टर्म इन्शुरन्स कुठला चांगला आहे?

Submitted by mansmi18 on 9 July, 2012 - 09:55

नमस्कार,

टर्म इन्शुरन्स बद्दल काही प्रश्नः

१. टर्म इन्शुरन्स मधे कुठला चांगला आहे (तुमच्या अनुभवानुसार)?

२. आय सी आय सी आय चा ऑनलाईन इन्शुरन्स कसा आहे? (त्याय मेडिकल टेस्ट नाही)

३. आय सी आय सी आय चा सोडला तर इतर बाकी सगळ्यात मेडीकल टेस्ट आहे. मेडीकल टेस्ट न करता इन्शुरन्स घेण्यात क्लेम च्या वेळी गडबड होउ शकते का?

नुकताच एस बी आय च्या एका एजंटकडुन त्यांच्या शुभ निवेश या पॉलिसीबद्दल माहिती मिळाली. त्याने फार रोझी पिक्चर पेंट केले उदा. १५ वर्षात १०% अ‍ॅवरेज रीटर्न इ. पण गुगल केल्यावर कळले की त्यात अ‍ॅवरेज रीटर्न ३-४% आहे आणि रीटर्न किंवा कवरेज काही फारसे चांगले नाही. म्हणुन आता टर्म इन्शुरन्स घ्यायचे ठरवले.
इन्शुरन्स आणि इन्वेस्टमेंट दोन्ही दगडांवर पाय ठेवण्यापेक्षा एक गोष्ट नीट करावी हा उद्देश. असो.
मी ऑनलाईन माहिती काढतोच आहे पण इथे कोणाचा अनुभव कळल्यास निर्णयास जरा आणखी मदत होइल.

आपल्या मतांचे स्वागत.

धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानसीजी,
नमस्ते !
मी कोटक महिंद्रा ओल्ड लाईफ इ न्शुरन्स चा कोटक हेड स्टार्ट फुचर प्रोटेक्ट-सिंगल लाईफ ही पोलिसी जुन २०१० घेतली आहे
प्रीमिअम क्वाटरली रु.५००० आहे, आता पर्यंत रु.५५००० भरले आहेत पण सध्याची किंमत रु.४९००० दिसते आहे.
पॉलीसी बंद करावी,दुसर्या फंडमध्ये स्विच करावी कि चालु ठेवावी याबद्दल प्लीज सल्ला द्या.

online term policy चा माझा अनुभव तरी अतिशय वाईट होता.. मी HDFC चा online term plan घेतला होता.. एक तर online घेतला तर त्याला कोणी वाली नसतो. त्यामुळे फक्त मेल वर communication होतं. मला medical साठी सुद्धा बोलावलं नाही. ३ महिन्यांनंतर खुप follow up केल्यावर माझे पैसे परत मिळाले. कुठलही कारण न देता, म्हणजे policy reject झाली असंही सांगितलं नाही मग मी नेट वर सर्च केलं तर खुप लोकांचा अशाच प्रकारचा अनुभव होता.

online term policy स्वस्त असतात कारण कोणीही agent त्यात involve नसतो. कंपनीला कोणालाही कमिशन द्यायचं नसतं

@अनिल७६
कमीत कमी ३ वर्ष कोणत्याही plan चे पैसे भरावेत. आणि एकुण १० वर्ष तरी विसरुन जावं. ३ वर्षाच्या आत पुर्ण पैसे काढले तर आपला कुठल्याही प्रकारचा क्लेम राहत नाही. कमीत कमी २ वर्षाचे प्रिमीयम ठेउन उरलेले पैसे काढावेत . कारण एका प्रिमीयम ची मिनिमम अट असते क्लेम साठी. आणि जर युलिप असेल आणि फंड चांगला काम करत नसेल तर फंड value एका प्रिमीयम च्या खाली गेला तरी क्लेम राहत नाही .
त्यातुनही तुम्हाला पैसे काढायचे झाले तर आता जेवढी फंड value तुम्हाला दिसतिये त्यात जवळ जवळ ५० ते ६० % ते चार्जेस कापतील. आणि अगदी थोडे पैसे मिळतील.
एकदा कंपनीला फोन करुन सरेंडर value विचारुन घ्या म्हणजे अंदाज येईल.

online term policy स्वस्त असतात कारण कोणीही agent त्यात involve नसतो. कंपनीला कोणालाही कमिशन द्यायचं नसतं >>> +1 शिवाय सर्व कसं ऑनलाईन झाल्यामुळे आपोआपच डिबी तयार होतो, तिथे परत एक माणूस लावून सर्व भरायची कॉस्ट देखील वाचते.

