जेंव्हा जेंव्हा तुला अशी मनसोक्त भेटले आहे...

Submitted by मुग्धमानसी on 27 June, 2013 - 06:42

जेंव्हा जेंव्हा तुला अशी मनसोक्त भेटले आहे
तेंव्हा तेंव्हा रात्रभर असेच धुके दाटले आहे

पाहिले आहे आभाळाला मी असे उतरताना
तेंव्हा कुठं माहित होतं...? त्याचेही जग फाटले आहे!

तुझे भास कुशीत जपत जागते बापडी निज माझी
तिच्या स्वप्नांत तुझे झाड कुणीतरी छाटले आहे.

कुणीतरी कधीतरी यावे खरेच ढगांमधून
खरं सांगू? मनातल्या मनात मी खूपदा बाटले आहे!

तुझे घरकूल दहा दिशांचे पसरेल तितके पसरू दे
मी तुझ्या या घरात माझे ईवले जग थाटले आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<पाहिले आहे आभाळाला मी असे उतरताना
तेंव्हा कुठं माहित होते...? त्याचेही जग फाटले आहे!> सुरेख..

गझल हा फोर्म चांगला सांभाळलात की
नीज<< असे करावे लागेल बहुधा मात्रांसाठी _फक्त वाट्ते आहे तसे ... तपासलेले नाही
सर्वच द्वीपदी छान !!!

पाहिले आहे आभाळाला मी असे उतरताना
तेंव्हा कुठं माहित होतं...? त्याचेही जग फाटले आहे!

>>> १ नंबर!

आईग्ग्ग्ग्ग!
ऑसम! अप्रतिम!
एकही शेर/कडवं कोट नाही करतेय कारण एखादं कडवं कोट केलं तर माझ्या रसिकतेवर आणि तुझ्या लिखाणावर अन्याय होईल!
लिहीत रहा गं!
संपुर्ण गझल्/कविता आवडली!पुन्हा पुन्हा वाचली Happy

कुणीतरी कधीतरी यावे खरेच ढगांमधून
खरं सांगू? मनातल्या मनात मी खूपदा बाटले आहे!<<<

दुसर्‍या ओळीतील विचार विलक्षण आहे.

कुणीतरी कधीतरी यावे खरेच ढगांमधून
खरं सांगू? मनातल्या मनात मी खूपदा बाटले आहे!

तुझे घरकूल दहा दिशांचे पसरेल तितके पसरू दे
मी तुझ्या या घरात माझे ईवले जग थाटले आहे.

सुर्रेख......निशःब्द!!

Pages