एम्बीएच्या निमित्ताने!!!!

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

काल माझी पुतणी मला म्हणाली अंकल १०० चांगले कॉलेज भरावे लागतात ऑनलाईन. एम्बीएच्या प्रवेशासाठी. द्या ना काढून नावे. मी ऑनलाईन उपलब्द्ध असलेली पीडीएफ उघडली. तिच नावे वाचून डोळे पाझरू लागले.

जमनालाल बजाज,
सिडेनहॅम,
चेतना,
लाला लजपतराय,
सोमय्या,
सिम्बी,
भारती विद्यापिठ!

खूप पुर्वी मीही एम्बीएच्या प्रवेशासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यावेळी हे चांगले ठाऊक होते की शेवटी प्रवेश कुठेही मिळाला तरी घरुन पैसे देणारे कुणीच नाही! पण तरीही प्रवेश मिळवून मागे घेतला होता फॉर्म. केवढे दु:ख झाले होते. पण ती वेळ दु:ख पचवण्याची होती. परत नवीन नोकरी पत्करली. अजून मनात जिद्द आहे कधी तरी मी 'अ‍ॅन एम्बीए' होईल.

पुण्याच्या आय एम डी आर कॉलेजमधे मी किती चकरा मारायचो. तिथली खिचडी विकत घेण्यासाठीही दमडी नसायची तेंन्व्हा. पण खूप खूप शिकायच हे एक स्वप्न अजूनही पाठलाग करत आहे. स्वप्न बघायला जात कुणाच!!!!

पिंकु इतकुशी अगदी पहिलीतही नसताना मी बी.ई. ला होतो. आता ती एम्बीए करु पाहत आहे. किती लवकर लवकर मुले मोठी होतात. त्याहीपेक्षा ती बरोबरीची होतात तेन्व्हा अजूनच विस्मय वाटतो.

काल चाय भेटला होता. अर्थात चैतन्य. तो आता अमेरिकेला चालला पुढील महिन्यात एम्बीए करायला. जाता जाता मी जीमॅट देऊन तिकडे ये असेही म्हणाला. फक्त ६३० मिळव. आरामात प्रवेश पक्का.

घरी येऊन परत जुने दिवस आठवले!!!! पलिकडे लवून पाहिल तर जीमॅटची ऑफीशियल गाईड धुळखात पडली होती.

आपल्याला खूप काही करायच असत. तेवढी क्षमताही असते. फक्त परिस्थितीची थोडीशीही सोबत नसते. तेन्व्हा आपल दुखन फक्त आपल्यालाच ठाऊक असत. अस काहीस वाटून गेल..

विषय: 
प्रकार: 

अगदी अगदी बी. मी तुझे दु:ख समजू शकते. अकरावीतच लग्न ठरविल्याने बारावीत अभ्यासावर परिणाम झाला आणि मला मेडिसीनला प्रवेश ६ मार्काने मिस झाला. मग बीएस सी केले व हैद्राबादेस गेले तिथे एम एसी ला प्रवेश मिळाला नाही. डोमिसाइल नाही म्हणून. मग धड पड करून सी एस व नोकरी करता करता एम बी ए करायचे खूप प्रयत्न केले. येत असूनही किंवा माहिती, अनुभव असूनही , असाइन मेंटस वेळेवर दिल्या गेल्या नाहीत किंवा घरच्या जबाबदार्‍या, इत्यादी मुळे गाडी अडलीच.

आप दिल छोटा न करो. मायूस न हो जाओ. Happy

खरंच आहे.. कधी कधी होत अस Sad
तेन्व्हा आपल दुखन फक्त आपल्यालाच ठाऊक असत. अस काहीस वाटून गेल..>>> +१० Happy

सेम परीस्थितीतून जातोय.. हे वाचून काहीही करून एम्बीए करायचंच असं वाटतंय... बघूया, परीस्थिती कशी साथ देते ते Happy

आपल्याला खूप काही करायच असत. तेवढी क्षमताही असते. फक्त परिस्थितीची थोडीशीही सोबत नसते. तेन्व्हा आपल दुखन फक्त आपल्यालाच ठाऊक असत
>>
अगदी, अगदी पटतंय.

आपल्याला खूप काही करायच असत. तेवढी क्षमताही असते. फक्त परिस्थितीची थोडीशीही सोबत नसते. तेन्व्हा आपल दुखन फक्त आपल्यालाच ठाऊक असत>>. सेम टू सेम... Happy

बी,

बारावी झालो तेव्हा माझीही परिस्थिती अशीच काहीशी होती. मला सैन्यात जायचं होतं. एंडीयेला गुणवत्ता यादीत येण्यासाठी आवश्यक ती शारीरिक आणि बौद्धिक/मानसिक गुणवत्ता माझ्यात भरपूर होती. मात्र एका विशिष्ट शारीरिक अवस्थेमुळे (condition) मला प्रवेश मिळणार नाही हे माहीत होतं. शेवटी 'हुशार' मुलं जशी आपोआप ढकलली जातात तसा इंजिनियरिंगला दाखल झालो. आज मागे वळून पाहतांना वाटतं की झालं ते बरं झालं. आहे हा काय वाईट आहे मी? जे सैन्यात जाऊन करता आलं नसतं ते करता येतंय ना आता, मग खंत कशाला!

