काय होतं आणी काय होतं आहे !

Submitted by परब्रम्ह on 5 May, 2013 - 11:18

काय होतं आणी काय होतं आहे ?
एखादि गोष्ट सुरु होते कशी आणी कालांतराने त्या गोष्टीच्या मुळाशी असलेली कारणे कशी विसरुन मागे पडतात आणी दुसरेच कुठले शीर्षक त्याला कसे चिकटते ह्याची काही उदाहरणे येथे देतो आहे.
१). रक्षाबंधन - कालामानाने मुळ अर्थ बदलुन एकाच दिशेला मनुष्य कसा एखादि परंपरा घेऊन चालत राहातो ह्याचे हे एक मोठे आश्चर्यजनक उदाहरण - जेव्हां सर्वप्रथम सुर आणी असुरांचा संग्राम होणार हे ठरले, तेव्हां असुरांनी सरळ सांगितले कि इंद्राची राजधानी अमरावती वर आक्रमण करुन ती जींकुन वर आम्ही इंद्रपत्नी "शची ", हिला सुद्धा घेऊन जाऊ.
भयभीत होऊन इंद्रपत्नी शची ने एक सुवर्ण मण्यांत ओवलेला एक कंठा इंद्राच्या उजव्या मनगटावर ( कारण उजव्या हाताने हा शस्त्र धारण करतो, युद्ध करतांना सतत मनात जाणीव रहाते कि ह्या हातावर एक पवित्र बंधन आहे ज्याचा सन्मान राखणे अत्यंत आवश्यक आहे ), बांधला आणी त्याला विदित केले कि ह्या बंधनाचे संपूर्ण दायित्व तुमचे आहे. त्याची रक्षा, त्याचा सन्मान, त्याचे प्रेम ( प्रेम ह्याचा अर्थ ईथे अन्य प्रकारे घेऊ नये ), ह्या सर्वाचे तुम्ही आधार आहात.
तेव्हां आता तुम्ही रक्षा करा.
ही होती ती पहिली राखी जी शचीने आपल्या पतीच्या हातावर बांधली होती.
( इंद्रानेही ह्या वचनाचा मान राखुन असुरांचा पराभव केला होता ).
राखी कोणीही कोणालाही बांधावी, ते एक प्रेमाचे, आपुलकिचे, मैत्रीचे, स्नेहाचे, माणुसकीचे बंधन आहे.
त्यावर निव्वळ भावा-बहिणींचाच हक्क आहे असे अजिबात नाही.

२). लग्नाची हळद - लग्न होण्यार्‍या मुलीच्या अंगावर हळद लावली जाते.
आता हळद का लावली जाते आणी मध किंवा आणखीन काहि का नाही हे सर्वांना ज्ञात असावे.
ज्यांना हे माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो.
हिंदु धर्माचे तीन मुख्य अधिष्ठाते देव आहेत. त्यां मध्ये ब्रह्मा निर्मीती करतो, हा आदी प्रजापती आहे आणी ह्याला प्रजा उत्पन्न करण्याचे व वाढविण्याचे कार्य दिलेले आहे.
ब्रह्मा हा आदि तीन गुणांमध्ये ( तीन गुण - सत्व, रज, तम ) रज ह्या गुणाचा अधिष्ठाता देव आहे, ह्या तीन गुणांचे तीन मुळ रंग निर्मिलेले आहेत ते असे. . . . सत्व गुण - नीळा रंग, रज गुण - पिवळा रंग, तम गुण - तांबडा वा लाल रंग.
ब्रह्मदेवाची आज्ञा आदि काळापासुन शिरोधार्य मानुन " आता आम्ही विवाह-बद्ध होऊन, हे देवा ! तुझ्या आज्ञेप्रमाणे प्रजा वाढवु, उत्पत्ती करु, म्हणुन हे ब्रह्मा, आम्ही तुझ्या रजोगुणाचा आधार घेऊन हे कार्य करु, ह्या आदिगुणाचे प्रतिक म्हणुन आम्ही पीत रंग धारण करतो आहोत, आम्हावर कृपा असु दे ".
आणी दुसरी महत्वाची गोष्ट ही, कि पिवळा रंग हळकुंडा पासुनच निर्माण करायचा कारण हळद हे खूप औषधी मूळ ( वनस्पतिचे मूळ ), आहे, ह्याच्या लेपाने शरिरावरील कांती उजळ आणी रोग मुक्त राहाते.
३). जय बजरंग बली - असं म्हटलं कि वाटतं आपण किती छानपणे मारुतीला उच्चस्वराने आळवतो आहोत !
खरं म्हणजे मारुती असं काही ऐकलं कि विचार करीत असावा . . . . काय आता लोकांना काय समजुन सांगावं कि अरे भक्तांनो ! ! !
अपभ्रंश केला आहे कित्येक वर्षांपासुन तुम्ही माझ्या नांवाचा . . . . हे नांव मला मिळालेलं एक अतिप्राचीन वरदान आहे.
आणी ते आहे . . . . " वज्र अंग बली भवः ", वज्रासारखे अंग तुला लाभो .
अरे भक्तांनो ! म्हणा " जय वज्र अंग बली " ||

