पेटण्यास आतुरलेल्या नसानसांच्या वाती....

Submitted by सुप्रिया जाधव. on 30 June, 2013 - 12:45

झिर-मिर तुझ्या स्वप्नांची
रातीला सोबत ठरते
जणू पाते रोमांचांचे
गात्रांवर अलगद फिरते

तो चंद्र अनावर होतो
चांदण्या चित्त गुंगवती
ह्रुदयावर शिंपडलेल्या
स्मृती पुन्हा घमघमती

कल्लोळ तुझ्या श्वासांचा
दरवळतो मानेभवती
पेटण्यास आतुरलेल्या
नसानसांच्या वाती

झुळझुळतो पहाट्वारा
मन चिंब-चिंब पाझरते
थरथरत्या अधरांना या
दव अलगद चुंबून जाते

हे आवर्तन रात्रीचे
बघ असेच उलटून जाते
दिस सरता संपत नाही
होत्याची नव्हती होते

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीर्षक पाहिल्याबरोबर वाटले की गझल आहे की काय...
तो चंद्र अनावर होतो
चांदण्या चित्त गुंगवती
ह्रुदयावर शिंपडलेल्या
स्मृती पुन्हा घमघमती

कल्लोळ तुझ्या श्वासांचा
दरवळतो मानेभवती
पेटण्यास आतुरलेल्या
नसानसांच्या वाती
>>सुपर्ब आहे....!

कल्लोळ तुझ्या श्वासांचा
दरवळतो मानेभवती
पेटण्यास आतुरलेल्या
नसानसांच्या वाती>>>> व्वा!

कविता आवडली.

नसानसांच्या वाती<<< गजब खयाल सुचला आहे.

कविता फार आवडली सुप्रिया. प्रासादिक मांडणी!

(तेवढे शेवटचे विरहाचे जाते दळणे किंचित खटकले)

"पेटण्यास आतुरलेल्या
नसानसांच्या वाती" >>> व्वा !

<<<शीर्षक पाहिल्याबरोबर वाटले की गझल आहे की काय...>>>>

हो, आधी 'नसानसांच्या वाती' असच दिल होत पण मग बदलल !
( आदत से मजबूर ! काय करणार ? Happy )

<<<नसानसांच्या वाती कल्पना सही आहे.>>>
<<<<नसानसांच्या वाती<<< गजब खयाल सुचला आहे.>>>

खरोखर ! आधी हा खयाल सुचला अन मग त्यावरच कविता गुंफली गेली सगळी

<<<<(तेवढे शेवटचे विरहाचे जाते दळणे किंचित खटकले)>>>>

ह्म्न ! नक्की विचार करते यावर बेफिजी.. धन्यवाद!

मनःपुर्वक धन्यवाद सगळ्यांचे .

-सुप्रिया.

अप्रतिम कविता...
आधी हा खयाल सुचला अन मग त्यावरच कविता गुंफली गेली सगळी >>

असेच होते बरेचदा.... आधी शीर्षक सुचते मग त्यावर लेख किन्वा बातमी तयार होते असा माझा दररोजचा अनुभव...
आदत से मजबूर ! काय करणार ? Happy

कल्लोळ तुझ्या श्वासांचा
दरवळतो मानेभवती
पेटण्यास आतुरलेल्या
नसानसांच्या वाती

अत्यंत वेगळी प्रतिमा ..

जान् -कुर्बान कविता
जबरदस्त अपील आहे कवितेत

अख्खीच आवडली पण् हे कडवे ..................

कल्लोळ तुझ्या श्वासांचा
दरवळतो मानेभवती
पेटण्यास आतुरलेल्या
नसानसांच्या वाती <<<<<<<<<< ___/\___

या कवितेचं मस्त गाणं होईल................