आले! आले!! आले!!!
यंदा परत एकदा 'मायबोली' टीशर्ट आले!
मधले एक वर्ष मायबोलीकरांना टी-शर्ट विना करायला लागलेल्या विरहाचे आनंदात रुपांतर करायला यंदा परत एकदा 'मायबोली टीशर्ट' आणि त्याबरोबरच 'मायबोली बॅग' उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
ह्या वर्षाच्या सुरुवातीला गाजलेल्या मायबोली शीर्षक गीतातील दोन ओळी यंदा टी-शर्ट वर असणार आहेत.. आणि त्याचे सुलेखन केले आहे पल्लीने.
गेल्या काही वर्षातील वाढती मागणी लक्षात घेऊन यंदा तीन प्रकारात टी-शर्ट असणार आहेत.
१. खिश्यासहीत कॉलर टी-शर्ट. (चारकोल रंग)
२. राऊंडनेक टी-शर्ट (चारकोल रंग)
३. महिलांसाठी व्ही-नेक टी-शर्ट (मोरपंखी रंग)
४. बॅग
बॅगचा आकार - ९ इंच X ७ इंच X ४ इंच. बॅग खांद्यावर घेता येईल अशा पाऊच सारखी आहे.
राऊंडनेक व व्हीनेक टी-शर्ट वर पुढे सुलेखन असेल, डाव्या बाहीवर मायबोलीचा लोगो असेल आणि मागच्या बाजूला मायबोलीचा वेबसाईट अॅड्रेस असेल.
खिश्यासहीत कॉलर टी-शर्ट वर खिश्यावर मायबोलीचा लोगो असेल आणि मागच्या बाजूला मायबोलीचा वेब अॅड्रेस असेल.
लहान मुलांसाठी राऊंडनेक चारकोल रंगाचे आणि व्ही-नेक मोरपंखी रंगाचे टीशर्ट उपलब्ध आहेत.
लहान मुलांच्या टीशर्टसाठी अंदाजे साईज.
वय वर्षे १-२ साठी --> २२
वय ३-४ साठी --> २४
वय ५-६ साठी --> २६
वर ७-८ साठी --> २८
वय ९-१० साठी --> ३०
वय ११-१२ साठी --> ३२
आणि तिथून पुढे रेग्युलर साईज
(हे फक्त एक कोष्टक आहे जे शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मुलगा प्रत्यक्षात कसा आहे त्यानुसारच ऑर्डर नोंदवा.)
खिश्यासहीत कॉलर टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु.३५०/-
राऊंड नेक व लेडिज टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु.२५०/-
लहान मुलांच्या टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. २००/-
आणि बॅगची देणगीसह किंमत असेल रु.२५०/-
(महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टाच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.)
यंदाची देणगी प्रगती प्रतिष्ठान, जव्हार ह्या संस्थेस देण्यात येणार आहे. प्रगती
प्रतिष्ठानबद्दल आधिक माहिती पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.
टीशर्टांचे पैसे भरण्याची माहिती थोड्याच दिवसात देण्यात येईल. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टाची ऑर्डर नोंदवायची, कारण ४ जुलै, २०१३ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.
ऑर्डर कशी नोंदवाल?-
इथे टिचकी मारुन
ऑर्डर फॉर्म मध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी वेगळा साईज असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
साईज-------रुंदी(2 L)-------उंची(H)
XXL-------46"-------33"
XL -------44"-------31.5"
L -------42"-------30"
M -------40"-------28.5"
S -------38"-------27"
XS -------36"-------25.5"
XXS-------34"-------24"
फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टी-शर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात टोटल हवे असलेले टी-शर्ट लिहायची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या मेलबॉक्स मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंक मधे बघितल्यास बघता येईल.
महत्त्वाचे-
१. टीशर्ट 'राऊंड नेक' प्रकारचे आहेत. हे टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे-मुंबई आणि नाशिक मधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे -
२. हिमांशु कुलकर्णी -
हे टीशर्ट आपल्याला आपल्या वर्षाविहारापर्यंत मिळणार आहेत!! वविला सर्व मायबोलीकर हे टीशर्ट घालून आले, तर काय धमाल येईल, कल्पना आली ना? तर, झटपट ऑर्डर नोंदवा.