आणखीन असे पुष्कळ उदाहरणे आहेत जे आपल्याला कधी ज्ञात नव्हते, आणी बाकिचे म्हणतात म्हणुन आपणही तसेच करण्याआधी व्यवस्थितपणे खरा अर्थ व उद्देश्य उमजुन केले तर निश्च्चीतच खरा लाभ मिळेल आणी समजुन केल्यामुळे नक्की काय व का केले आहे तेसुद्धा समाधान राहील.

तुम्हाला ज्ञात असलेले असे मुळ उद्देश्य ईथे विदीत करुन आम्हाला उपकृत करावे . . . .

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभय ९,
१). तुमचे ह्या जन्माचे मन खूप हळवे असावे.

२). धार्मिक विषयाची उपजतच आवड असावी, म्हणुन तुम्ही त्यांचे ते अनुभव ऐकत होतात.

३). पूर्वजन्मीची एखादी बाब वा गोष्ट ह्या अनुभव ऐकण्यात कुठेतरी कमि-जास्त प्रमाणात साम्यता दर्शवते.

४). देवावरच्या प्रेमामुळे, दैवी गोष्टींकडे आपला आपसुकच कल असतो, आणी अश्या काही गोष्टी कानावर आल्या कि एखादी कळ फिरविल्याप्रमाणे अचुक परिणाम दाखवते.

५). देवाकडे जी ओढ ह्या मनाला लागली आहे, पण काही कारणांमुळे त्यात जास्त काही प्रगति होऊ शकत नसल्याने, आपण देवापासुन दूर आहोत, वा देव आपल्या कडे का लक्ष देत नाही असा एक भाव मनात खोलवर कुठेतरी बसलेला असतो. अश्या विशीष्ट अनुभवांची कहाणी ऐकल्यावर मनाचा बांध फुटतो आणी मग ही भावना अति-तीव्रपणे प्रवाहित व्हायला सुरुवात होते, ह्यास तुम्ही स्वतः च काय दुसरे कोणीही रोखू शकत नाही.

६). कुठलेही चांगले काही ऐकले कि ही कळ फिरते.

७). आपण फक्त आपल्या स्वतःला कधीही एकटा समजु नये, हा परब्रह्म सगळीकडे सारखाच भरुन राहिला आहे, आणी खरे तर तोच आहे जो खरोखरच ह्या संपूर्ण चराचरात एकटा आहे, म्हणुनच तर त्याने " एको हं, बहुस्याम् ", ( मी एकटाच आहे, आता बहु म्हणजे एकापेक्षा जास्त होतो ), असे उमजुन आपल्याच मायेच्या आधारे सर्व चराचर असे निर्मिले कि कोण त्याही दोन गोष्टी वरुन एक सारख्या वाटु नयेत.

८). अभय ! आपण सर्व एकच आहोत आणी खरे एकटे आहोत, तेव्हा हा विचार सारुन तत्व जाणुन घ्या, ज्ञान संपादन करा, तह्य जाणुण घ्या, खरा कंसेप्ट समजुन घ्या . . . . म्हणजे असा हवा-हवासा वाटणारा त्रास पुन्हा होणार नाही.

