बटर चिकन

Submitted by बस्के on 1 July, 2013 - 20:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

५०० ते ७०० ग्रॅम बोनलेस, स्किनलेस चिकन ब्रेस्ट
मोठा चमचा दही
अर्धा चमचा लिंबाचा रस
हळद
२ मोठे कांदे
२ टोमॅटो
६-७ मोठ्या लसूण पाकळ्या
बटर (भरपूर!)
८फ्लु औंझ हेवी व्हिपिंग क्रीमचा छोटा पॅक मिळतो. तो अर्धा तरी लागेल. Happy
५-७ बदाम व ५-६ काजू (गरम पाण्यात अर्धा तास तरी भिजवतठेवावेत)
२-३ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीप्रमाणे
एक चमचा साखर

मसाल्यासाठी:
२-३ तमालपत्रं
६-७ मिरीदाणे
५-६ लवंग
दालचिनी पूड चिमुटभर
वेलदोडा पूड चिमुटभर
एक लाल सुकी मिरची
बदामाची पूड ३-४ मोठे चमचे

हे सर्व भाजून मग वाटून घ्यावे.

क्रमवार पाककृती: 

चिकन स्वच्छ धुऊन, त्याचे बाईट साईझ तुकडे करून त्यावर लिंबाचा रस, हळद, तिखट, मीठ व दही घालून मुरवायला ठेवावे. जेव्हढा जास्त काळ तेव्हढं चांगलंच! (मी कमीत कमी ३०-४० मिनिटं ठेऊन देखील केलेले आहे. पण ४-५ तास ठेवले तर मस्तच!)

पॅनमध्ये तेलात(किंवा बटरमध्ये) लसूण परतायला घ्यावा. तो जरा सोनेरी झाला की त्यात कांदा घालून चांगला भरपूर, कॅरॅमलाईज्ड होईपर्यंत परतावा.
मग त्यात टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत मिश्रण परतवून/शिजवून घ्यावे.
जरा गार झाले की वाटून घ्यावे.

ज्याच्यात चिकन बनवणार आहात त्यात (मनसोक्त) बटर तापवून त्यात मॅरिनेट केलेले चिकन घालावे. थोडंसं हाय फ्लेमवर हलके शिजवावे.. चिकन पांढरटसर दिसू लागले की कांदा-लसूण-टोमॅटोची प्युरी घालावी.
जरावेळाने वाटलेला मसाला घालावा.
२-३ चमचे तिखट, मीठ घालावे. कसूरी मेथी चुरून घालावी.
बदाम-काजूची पेस्ट मिसळवावी. हवा असल्यास ऑरेंज फुड कलरही घालता येईल.
हेवी व्हिपिंग क्रीम अ‍ॅड करावे,
मग झाकण ठेऊन चिकन शिजू द्यावे.

चिकन शिजल्यानंतर चव पाहावी. सर्व मसाल्यांची छान चव आली असेल परंतू गोडूस चव आली नसेल तर थोडीशी साखर घालावी. काजूची पेस्टही वाढवता येईल. वरून एक चमचा मेल्टेड बटर घालावे.

झाले, बटर चिकन तयार!! Happy

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी.
माहितीचा स्रोत: 
कधीतरी २००८ मध्ये रेसिपी शोधली होती. परंतू तेव्हापासून दरवेळेस थोडेफार स्वप्रयोग करून ही फायनल केली रेसिपी...
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी तोंपासू....
माझी खूप ईच्छा होतेय करून खायची पण....
बटर (भरपूर!)
८फ्लु औंझ हेवी व्हिपिंग क्रीमचा छोटा पॅक मिळतो. तो अर्धा तरी लागेल. स्मित
५-७ बदाम व ५-६ काजू ... Sad

धन्यवाद बस्के . आज करुन पाहिल. टेस्ट छान होती. मी क्रीम अवॉइड केला पण त्याने अजुन रीचनेस आला असता. Happy

मस्त आहे रेसिपी.आज करुन बघितलं. सकाळच्या टेस्टिंग चा रिपोर्ट " मस्तं , भारी " असा मिळाला
धन्यवाद बस्के.

स्पेशल धन्यवाद. खुप छान झाले. मी तंतोतंत रेसिपी फॉलो केली. फक्त साय फेटुन वापरली. नान , हे बटर चिकन आणि बिर्यानी मस्त जेवण झाले Happy

अतिशय सुंदर....आजच करुन पाहिले 'खुप खुप छान, सेम्म् हॉटेल सारखी टेस्ट 'असा reply आलाय घरातल्यान् कडून

Pages