On line इन्शूरंस आणि इन पर्सन मध्ये काहीही फरक नसतो. उलट ह्या वरील कारणांमुळे ते स्वस्त असतात त्यामुळे ऑन लाईन इन्शूरंस घ्यायला कचरू नये. पण मेडिकल जरूरी असणार्‍या पॉलिसीस घेतल्या की प्रॉपर इव्हिडंस आपोआप बिल्ड होतो व जेणे करून रिजेक्शन कमी होण्यास मदत होईल.

माझी पॉलिसी - SBI Online

विमा ही काही चांगले रिटर्न्स देणारी गुंतवणुकीची स्कीम नव्हे. ती कुटुंबासाठी आवश्यक अशी गरज आहे. म्हणूनच गुंतवणुकीला पर्याय म्हणून विमा पॉलिसीकडे पाहीलं जाउ नये.

विमा उतरवताना घ्यायची काळजी

१. कंपनी अशी निवडावी जी कमीत कमी २० वर्षे तग धरू शकेल.
२. ज्या कंपनीचे क्लेम्स निकालात काढण्याची ट्क्केवारी जास्त आहे तिचा शोध घ्यावा. अमेरिकन कपन्या भारतात जे दावे करतात त्यांचे तिथले रेकॉर्ड कसे आहे ते तपासून घ्यावे.
३. ज्या इन्श्युरन्स प्लान साठी मेडीकल घेतली जात नाही त्यात कोणकोणते आजार कव्हर केलेले आहेत याची माहिती असेल तर उत्तम. (माझ्याकडे टू व्हीलर होती तेव्हां रॉयल सुन्दरम कंपनीची पॉलिसी होती. पुढे कंपनीला पर्वडत नाही म्हणून त्यांनी टू व्हीलर्स बंद करून टाकल्या. काही कंपन्या पुढे टिकणार नाहीत असा अंदाज आहे. मुद्दा हा कि, कंपन्या उत्साहाने या वयसायात येतात पण नंतर एकतर त्यांना झेपत नाही किंवा इतर कारणाने आपली पॉलिसी गंडण्याची शक्यता असते. ऑटो इन्स्युरन्सच्या बाबतीत पॉलिसी ट्रान्सफरेबल असते, पण लाईफ इन्श्युरन्स मधे तसं होत नाही. म्हणून मेडीकल नाही अशी मोठ्या रकमेची पॉलिसी तपासून घ्यावी.
४. बरेच जण २५ व्या वयापर्यंत पॉलिसी काढतात, जी वीस वर्षाची असते. ४५ व्या वर्षी ती संपते. याच काळात माणसाला विम्याच्या संरक्षणाची खूप गरज वाटू लागते. मग तो दुसरी पॉलिसी घेतो. विम्याच्या नियमाप्रमाणे ४५ व्या वर्षी पॉलिसी घेतल्यास रिस्क वाढते म्हणून प्रीमियम जास्त ! म्हणून पॉलिसी घेतानाच ती किमान साठाव्या वयापर्यंतच घ्यावी.
५. शक्यतो प्लेन इन्श्युरन्स घ्यावा ( ज्यात पैसे परत मिळत नाहीत). सर्वायवल बेनेफिट सहीत पैसे परत करणारा कुठलाही प्लान आणि निव्वळ इन्श्युरन्स देणारा प्लान यांची तुलना केल्यास निव्वळ इन्स्युरन्स केव्हाही फायद्याचा आहे हे लक्षात येईल. वर जे पैसे उरतात त्यात हेल्थ इन्शुरन्स (मेडीकल) घ्यावा. भविष्य जीवन नावाचा एलआयसीचा प्लान होता जो निव्वळ विमा संरक्षण देतो ( मुदत संपल्यावर पैसे परत मिळत नाहीत). यात कमी रकमेत मोठ्या रकमेचा विमा उतरवता येतो.
६. प्लेन इन्श्युरन्स हा तुमचा हक्क आहे. एजंट कधीही हा प्लान सांगत नाही. कारण उघड आहे. यात कमिशन अत्यल्प असतं. शेवटी काय, आपण विमा एजंटसाठी काढत नाही.