टीशर्टचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना
पुणे , मुंबई आणि नाशिक येथे ७ जुलै २०१३ या एकाच दिवशी टीशर्टचे पैसे जमा केले जातील.
टीशर्टचे पैसे जमा करण्याचे ठिकाण,दिवस आणि वेळ खालीलप्रमाणे:-
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकच्या मायबोलीकरांनी पैसे भरण्यासाठी मायबोली आयडी विदिपा म्हणजेच विजय दिनकर पाटील यांच्याशी ९८८१४९७१८७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा.
नोंदणी केलेल्यांचे पैसे ७ जुलैच्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.
टी शर्टस मिळण्यासंदर्भातली सूचना:-
टी शर्टस मिळण्याचे ठिकाण, तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे:-
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - इथला तपशील लवकरच देण्यात येईल.
ज्यांनी पोस्टाने टीशर्टस मागवले आहेत त्यांना पोस्टेज खर्चाची माहिती लवकरच मेलने पाठविण्यात येईल. आणि ७ जुलैच्या आत त्यांचे टी शर्ट+पोस्टेजचे पैसे आले असतील तर त्यांना २१ जुलै नंतर टीशर्टस पाठविले जातील. टी शर्ट पाठविल्यावर तशी त्यांना संयोजकांकडून मेलही करण्यात येईल.
लोकहो, टी शर्ट संदर्भात काही चौकशी करायची असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.
अत्यंत महत्त्वाची सूचना - ऑनलाईन पैसे भरणार्यांनी कृपया नवीन ऑर्डर्स करु नयेत. कारण योग्य वेळेत म्हणजेच ७ तारखेपर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही..
प्रत्यक्ष पैसे भरणारे अजूनही ऑर्डर बुक करु शकतात. त्यांच्यासाठी ऑर्डर नोंदविण्याची मुदत ६ जुलै पर्यंत करण्यात आलेली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.
नोंदणी केली आहे .पोच कशी
नोंदणी केली आहे .पोच कशी मिळेल ?>> नोंदणीत जो ईमेल पत्ता दिला आहे त्यावर पहा. इमेल आलेली असेल. अन्यथा नोंदणीच्या दुव्यावर कधीही गेलात तर तुमचे submission दिसेल.
लहान मुलींसाठी (५ वर्षे) तो
लहान मुलींसाठी (५ वर्षे) तो मोरपिशी / निळा रंगाचा टी शर्ट उपलब्ध आहे की नाही ?
मागणी नोंदवलेली आहे.
मागणी नोंदवलेली आहे.
मागणी नोंदवली. पोलो नेक
मागणी नोंदवली. पोलो नेक टी-शर्ट फारच सुंदर आहे. तो पण घेतेय लेडिज टी-शर्ट बरोबर.
ऑनलाईन मागणी नोंदवणे मस्त आहे. काहीतरी गडबड होऊन २ ऑर्डर्स प्लेस झाल्या पण एक डिलिट करुन टाकली आहे. ऑर्डर डिलिट (कॅन्सल) केल्याची पण पोचपावती इमेल मध्ये मिळेल का?
टीशर्ट समिती, टीशर्टची मापे
टीशर्ट समिती, टीशर्टची मापे इथे सविस्तर लिहू शकाल का? आणि अगोदर मापाबद्दल इमेजही असायची, ती पुन्हा चढवता आली तर पहाल का?
मंजू, तू दिलेल्या लिंकवर ४२
मंजू, तू दिलेल्या लिंकवर ४२ मापाला 'एल' साईझ दिलेली आहे. यंदा ४२ मापाला एक्सएल आहे नोंदणी फॉर्मवर
सावली, प्राजक्ता_शिरीन.. लहान
सावली, प्राजक्ता_शिरीन.. लहान मुलींसाठी मोरपंखी रंगाचे टीशर्ट उपलब्ध होतील.. बर्याच जणांकडून तशी मागणी आहे त्यामुळे तो पर्याय उपलब्ध करुन देत आहोत.
वरील मूळ पोस्ट मध्ये त्याचा उल्लेख करतो आहे.
मंजूडी, तसा साईज चार्ट इथे देण्याचा प्रयत्न करतो.
