच्या घरी लहानपणापासून होते, हे मी पाहिलं अन खाल्लं आहे. पहिलं कोथिंबीर तळणं नाही केलं तर शॅलो ऐवजी डीप फ्राय केली जाते. वडीत कोथिंबीर मुख्य घटक अन बेसन फक्त बाईंडींग पुरते असते.

कढीत घालून कधी खाल्ली नाहीये आजपर्यंत. नेक्ष्ट टाईम काकूंना फर्माईश करणेत येईल.

ती नुसती उकडलेली बेसन जास्त वाली वडी मला अजिब्बात आवडत नाही. तिला कोथिंबिर वडी तरी का म्हणावं असा प्रश्न पडतो. जास्त कोथिंबिर झालेलं वाळलेलं पिठलं खावं तशी लागते ती.

(ता.क. पात्रा या नावाने फेमस असलेल्या अळूवड्या देखिल अशाच करतात. खानदेशात गुजरात बॉर्डरवर फेमस आहेत. अळूच्या पानावर थोडे बेसन पसरून मग ती गुंडाळी वाफविणे, नंतर त्याच्या वड्या कापून तळणे अशी कृती आहे. अळूऐवजी इथे कोथिंबीर आहे इतकेच.)

अहो इब्लिस, वाफवून तळण्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीये. कोथिंबीर आधी तळून, मग मिश्रण शिजवून, मग वड्या पाडून, मग त्या वाफवून मग त्या तळून - या प्रोसेसला आहे.पहिल्या दोन स्टेप्स अनावश्यक आहेत.

कोणत्या ष्टेप हव्या नको ते कळण्या इतका पारंगत बल्लव मी नाही. पण अशा किचकट स्टेपवाले 'निगुतीने केलेले' पदार्थ मला आवडतात. उदा. उकडिचे मोदक Wink तांदळाची पिठी मग उकड मग नारळाचं खवून ते जे काय गूळ घालून करायचं ते, मग हे सगळं एकत्र भरून परत वाफवून देवारे! कठीण आहे, माझ्याच्याने बनवणे होणारच नाही, पण चव कस्ली खल्लास लागते!
तसंच त्या कुरकुरीत कोथिंबीर वडीचे आहे असे म्हटले

इब्लीसांनी सांगितलेल्या उकडीच्या मोदकाच्या रेसिपित पण पॉईंट आहे. तिथेही दोनदा उकडणे आहेच की...त्यांनी सांगितल्यावर लक्षात आले पण उकड कितीही नीट शिजलेली असेल तर मोदक परत वाफवले नाहीत तर कच्चेच लागतात हेही खरेच की.

पण इथल्या प्रतिक्रिया बघून उगाच ह्या फंदात पडले असं झालं.

अगं तुला कुठे नावे ठेवली.. पण अतिशय चटकन शिजणा-या कोथिंबीरीला एवढ्या प्रक्रियेमधुन जायचं दिव्य करायला लावलंय शेफने त्याबद्दल आश्वर्य ...

तु टाक बिन्दास पाकृ.. मुड लागला कि मी ही करेन. Happy

कोबीची तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही बंगाली पध्दतीची भाजी करून पहा. मी केली होती. चांगली झाली. http://www.ecurry.com/blog/indian/curries/dry/cabbage-with-peas-and-potatoes-bandhakopir-torkaari/