युलीप असलेली कोणतीही पॉलीसी काढू नका. मी तीन पॉलीसीज सरेंडर केल्यात तोट्यात जावून. टर्म इंन्सूरंन्स काढायचा नसेल तर इतर कोणतीही पॉलीसी जी जास्तीत जास्त १०% रिटर्न देते ती काढा.

एलआयसी ची लहान मुलांची Children Deferred End. Table 50 कशी आहे? बरेच एजंट ही पॉलीसी देत नाहीत.

पाभे
पॉलिसीला नाव काहीही असलं तरी गणित एकच असतं. शेवटी विमा आपल्या कुटुंबियांच्याच कामाला येतो. ठराविक अंतराने पैसे हातात येणं या आमिषाला भुलून पॉलिसी घेऊ नये हे उत्तम.

किरण तुमचे म्हणणे अर्धे खरे होवू शकत नाही काय?
>>> शेवटी विमा आपल्या कुटुंबियांच्याच कामाला येतो
शेवटी विमा आपल्या कुटुंबियांचा विमा आपल्या कामाला येतो?

तसेच >>> ठराविक अंतराने पैसे हातात येणं या आमिषाला भुलून पॉलिसी घेऊ नये हे उत्तम.

हो हे खरेही आहे. मी जी वर लहान मुलांची Children Deferred End. Table 50 सांगितले आहे त्यात मुलाचे वय १८ वर्षे होईपर्यंत ती रक्कम लॉक असते. त्यात एलआयसी दरवर्षी बोनस देते. पॉलीसी काढल्याकाढल्या काहीतरी रक्कम त्यात देते असे काहीतरी आहे. मी एजंटला विचारून सांगतो. मी या तिन पॉलीसी काढलेल्या आहेत.

फार चांगला धागा. (मी प्रोएलआयसी तसेच कुठल्याही कंपनीचा एजंट नाही.)

पाभेजी,
एजंट पॉलिसी देत नसेल तर नक्की चांगली आहे असे समजा. त्यात त्या एजंटचा कमी अन तुमचा फायदा जास्त असतो.

व्यक्तिशः माझा एलआयसीवर अजिब्बात विश्वास नाही.

विमा + इन्व्हेस्टमेंट असे कधीही करू नाही असे माझेही मत आहे. तो हिशोब तोट्यातच जातो. (किरणरावांशी सहमत)

टर्म इन्शुरन्स, म्हणजे आपण गाडीचा विमा काढतो की नाही? तसा विमा काढावा, दर वर्षी प्रिमियम भरले ते इन्कमटॅक्समधून वजा होते तितकाच फायदा मानून खुष रहावे. उरलेला पैसा पोस्टात टाकला तरी गुंतवणुकीवर एलआयसीपेक्षा जास्त रिटर्न मिळतील.

याशिवाय मेडिक्लेम वा तत्सम हेल्थ इन्शुरन्स आपला, तसेच आपल्या सर्व कुटुंबाचा (जो-जो आपल्यावर अवलंबून आहे त्या सर्वांचा) काढावा. क्लब्ड पॉलिसी असेल तर उत्तम असते. (हे घेऊ नका असे एजंट सांगतात, माझा अनुभव उलटा आहे) उदा. आई बाप मुलगा या तिघांचा २-२ लाखाचा आरोग्य विमा असेल, तर कुणा एकट्याला एकाच वर्षी ६ लाखापर्यंत कव्हर मिळेल अशी आयडिया असते, ती चांगली ठरते.

युलिपच्या एका 'यंगस्टार' नामक पॉलिसीचा अनुभव भारी आला आहे मला.

अर्थात, विमा कोणताही असो. पर्सनल वैद्यकिय व टर्म, व अजुन काही. त्या एजंटची गच्ची धरून पैसे काढता येतील प्लस, त्या विमावाल्यांनी नेमलेल्या एका 'टीपीए' नामक विकृत लोकांशी अत्यंत हलकट लेव्हलवर बोलता/वागता येईल अशी तयारी नक्कीच ठेवावी हे वैयक्तिक मत. टीपीए = थर्ड पार्टी आर्बिट्रेटर.