नोंदणी करताना 'वेगळी साईझ'
नोंदणी करताना 'वेगळी साईझ' कॉलममधे नोंदणी केली की 'सुपुर्द करा'चे बटण नाहीसे होते आहे. अॅडमिन, प्लिज बघणार का एकदा तपासून?
ताजा कलमः हे असं IE मधून होतं आहे, मला फायरफॉक्समधून मागणी व्यवस्थित नोंदवता येते आहे.
हाईला, हो का लले? बरं, आता
हाईला, हो का लले?
बरं, आता संयोजक इकडे मापे देतच आहेत, मी वरची पोस्ट एडीट करते.
मोठ्यांचे साईझ इथेही
मोठ्यांचे साईझ इथेही लिहा.
टीशर्टवर सुलेखन नको असेल तर नुसता प्लेन टीशर्ट मिळेल का?
मायबोली बॅग/ पाऊच मस्त आहे. मी बरोबर गेस केला होता 'डोकं चालवून' काल त्याचं बक्षिस काय?
नोंदणी करायचा फॉर्म -ही सोय बेष्ट आहे. या सोयीबद्दल धन्यवाद. त्या फॉर्मचं आता संपादन होऊ शकणार नाही हे माहित आहे. पण आपण जे काही विकत घेत आहोत, त्याची किंमत किती होते आहे हे तिथल्यातिथे 'संख्या' लिहिली की लगेच खाली अजून एक टॅब वाढवून / पोचपावतीच्या ईमेलीतून समजेल असे काही करता येईल का?
राउंड नेक आणि लेडिज टिशर्टसची
राउंड नेक आणि लेडिज टिशर्टसची साइझ वाइज डायमेन्शन्स ( _size - उंची _ इंच/ सेमी, रूंदी _ इंच/ सेमी) देणार का प्लीज?
प्रत्येक व्हेण्डरचे साइझचे कोष्टक वेगळे असते. मग गोंधळ होतो.
दर वर्षी काहीतरी घोळ झालेला आहे म्हणून विचारते आहे.
कृपया गैरसमज नसावा.
ओह.. माझी पोस्ट पडेतो तुम्ही
ओह.. माझी पोस्ट पडेतो तुम्ही अपडेट करताय चार्ट हे आले. इग्नोर मारा माझी पोस्ट
मुंबईतील कुणासाठी टिशर्टस
मुंबईतील कुणासाठी टिशर्टस कलेक्ट करायचे असतील तर जरूर सांगा.
मी वविला जाणार नाहीये पण टिशर्ट/स नक्की घेणारे.
मी पार्ल्यात रहाते. पार्ल्यात कुणाकडे घरी पोचवायचे असतील टिशर्टस तर जमेल.
मी पार्ल्यात रहाते. पार्ल्यात
मी पार्ल्यात रहाते. पार्ल्यात कुणाकडे घरी पोचवायचे असतील टिशर्टस तर जमेल.>>>>>>>>>>>> मी सांताक्रुझला, नी या कामात काही मदत लागली तर मलाही सांग
मला फक्त बॅगच हवी आहे. टी
मला फक्त बॅगच हवी आहे. टी शर्ट नको आहे. पण फॉर्ममध्ये टी-शर्ट कुठून घेणार? आणि टी-शर्ट कसा घेणार? हे लिहावच लागतंय. त्यासाठी काय करायचं?
जिथून टिशर्ट घेणार तिथूनच बॅग
जिथून टिशर्ट घेणार तिथूनच बॅग मिळणारे.
पौर्णिमा, यंदातरी तुम्ही
पौर्णिमा, यंदातरी तुम्ही म्हणत आहात तशी सोय करणे शक्य नाही. पण पुढील वर्षी तुमच्या ह्या सूचनेची नक्कीच नोंद घेतली जाईल.
पौर्णिमा, यंदातरी तुम्ही
पौर्णिमा, यंदातरी तुम्ही म्हणत आहात तशी सोय करणे शक्य नाही. पण पुढील वर्षी तुमच्या ह्या सूचनेची नक्कीच नोंद घेतली जाईल.>> नो प्रॉब्लेम टी_स
टीशर्टवर सुलेखन नको असेल तर नुसता प्लेन टीशर्ट मिळेल का?>> हेही सांगा.
