सालासकट कडधान्यांची भाजणी

Submitted by मानुषी on 21 June, 2013 - 03:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

प्रत्येकी अर्धा किलो सालासकटचे हिरवे मूग, काळे उडीद, हरभरे.
प्रत्येका अर्धा किलो गहू, तांदूळ, ज्वारी.
१ वाटी धणे, अर्धी वाटी जिरे.
यात अर्धा किलो बाजरी घातली तरी ही भाजणी फारच चविष्ट होते. पण बाजरी काही दिवसांनी कडू पडते. त्यामुळे
भाजणी लवकर संपली नाही तर ती बाजरीमुळे कडू लागण्याची शक्यता असते.

क्रमवार पाककृती: 

सर्व धान्ये, कडधान्य,, धणे जिरे वेगवेगळे मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यावे.
तांदळाला बोरिक पावडर इ.इ. लावलेले असण्याची शक्यता असते. म्हणून तांदूळ धुवून सावलीत वाळवून घ्यावे.
व हे सर्व गिरणीतून भरड दळून आणावे.

अधिक टिपा: 

एकदा ही भाजणी करून ठेवली की थालिपिठे वडे कधीही पटकन करता येतात.
याच पिठात थोडं ताक आणि जिरे पावडर इ.इ. घालून कुरकुरीत धिरडीही छान होतात.
तसेच कोथिंबिरीच्या वड्या किंवा पीठ पेरून करायच्या भाज्यातही हे भाजणी पीठ चविष्ट लागते.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषीताई मस्त. माझी आईपण साधारण ह्याचप्रकारे भाजणी करते. कोथींबीर-वडी, अळूवड्यापण भाजणी घालून करते आई, खमंग होतात. खूप छान लिहिलेय तुम्ही. अशीच धिरडी, पीठ पेरून भाज्या आमच्याकडेपण करतात.