'संग्राम'

Submitted by सुशांत खुरसाले on 23 May, 2013 - 22:42

हे संग्राम.....

दोन विरूद्धार्थी दिशांचे प्रवाह एकत्रुन
झालेले ऊर्जेचे अंतरिम महोत्सव.....

आणि त्यांच्यातलं चिरंजीवी शिरकाण....

प्रबळ विरोधाभासी इच्छांच्या दंगली...

ज्यांच्यापासून जन्म घेतात-- एकांसाठी
इतिहासाची सुवर्णपाने....

आणि दुसर्यांच्या इतिहासावर ओघळते -
रक्ताची लावण्यवती निलिमा....

कित्येक वर्षे संग्रामांची ही आवर्तने चालतात-
सृष्टीच्या मनात अन् मनातल्या सृष्टीत...

अन् तरीही..
वाट पाहावी वाटते त्या क्षणाची जेव्हा कुण्या प्रेषिताची गरज उरणार नाही..

पृथ्वीचा अक्ष तेव्हाच सांभाळला जाईल कदाचित--
अंशाअंशाने ढासळणारा माणुसमनाचा अक्ष सांभाळल्यावर...!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पृथ्वीचा अक्ष तेव्हाच सांभाळला जाईल
कदाचित--
अंशाअंशाने
ढासळणारा माणुसमनाचा अक्ष
सांभाळल्यावर...!>>>

मस्त आहे...
संग्रामाचे बरेच पैलू दाखवता येऊ शकतील... (वै. म.)

वा खुरसाले उत्तम आशय विषय ताकदीने हाताळलात

मुटे सरांचा एक शेर आठवला........

घमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणासांचे यशू बुद्ध होते

खूप आवडली कविता
(एक शंका: रक्ताची ..निलिमा ???? लालिमा असं हवय का हो ते ? पण तिला..बहुधा हेही 'त्याला' असं असतं पण 'तिला' म्हणालात ते बरोबरच म्हणा कारण पुढे असं जे लावण्यवती म्हणालात ते ज्जाम म्हणजे ज्जामच भारीये !!:) )

~वैवकु

कित्येक वर्षे संग्रामांची ही आवर्तने चालतात-
सृष्टीच्या मनात अन् मनातल्या सृष्टीत...

घायाळ करतात अन संपत नाहीत संघर्षांचे इतिहास .भूगोलाच्या रक्ताळलेल्या छाताडावर पुनःपुनः वार..

खूप महत्वाच्या विषयावर लिहिलेत सुशांत. आवडली रचना.

खुरसाले पुन्हा वाचली मी कविता
अक्षरशः विजोड ठरावी अशी आहे ही

पण खुरसाले हिला प्रचंड ताकदीचं नेमकं सादरीकरण हवं बरका (स्टेजवरचं म्हणतोय मी !!)
तुमच्याकडून प्रत्यक्ष ऐकायलाच हवीये ही कविता असे वाटतेय जमल्यास आजच फोन करतो मला तुमच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकायचीये ही कविता

चला बोलूया तर मग आज
नक्की ना ?...डन तर मग !!

वैभवजी फोन जरूर करा .फक्त 5 वाजेनंतर..
सध्या जरा बाहेर आहे ..तेव्हा निवांत बोलू..आपणा सर्वांचं प्रेम पाहून मन भरून आलं आहे..
आभार मानायला शब्द नाहीत..
तरीही.या प्रोत्साहनाबद्दल सर्वांचा
सर्वांचा ऋणी आहे मी..

कविता
अक्षरशः विजोड ठरावी अशी आहे ही
पण खुरसाले हिला प्रचंड ताकदीचं नेमकं सादरीकरण
हवं बरका (स्टेजवरचं म्हणतोय मी !!)>>>

वै. व . कुं. ना अनुमोदन...
मलाही ऐकायला आवडेल बरं सुशांतभौ...!!

पिंपळे रावसाहेब कुठेही काहीही विचारू नका
तुमच्या घरापाशीच राहतात ना खुरसाले रावसाहेब त्याना प्रत्यक्ष भेटून विचारत चला
बाकी धागा वर आणण्याच्या ह्या ट्रिक्स जुन्या झाल्यात आता Wink

वैभुदा...:हाहा:
Wink