वर्षा.. तुम्हाला ती माहिती
वर्षा.. तुम्हाला ती माहिती फक्त बॅग घ्यायची असेल तरी भरावी लागेल. टी-शर्ट संख्या नाही लिहिलीत तरी चालेल.. फक्त किती बॅग हव्यात ते शेवटच्या चौकोनात लिहा.
ओके ऑर्डर नोंदवली आहे.
ओके ऑर्डर नोंदवली आहे.
टीशर्ट_समिती , मला असा मेल
टीशर्ट_समिती ,
मला असा मेल आला आहे
-------------------------------
कॉलरवाले टीशर्ट:
XS - 34:
S - 36:
M - 38:
L - 40:
XL - 42:
XXL - 44:
वेगळी साईझ:
संख्या:
राऊंड नेक टीशर्ट:
XS - 34:
S - 36:
M - 38:
L - 40:
XL - 42:
XXL - 44: १
वेगळी साईझ:
संख्या: १
व्ही-नेक टीशर्ट:
XS - 34:
S - 36: १
M - 38: १
L - 40:
XL - 42:
XXL - 44:
वेगळी साईझ:
संख्या: २
मायबोली हँडबॅग: १
------------------------------
मला २ व्ही नेक , १ राऊंड नेक आणी १ बॅग हवी आहे , त्यासाठी वरील ऑर्डर बरोबर आहे ना ?
त्यात संख्या च्या जागी मी टोटल लिहिली होती म्हणून विचारत आहे .
केदार_जाधव, तुम्ही नोंदवलेली
केदार_जाधव, तुम्ही नोंदवलेली ऑर्डर बरोबर आहे... पण त्यात संख्याच्या समोरच्या चौकोनात काही लिहायची गरज नाही. तो चौकोन वेगळ्या साईजचा टीशर्ट हवा असेल तरच वापरायचा आहे.
टोटल लिहायची नाहीये केदार
टोटल लिहायची नाहीये केदार
वेगळी साईझ समोर साईझ
आणि खाली संख्या मधे वेगळ्या साईझ ची संख्या ...
तुझी ऑर्डर अशी दिसली पाहिजे ..
कॉलरवाले टीशर्ट:
XS - 34:
S - 36:
M - 38:
L - 40:
XL - 42:
XXL - 44:
वेगळी साईझ:
संख्या:
राऊंड नेक टीशर्ट:
XS - 34:
S - 36:
M - 38:
L - 40:
XL - 42:
XXL - 44: १
वेगळी साईझ:
संख्या:
व्ही-नेक टीशर्ट:
XS - 34:
S - 36: १
M - 38: १
L - 40:
XL - 42:
XXL - 44:
वेगळी साईझ:
संख्या:
मायबोली हँडबॅग: १
राउंड नेक आणि व्हि नेक
राउंड नेक आणि व्हि नेक टिशर्टसची साइझ प्रमाणे उंची पण मिळाली तर बरे पडेल.
धन्यवाद टीशर्ट_समिती आणी
धन्यवाद टीशर्ट_समिती आणी विनय ,
समजले .
आता काही बदल करत नाही मग त्यात (जर वेगळी साईज नसेल तर संख्या Redundant होऊन जाईलच)
मला कॉलरवाला पण साईज बाबत
मला कॉलरवाला पण साईज बाबत कन्फुज्ड आहे कारण काही ब्राण्ड मध्ये ४० तर काही मध्ये ४२ लागतो!
आरडर नोंदवली आहे .....
आरडर नोंदवली आहे .....
यावेळेस बॅग पण उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाचे आभार. तसेच टीशर्ट मध्ये variations ठेवल्याबद्दल धन्यवाद ...........
पोस्टेजचा खर्चही द्यावा
पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.>>>> पेण - रायगड साठी किती असु शकेल खर्च अंदाजे
अरे केदार ववि ला ये आणि
अरे केदार ववि ला ये आणि पोस्टेज खर्च वाचव ...
अरे केदार ववि ला ये आणि
अरे केदार ववि ला ये आणि पोस्टेज खर्च वाचव ... >>> अरे पण येतानाच माबोचा टीशर्ट घालून यायचाय
Pages