तुम्ही मोठ्या कंपनीचे नोकर नसाल, तर असे क्लेम -मेडिकल किंवा इतर- सँक्शन करायला टीपीए वाले लै खुस्पटं काढतात. हार्ट अ‍ॅटॅक वाल्याचं बिल सॅंक्शन करायला इतके पीडतात, की त्या बिचार्‍याला परत अ‍ॅटॅक येईळ Wink हे असे का होते याबद्दल टीपीए मधे काम करणारे कुणी माबोकर अंदर की बात इथे लिहिल तर बरे होईल. मला ठाऊक आहे, ती नंतर कधी लिहीन.

धन्यवाद इब्लीसराव.
>>>> टर्म इन्शुरन्स, म्हणजे आपण गाडीचा विमा काढतो की नाही? तसा विमा काढावा, ......जास्त रिटर्न मिळतील.

छान कल्पना आहे ही. मलाही एकदोघांनी सांगितले होते पण वळले नाही.

मी असे ऐकले आहे की टर्म 'लाईफ' इन्शुरन्स फक्त कमावत्या व्यक्तीलाच मिळतो. असे असेल तर डिपेंडंट्स चा टर्म लाईफ इन्शुरन्स काढता येणार नाही. खरे आहे का ते?

मी असे ऐकले आहे की टर्म 'लाईफ' इन्शुरन्स फक्त कमावत्या व्यक्तीलाच मिळतो. असे असेल तर डिपेंडंट्स चा टर्म लाईफ इन्शुरन्स काढता येणार नाही. खरे आहे का ते?
<<
असे असेल असे वाटत नाही. इन्कमटॅक्स रिटर्न्स भरलेले असतील तर टर्म इन्शुरन्स मिळायला प्रॉब्लेम नसावा. पण टर्म इन्शूरन्स सॅंक्शन करताना, तुमची लाईफ व्हॅल्यू तुमच्या इन्कमटॅक्स रिटर्न्सवर ठरते. म्हणजे तुम्ही २ लाख वार्षिक उत्पन्न दाखवत आहात, अन टर्म इन्शूरन्स १ करोड चा मागत आहात, तर ते जमत नाही. त्यात हेल्थ रायडर असेल तर अजिबातच नाही.

उदा. मी आज दर वर्षी ५ लाख कमवतो, अन आज ३० वर्षे वयाचा आहे, प्रोजेक्टेड फ्रॉम माय लास्ट ३ रिटर्न्स, मी कदाचित १५ लाख दरवर्षी, ४५ चा होइन तेव्हा कमवीन. या हिशोबाने, मी ३८ व्या वर्षी मेलो, अन अ‍ॅव्हरेज इंडियन लाईफ एक्स्पेक्टन्सी = ६० वर्षे. मग तिथून पुढे हिशोब करून तो विमा कॅल्क्युलेट करतात, अशी माझी समजूत आहे.

*श्रेयअव्हेर(मराठीत डिस्क्लेमर) : मी डाक्टर आहे. विमा रक्कम घेण्यापुरता संबंध आहे. पण जे मला समजले ते वरीलप्रमाणे.

**ता.क.
>>छान कल्पना आहे ही. मलाही एकदोघांनी सांगितले होते पण वळले नाही.<<

वळवून घ्या. गाडीची एलायसी निघत नाही म्हणून आपण नाइलाजाने टर्म इन्शूरन्स काढतोच की. दर वर्षी डेप्रिसिएशनने गाडीची किम्मत कमी होते म्हणून हप्ता कमी होतो. दर वर्षी (कमावत्या वयात) आपली किंमत वाढते. हप्ता वाढेल, पण टोटल विमा रिटर्न्स देखिल वाढतील. आप मरे जग डूबा, पण जाताना काकूंना एक दोन खोके देऊन गेलात, तर कुणाच्या बापाचे? Wink

वार्षीक भाडे जर १,८०००० रु पुढे असेल तरच भाडेकरुला त्याच्या घरमालकाचा पैन नंबर तो काम करत असलेल्या कम्पनीत देणं बंधनकारक आहे, टैक्स सेंवींग साठी. त्यामुळे भाडे यापेक्षा कमी असेल तर घरमालकाला त्याच्या भाडे करुला पावती द्यायला काही हरकत नसावी, कारण ते इनकम टैक्स साठी हिशोबात धरले जात नाही.