त्या विभुतिंचा तो काय अनुभव होता हे जाणल्याशिवाय मी ईथे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

तो कितपत तुमच्यासाठी समाधानकारक आहे हे माहिती नाही.

तरी कृपया अवश्य कळवावे, आणी झाल्यास तो अनुभवही तिकडेच लिहुन पाठवावा.

तो आहे, सर्वत्र आहे, तुमच्या ह्या शरीराच्या आंत आणी बाहेर ही आहे, जाणुन घ्या, सर्व जगताचे अनुभव येतील आपसूक.

नमस्कार . . . .

इमेल डीलीवरी पुन्हा फेल झाली आहे, आता ईथुनच हे पाठवतो आहे.

व्वा, सुंदर अभ्यासपूर्ण चर्चा, सगळ्यांच्याच पोस्ट मधुन उपयुक्त माहिती "नव्याने" मिळत आहे. धन्यवद.

हॅल्लो !

hoe are you guys ? I'm Avinash, from oslo. can read marathi but cannot type like you guys,

चुक्त तॅपिन्ग क्रत्तन, I want to say , when I type, its not like english, may be the combo is diff.

हॅलो again !

what is this guy para-brma sayin ? looks like some points about a holy man ?

is this part of site is about a religion ? then am at a wrong place,

धागा छान आहे. निवांतपणे वाचायला हवा. खुप मुद्द्यांची सरमिसळ होतेय असे वाटते.

is this part of site is about a religion ? then am at a wrong place,

अविनाश, वर नविन लेखनवर टिचकी मारा.. इतरही पार्ट दिसतील साईटचे... फक्त धार्मिक नाहीय ये साईट. तुम्हाला नक्कीच आवडेल ही साईट.

काहीच्या काही. खोट्या गोष्टी कसल्या पसरवाताय.

अहो, परब्रह्म अवतार कार्य संपवा आता.

उगीचच ओढून ताणून शिवाला वैदीक देवतां मध्ये ओढू नका.

परब्रम्हजी,
खुपच छान वाटले. मन भरुन आले. कारण इतके सुंदर मार्गदर्शन आजपर्यंत कोणीही केले नाही अश्या पध्ततीने कधी विचारच केला नाहि अथवा कोणी सांगीतलेही नाही. आपण सांगीतल्याप्रमाणे सुरु करतो. आणखी माहीति तीकडे दीली आहे.

लिंबूटिंबू, अन्जु, साधना, मी आर्या, अभय . . . . सर्वांस नमस्कार व धन्यवाद.

--------------
---------------------
----------------------

सूनटून्या . . . नमस्कार,

काहीच्या काही. खोट्या गोष्टी कसल्या पसरवाताय. > > > > कोणत्या गोष्टी खोट्या वाटल्या ? त्या पसरवुन मला काय मिळत आहे असं वाटलं तुम्हाला ?
मिळत असलं तरी मी असल्या मिळविण्यासाठी कधी घृणित कार्य करीत नाही.
--------
अहो, परब्रह्म अवतार कार्य संपवा आता. > > > >
क्षमा करा, पण परब्रह्म कोणताच अवतार घेत नाही, तो निर्गुण असतो, आणी कोणतेही कार्य करण्यासाठी कुठल्याही गुणाची आवश्यकता असते.
आपले सारे कार्य त्याच्या मायेच्या आधारे होत असते, आणी ईथे आमच्याकडे काही माया नाही.
आणी कृपा करुन नीट पहा , मी ईथे परब्रह्म नाही परब्रम्ह म्हणुन आलो आहे, अवतार घेणे दूरच आहे Happy
---------
उगीचच ओढून ताणून शिवाला वैदीक देवतां मध्ये ओढू नका.> > > >
हे असे मी कोठे विदीत केले कि मी शिवाला ओढुन ताणून वैदिक देवतांमध्ये आणतो आहे ? त्याची काय आवश्यकता आहे ?
शिव आधी होता कि वेद आधी झाले ? शिवाची व्याख्या जर तुमची भिन्न असेल तर मी काय करु ?

हे वेगळे आहे, ते वेगळे आहे . . . . हा म्हणजे तो नाही आणी तो म्हणजे हा नाही ?

