Submitted by आनंद पेंढारकर on 30 June, 2013 - 08:47
दूर कोणी नाव घ्यावे पावसाचे
त्या क्षणाला गाव व्हावे पावसाचे
गंध मातीचा शिरे श्वासांमधूनी
दरवळूनी गात्र गावे पावसाचे
तेच दाटे माझिया डोळ्यात पाणी
गोत्र माझेही असावे पावसाचे
ओंजळीने थेंब झेलावे असे की
अंतराला दान जावे पावसाचे
पाखरांचे पंख घ्यावे दूर जावे
चेहऱ्याला रंग ल्यावे पावसाचे
स्पर्श त्याचा माळराने धुंद सारी
हात माझे कां नसावे पावसाचे
ही कुणाच्या चाहुलीने जाग येई
अंगणी पाऊल यावे पावसाचे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे. मतला फारच आवडला.
छान आहे.
मतला फारच आवडला.
चांगली गझल.
चांगली गझल.
बरेच मिसरे आवडले. पुलेशु.
बरेच मिसरे आवडले.
पुलेशु.
तेच दाटे माझिया डोळ्यात
तेच दाटे माझिया डोळ्यात पाणी
गोत्र माझेही असावे पावसाचे
आवडला !!
बाकी अनेक मिसरे (अनेक शेरातील पहिला मिसरा) आवडले
ओंजळीने थेंब झेलावे असे
ओंजळीने थेंब झेलावे असे की
अंतराला दान जावे पावसाचे >>> हा सर्वात विशेष वाटला.
आवडली. सुंदर वाचनानुभव
आवडली. सुंदर वाचनानुभव
छान. -दिलीप बिरुटे
छान.
-दिलीप बिरुटे