"कारण ते इनकम टैक्स साठी हिशोबात धरले जात नाही"">>> भाडे कीती ही कमी किंवा जास्त असले तरी ते Income tax साठी तुमच्या उत्पन्ना त पकडले जाते.

टीपीए = थर्ड पार्टी आर्बिट्रेटर >> टीपीए = थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर.

टर्म इन्शुरन्स, म्हणजे आपण गाडीचा विमा काढतो की नाही? तसा विमा काढावा >> अगदी.. गाडीची किंमत १०-१५ लाखाच्या वर नसते तरी आपण विमा काढतो तेही बराच प्रिमियम भरून. आपल्या आयुष्याची किंमत १०-१५ लाखापेक्षा नक्कीच जास्त आहे. जेवढ्या लवकर टर्म इन्शुरन्स घेता येइल तेव्हढा चांगला कारण त्याप्रमाणं प्रिमियम कमी बसतो (शिवाय मेडिकल टेस्टमधे काही न निघायची शक्यता जास्त).

मी असे ऐकले आहे की टर्म 'लाईफ' इन्शुरन्स फक्त कमावत्या व्यक्तीलाच मिळतो >> बरोबर ऐकले आहे. मागितलेले 'लाइफ कव्हर' खरोखरच जरूरी आहे की नाही हे पॉलिसी इश्यू करायच्या आधी तपासले जाते.

मुलान्च्या उच्च शिक्षणासाठी कोणती पॉलिसी घ्यावी? माझा मोठा मुलगा ९ वर्षान्चा तर लहान मुलगा ७ वर्षान्चा आहे. जाणकारान्नी मार्गदर्शन करावे...

टोच्या: >>> मुलान्च्या उच्च शिक्षणासाठी कोणती पॉलिसी घ्यावी? <<<

मुळात आधी हे ठरवा की आपल्याला नक्की काय करायचे आहे? आपला प्रश्न असे सुचवतो आहे की आपल्याला insurance policy नव्हे तर investment policy हवी आहे!!!

Keep it simple -

DO NOT confuse insurance with investment and always keep them separate as both have different goals and benefits. Any financial adviser/agent will always try to push insurance+investment product as that person makes commission out of it.

1. Does one should have insurance?
Absolutely YES, especially if you have dependents (parents/wife/husband/kids/relatives/etc).

How many years term policy one should take?
Depending on your situation, typically until your kids start their work life, the underlying assumption is by then you have saved enough as well as have some assets and if something happens to you then your kids are NO MORE dependent on you. Your spouse will be able to continue with the wealth you have saved over the time.

How much cover should we take?
This article can help in determining how should we calculate.

Basic Term Life insurance policies provide the best cover for low cost, however you do not get any money back after maturity. But considering the goal of securing financial future of your dependents in case if anything happens to you in those 20-30 years then you have achieved it by this basic policy.

2. Investment policy for children's education
Now the objective is simple & goal is ONLY capital growth as well as preservation. This money is to be used ONLY for children's further education. Unfortunately, I am not aware if any such scheme (provided by government for tax breaks such as 529 Plan in USA) is available in India. The only avenue to save taxes is by tax deductions which can be checked here. So the ONLY viable option is investments such as bank FDs/gold/real estate/mutual funds/etc.

However, if anyone knows a genuine tax break for investment education scheme (which does not involve insurance component) then please feel free to provide more information here.

Hopefully this should provide some insight and guidance.... Happy

Kedar,
online SBI Term Insurance baddal adhik maahiti de na.

malahi term insurance ghyayacha aahe, koni changal suchavel ka?

योगी बीअर,
धन्यवाद आपण फार मोलाची माहीती दिलीत... पॉलिसी घेताना एवढ्या गोष्टीन्चा विचार करावा लागतो हे माहीती नव्ह्ते... आपण दिलेल्या लिन्कही वाचल्या... पुन्हा एकदा धन्यवाद...:)

मी जीवन सरल विमा घेतलाय्..योग्य की अयोग्य? ३०००/प्रीमिय्म महीन्याला...