जे दिसतं वा जाणवतं त्यालाच प्रमाण मानुन तुम्ही चालत आहात आणी मला आग्रह करता ? कारण माझ्या दृष्टीने मला जे उमजतं ते मी वाटुन घेतो . . . . आपणांस नाही पटत तर काहिच समस्या नाही . . . . निदान मी वेडे-वाकडे बोलुन कोणाचा अपमान तर करीत नाही ना ? वा कोणास अद्वा-तद्वा बोलुन घालुन - पाडुन तर बोलत नाही ना ? मग एव्हढा त्रास का करुन घेता आहात ?

कृपया, तुम्हाला जे पटत नाही ते त्याचं उदाहरण देऊन सांगा . . . .मला खरंच पटलं तर मोकळ्या मनाने तुमची गोष्ट कबूल करेन . . . . .आणी आता ईथे उगीचच असा उल्टा विचार करु नका, कि मला पटलं तरीही ते मी नाही पटलं असं म्हणेन . . . .
नमस्कार . . . .

तुम्हाला मेल केली आहे . Happy

गोविंद गोविंद ।
मना लागलिया छंद ॥१॥

मग गोविंद ते काया ।
भेद नाही देवा तया ॥२॥

आनंदले मन ।
प्रेमें पाझरती लोचन ॥३॥

तुका म्हणे आळी ।
जेवी नुरे चि वेगळी ॥४॥

पुढे . . . .

सर्वांस सास्टांग नमस्कार . . . .

मी आत्ताच श्री विवेक नाईक, ह्यांना ही खालील प्रतिसादाचे पोस्ट पाठवली, वाटलं ह्या धाग्यावरही ही माहिती उपयोगी पडु शकेल म्हणुन ईथे सुद्धा तिच पेस्ट करीत आहे . . . .

विवेक,
आभारी आहे,
तुमचे म्हणणे अगदी खरे कि, मंत्र म्हणतांना ह्रुदयन्यास, करन्यास करायचे असतात.

मंत्रोच्चार करीत असतांना मनुष्याची वाणी अतिशय शुद्ध हवी असते ( म्हणुनच आपोआपच संस्कृत भाषेचा सराव झाला कि वाणी शुद्ध होऊन ह्या क्रियेत माणुस पारंगत होतो, त्याला कुठल्याही भाषा शिकतांना काहिच अवघड उच्चारण राहात नाही ), ,. . . . त्याच बरोबर शब्दांवे र्‍हस्व, दीर्घ, स्वरांचे चढ्-उतार, आवाजाची पातळी, हस्त आणी भावमुद्रांबरोबर अश्या वेळेस ज्या जागेत मंत्रोच्चार होत आहेत व त्यांचे बसण्याचे आसन, त्याची पातळी, दीशा, मुहुर्त (ह्यात दिवस, प्रहर, पक्ष, ऋतु, मास सर्वच येतं), स्वतः मंत्रोच्चार करणार्‍याची शारीरिक अवस्था . . . . ह्यांचा ही संपूर्ण विचार करायचा असतो ह्या सर्वांचे अचुक संतुलन जमले, कि मंत्रोच्चार करतांना आसपासचे वात एक विशीष्ट प्रकारे वलयांकित होते, . . . . वलयांकित वातावरणामुळे जे काही उद्दीष्ट मंत्र म्हणण्यामागे असते ते पूर्ण होऊन त्या-त्या दैवताला पोहोचते. आणी हे पोहोचविण्यासाठी जे माध्यम असावे तेही सर्वत्र भरलेले परमतत्वच असावे, कारण ह्याशिवाय अन्य कोणता मार्ग असावा हे ज्ञात नाही. . . . . . कारण माध्यमा शिवाय संदेशांची दिशा स्थिर राहाणे शक्य नसते, माध्यम असले कि आपल्या स्वरांनी निर्माण केलेल्या आवर्तनांना दिशे बरोबरच गति मिळते.

आणी ईथेच हे सुद्धा कळते कि " सर्व देव नमस्कारम् केशवं प्रति गच्छति ", म्हणजे का आणी कसे . . . . .

