सवाल सारे....

Submitted by आनंद पेंढारकर on 16 June, 2013 - 04:35

नसेल प्रीती उरात ज्यांच्या खुशाल सारे
कसे जगावे करून कुणाला बहाल सारे ?

तुझेच अस्तित्व होत जाते हरेक उत्तर
तुझ्या अलिकडे तुझ्या पलिकडे सवाल सारे

कितीक खटले मनात माझ्या तुझ्याविरोधी
तुझ्याच बाजूस कां झुकावे निकाल सारे ?

निरभ्र आकाश मेघ नव्हताच सावळाही
तुझे बरसणे मनी झिरपणे कमाल सारे

तुला पहाता झरा झुळझुळे अखंड गात्री
उगाच खांद्यावरी वहाती पखाल सारे

रहा मुलाकातमे हमेशा सिलासिलासा
कही जुबासे निकाल ना जाये खयाल सारे

आनंद पेंढारकर….

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

छान.

अवडली गझल काफिया रदीफ मस्त आलेत
दुसरा व चवथा शेर जास्त आवडले दुसर्‍याची दुसरी ओळ तर फारच

असा एकदमच एक हिंदी शेर दिल्याने बुचकळ्यात पडलो ना मी राव !! असो पण असे चालते का हे तज्ज्ञाना विचारावे म्हणजे एक मराठी ओळ एक हिंदी असे शेर एकाच गझलेत (द्वैभाषिक गझल की काय ते ) वाचले आहेत पण अख्खा शेरच हिंदी बाकी गझल मराठी हे काय्तरीच वाटत आहे
असो
त्यातही त्या शेरात सुरुवातीला रहा(एकवचनी) आणि मग रदीफ सारे(अनेकवचनी) हे ही समजले नाही

कितीक खटले मनात माझ्या तुझ्याविरोधी
तुझ्याच बाजूस कां झुकावे निकाल सारे ?

चांगला शेर. Happy

तुझेच अस्तित्व होत जाते हरेक उत्तर
तुझ्या अलिकडे तुझ्या पलिकडे सवाल सारे

कितीक खटले मनात माझ्या तुझ्याविरोधी
तुझ्याच बाजूस कां झुकावे निकाल सारे ?<<< चांगले शेर!

शब्दांचे नैसर्गीक वजन हा गेल्या काही दिवसात तिसर्‍यांदा चर्चेस येत असलेला मुद्दा आहे. तसेच 'वाहती'चे 'वहाती' वगैरे, हे वेगळे!

कही जुबासे निकाल ना जाये खयाल सारे <<< येथे 'निकल' हवे आहे का? आणि 'खयालसा रे' हवे आहे का?

असे करण्याचे (मराठीत उर्दू / हिंदी / परभाषिक) शेर समाविष्ट करण्याचे काही विशेष कारण आहे का?

पु ले शु!