मी तुम्हाला एमबीये होण्यापासून हतोत्साहित करीत नाही. पण एक गोष्ट सांगू इच्छितो. एमबीये हे एक बिरूद आहे. बिरुद म्हणजे अनेक लोकांना तुमच्याविषयी मत बनविण्यासाठी उपलब्ध असलेली सुविधा. सरतेशेवटी तुमचं स्वत:बद्दल असलेलं मत सर्वात महत्त्वाचं आहे. ही बाब कधीही नजरेआड होऊ देऊ नका! इतरांचं तुमच्याविषयी मत अनुकूल बनावं म्हणून कष्ट घेण्याची तुमची तयारी होती/आहे/असावी. अगदी त्याचप्रमाणे स्वत:चं स्वत:बद्दल मत अनुकूल अवस्थेत राखण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. मला वाटतं की या दुसर्‍या प्रकारच्या संघर्षाशी तुम्ही चांगलेच परिचित आहात. म्हणूनच सुचवावंसं वाटतं की एमबीये केलंत तर स्वान्तसुखाय करा.

पुढील धडपडीस शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.

टचिंग. Happy
होतं असं. चुकतात बोटी. चलता है. अजून इच्छा असेल तर आत्ताही करू शकतोस एम्बीए. शुभेच्छा! Happy

तुमच्या मुला/मुली स प्रोत्साहन द्या...!
त्यांच्या डोळ्यातुन तुम्चे स्वप्नं पुर्ण करा...!! अर्थात त्यांची ही आवड निवड लक्षात घ्या... Happy

मी व्हार्टनमधल्या दोन वर्षाच्या कोर्सची अ‍ॅडमिशन सोडून दिली होती - तेंव्हा पन्नास हजार फी पडली असती दोन वर्षांची. आता वीस वर्षांनी वाटतंय की तो कोर्स केला असता तर दरवर्षाला तेव्हडा जास्त पगार मिळणारी नोकरी मिळाली असती. कसंही कर्ज काढून तरी तो कोर्स करायचा असता.

एम्बीएच्या प्रवेशासाठी. द्या ना काढून नावे. >> तिला प्रवेश हवा असेल तर माहितीपण तिनेच काढायला नको का ?

प्रिय बी:

आयुष्यात बर्‍याच वेळा आपण मान खाली घालून चुकलेल्या बोटीबद्दल हळहळ करत बसतो आणि समोर दार उघडून उभ असलेल जंबोजेट मिस्स करतो. These letters; MBA, PhD, preceding your name do not define who you are. तू वयान अजूनही खूप लहान आहेस (फोटूत तरी दिसतोस!) तेव्हा खूप काही करू शकशील. इथे कळवत रहा.

षयी मत बनविण्यासाठी उपलब्ध असलेली सुविधा. सरतेशेवटी तुमचं स्वत:बद्दल असलेलं मत सर्वात महत्त्वाचं आहे. ही बाब कधीही नजरेआड होऊ देऊ नका! इतरांचं तुमच्याविषयी मत अनुकूल बनावं म्हणून कष्ट घेण्याची तुमची तयारी होती/आहे/असावी. अगदी त्याचप्रमाणे स्वत:चं स्वत:बद्दल मत अनुकूल अवस्थेत राखण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. मला वाटतं की या दुसर्‍या प्रकारच्या संघर्षाशी तुम्ही चांगलेच परिचित आहात. म्हणूनच सुचवावंसं वाटतं की एमबीये केलंत तर स्वान्तसुखाय करा.

सहमत

हम्म्म होतं असं कधीकधी.
अजुनही इच्छा असल्यास एमबीए करता येइल रे. तू वरती दिलेल्या कॉलेजेसपेक्षा चांगल्या कॉलेजमधून करता येईल. professional experience लाही महत्व आहेच.
पैशाचा विचार करु नकोस, म्हणजे त्याचं नियोजन कर नीट. तू सिंगापोरला आहेस ना? मग Insead, NSU अशा चांगल्या ठिकाणी अ‍ॅडमिशन घे. ११ महिन्याचा कोर्स म्हणजे अगदी काही अशक्य नाही अजुनही. सध्याची कंपनी सबॅटिकल देत असेल तर उत्तमच. नाहीतर पुढच्या २ वर्शांसाठी पैसा सेव्ह करायचा (घरच्यांसाठी) अन स्वतःसाठी education लोन काढायचं. सध्याचा जॉब सोडायचा, अन सरळ कॅम्पसमध्ये दाखल व्हायचं. जीमॅट स्कोर मात्र ६३० नाही, किमान ७३० यायला हवा (Insead साठी नक्कीच).

तिला प्रवेश हवा असेल तर माहितीपण तिनेच काढायला नको का ?

छे: छे:! मॅनेजर नेहेमी दुसर्‍याकडून कामे करवून घेतात. फक्त श्रेय स्वतःकडे घेतात. कदाचित जमले तर परीक्षेचा पेपर पण दुसर्‍याकडून लिहून घेतात.

बी.............भावना पोचल्या. कधी कधी संधी चुकते किंवा आपल्या कर्माने आपण ती चुकूनच चुकवतो.
पण दिनेशदा म्हणतात तसे आत्ता तू कुठल्याकुठे पोचलाहेस. तरीही कबूलच की हे पूर्वीचं आठवलं की हळहळ मात्र नेहेमीच वाटणार.

बी, शिक्षण कधीच संपत नाही...आणि कितीही शिकले तरी ते कमीच...

तु एम्बीए कर. मनापासुन शुभेच्छा! Happy

Pages