Submitted by किरण कुमार on 24 June, 2013 - 07:45
मजसंगे चालणारी आज बोलली सावली
वाट पाहता पाहता, वाट सरत चालली
भिजलेले दिस सारे निजलेल्या राती
आठवाया लागे कसे ओलेचिंब मोती
बस बिलगोनी अशी माझे काही बोल
हळूवार पार जावे तू ह्रदयात खोल
जरा कुठे तुटली ती शब्दांची माळ
अजूनही रुसवा का, गेला किती काळ
येग सखे धावत तू जोडायाला मन
तुझ्याविना भिकारी मी असुनिया धन
- किकु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी माझ्या कविता ह्या
मी माझ्या कविता ह्या संकेतस्थळावर ठेवण्याचा प्रोसिझर काय आहे?
आवडली
आवडली