शोनु-कुकु: This is a endowment assurance plan which has a guaranteed amount at the end of policy term + loyalty additions between a very wide range (probably depending upon the prevailing interest rate over the period).

सहज काही प्रश्ण...
1. आपण हा विमा का घेतलात? म्हणजे हाच विमा घेण्यामागची विचारसरणी काय होती?
२. विमा घेतल्या वर आता हा प्रश्ण का पडलाय की हा योग्य की अयोग्य?

आता थोडा अभ्यास -
१. हा calculator वापरुन बघा
२. अस समझा की महिन्याला ३०००/- SIP करताय आणि ५% (average savings bank interest rate for next 25 years)
३. तुम्हाला टर्म च्या शेवटी जी रक्कम मिळणार आहे त्यात आणि वरिल calculator वापरुन काढलेली रक्कम ह्यात किति फरक आहे?
४. नक्की फायदा कोणाचा झाला!!!

हे विसरु नये की टर्म पुर्ण होई पर्यंत आपल्याला premium भरावाच लागेल नाहितर विमा lapse होण्याची शक्यता असते....

ह्या वरुन आपल्याला कळेल की आपला निर्णय बरोबर होता का नाही! Good luck.... Happy

खाजगी कंपन्यांनी सुरू केलेल्या इंन्श्यूरन्स कंपन्या जर तोट्यात गेल्या तर तेथील ग्राहकांनी काढलेल्या इंन्श्यूरन्स चा वाली आयरडीए असतो असे समजले जाते ते कितपत सत्य आहे.

नशिबाने भारतात एकही खाजगी कंपन्यांची इंन्श्यूरन्स कंपनी बंद पडलेली नाही. (तोट्यात आहेत पण बंद नाही.)

एका ब्लॉगवर वाचले की खाजगी कंपन्यांना बरीच मोठी रक्कम बँक गॅरंटीच्या स्वरूपात आरबीआय कडे ठेवावी लागते. ती रक्कम दरवर्षी त्यांनी केलेल्या धंद्याच्या स्वरूपावर बदलते. त्याचप्रमाणे त्यांच्या इंन्श्यूरन्सचा देखील इंन्श्यूरन्स दुसरीकडे काढलेला असतो. एखादी इंन्श्यूरन्स कंपनी बंद पडली तर आरबीआय त्या ग्राहकाचा क्लेम देणे लागते.

हे सर्व कितपत खरे आहे? पॉलीसी टर्म वर असे काही लिहीलेले असते का? जर अशा स्थितीत क्लेम पडला तर त्यात कितपत कालव्यपय होवू शकतो?

पाषाणभेदः Insurance उद्योग हा नियमन केलेला (regulated) आहे तेव्हा आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे. एखादी कंपनी बंद पडलीच (अशी शक्यता फारच कमी असते) तर IRDA ते क्लेम देणे लागते. जर अशी स्थिति निर्माण झालिच तर government त्यात लक्ष घालुन काही वेगळी तरतुद करु शकते.

Example:
१. जेव्हा सत्यम ने हात वर केले तेव्हा government ने त्यात लक्ष घालुन जे जरुरी होते ते केले.
२. जेव्हा US मधे AIG ने हात वर केले तेव्हा government ने त्यांना कर्ज देउन सावरले.

This article might provide detail information...

yogibear,
thank you.
Jevha policy ghetali tevha kahich vichar kela navata..ek policy asavi mhnun ghetali..ani Agent bhavacha close friend ..so shanka aalich nahi ani me finance calculation madhe mattha bhopala ahe. mazi chuk .:( ...
maaybolichi krupa, ya dhagyavar yeun dhadkale ani thodi shanka aali mhnun prashn vicharala...
maz calculation confirm karun sangate me ...

http://licjeevanplanindia.blogspot.com/2013/02/lic-jeevan-saral-table-no...

yogibar, me he table pahun calculation kele hote. Ya tablepramane 3000 sathi after 25 years(after maturity) I will be eligible for 40,95,304/- ? is it true or its just carrot company showing and in actual I wouldnt get same amount ?

whatever it is could you please clarify..
ह्या वरुन आपल्याला कळेल की आपला निर्णय बरोबर होता का नाही! Good luck....>>>> he vachun mala jam tension alay..so tumhich sanga kay te...:(

Pages