Submitted by विनार्च on 6 June, 2013 - 06:51
दरवर्षी असाच
अचानक
तू मला गाठतोस,
ह्यावेळी फसणार नाही,
तुझ्या भुलाव्याला
ह्या माझ्या भ्रमाला
मोडीत काढतोस....
काहीच कसं
ऐकून घेत नाहीस
नकाराचा पर्यायही
बाकी ठेवत नाहीस
दुनियादारीचा चढवलेला मुखवटा
खसाखसा पुसून काढतोस....
जेवढा बाहेर......
तेवढाच
मनातही कोसळतोस....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा ! मस्त. शॉर्ट अँड
अरे वा ! मस्त. शॉर्ट अँड स्विट
पहिलीच ना ? खुप खुप शुभेच्छा !
अवल, धन्यवाद ! माझ्या
अवल, धन्यवाद ! माझ्या वेड्यावाकड्या प्रयत्नाच्या कौतुकाबद्द्ल
मस्तच ग
मस्तच ग
खुप छान...! मला ही सरळ आणि
खुप छान...!
मला ही सरळ आणि साधे शब्द प्रयोगच आवडतात...!
कळायला थोडे सोपे जातात