Submitted by सई गs सई on 5 June, 2013 - 05:09
वाऱ्याचं अंग असं निःसंग
नातंगोतं माझं तसं राखरंग
विटके मिटके समईचे दिवे
आत येणेजाणे जुनावले नवे
दिठीच्या भेटी आभाळी उडाल्या
मनाच्या गाठी तुटल्या सुटल्या
वेडावत आल्या कालच्या साऊल्या
झपाटून मेल्या खेळाच्या बाहुल्या
- सई
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज उदासवाणे मज वाटे कशाने..
आज उदासवाणे मज वाटे कशाने.. जुने पारवे फडफडती पुन्हा नव्याने..
छान. शेवटचे वाक्य झपाटून
छान.
शेवटचे वाक्य झपाटून आवडले - "झपाटून मेल्या खेळाच्या बाहुल्या"
धन्यवाद सुसुकु!
धन्यवाद सुसुकु!