पण तुमचे हे म्हणणं सुद्धा अगदी-अगदी खरे आहे कि आजकाल हे सर्व आवश्यक ज्ञान आणी माहिती जवळ - जवळ लुप्तच होत आली आहे.

आणी असा जर विचार केला तर ह्यानुसार हे स्पष्ट होते कि आजच्या काळात पूजा, होम्-हवन, यज्ञ , अनुष्ठानं करुनही काही जास्त फरक अथवा हवा तसा परिणाम का दिसत नाही.

आणी म्हणुनच मनुष्याने जास्त काही अवडंबरे करण्याच्या भानगडित न पडता सरळ ह्या सर्वांचा जो एकच गंतव्यार्थ आहे तो जाणुन घेऊन परमेश्वर प्राप्तिचा त्या प्रमाणे मार्ग अवलंबला पाहिजे.
कारण परमेश्वराने आपल्याला आणखीन एक मार्ग दिला आहे, तो आहे आपल्या ईच्छाशक्तिचा आणी मनोबलाचा, भक्तिचा मार्ग . . . . ह्या मार्गाने आपण " त्याला ", सत्वर प्राप्त करुन घेऊ शकतो.

नमस्कार . . . .

परब्रम्ह

धन्यवाद,

आपण वर दिलेल्या अमुल्य माहिती बद्दल,

मंत्र उच्चाराचे आणखी एक अभिन्न अंग म्हणजे हस्तमुद्रा

गायत्री मंत्रा बरोबर म्हणताना २४ हस्तमुद्रा कराव्यात अन्यथा गायत्री मंत्र निष्फल होतो अश्या अर्थाचा एक
श्लोक आहे.

|| मुद्रा न जायते गायत्री मंत्र निष्फला भवेत ||

गायत्री मंत्र हा २४ अक्षरांचा असुन प्रत्येक अक्षराला एक ह्या प्रमाणे मुद्रा कराव्यात अशी प्रथा आहे.

वरवर साधारण दिसत असलेल्या हस्तमुद्राचे अंतरंग खुपच खोल आहेत.

अगदी देवि पुजेतही दश मुद्रांचा सहभाग असतोच. त्यातली प्रमुख मुद्रा म्हणजे त्रिखंडी मुद्रा, करायला जरा कठिण व अर्थाला ही कठिण अशी.

आकाश नील,

नमस्कार . . . . आपल्या प्रश्नाचे निरसन करण्याचा तोकडा प्रयत्न केला, मन तुमचे मोठे आहे, कि ह्या उत्तराने ही तुम्ही समाधान दर्शवत आहात, खरे देवस्वरुप आपणच आकाश . . . . आणी ज्ञानाच्या अथांग सखोलतेचे प्रतिक म्हणजे नील . . . . धन्य आहात |

Autoparrotism व Mutual Rubrification, असे दोन शब्दप्रयोग आम्ही प्रचलित केले होते, ते इथे प्रकर्षाने आठवतात.

परब्रम्ह,

आपल्या सर्व posts वरून मायबोलीवरील सर्वच जण आपल्या ज्ञानाची व अनुभवाची खोली जाणतात. नुसते तात्पुरते खोटे नाव घेण्यात काय आहे? आपले नाव सार्थ आहे.

पण हे विषयांतर होते, आणि इतरांना "अहो रूपं ..." ची आठवण होते :).

परब्रम्हजी ,
सप्रेम नमस्कार .
अतिशय उपयुक्त माहिती व उत्कंठा वाढवणारी चर्चा वाटतेय कि सर्वानीच सक्रीय सहभाग नोदवला आहे .मात्र एक विनंती करावी वाटते कि ज्यांना काही आक्षेप असतील ते आक्षेप सध्या सरळ भाषेतून मांडला जाऊ शकतो धार्मिक चर्चा वाद विवादा कडे न जाण्याची दक्षता सर्वांनीच जर घेतली तर आनंद द्विगुणीत होईल इथे ज्ञानात भर पडणे हाच उद्देश असावा . न राहवलयाने बोटे वळली आणि उमटले . कुणाला काही शिकवण्याचा हेतू नाही .क्षमस्व

Pages