जगदम्बे ची प्रार्थना -२

Submitted by विनायक. दि.पत्की. on 12 March, 2013 - 07:52

जगदंबेची प्रार्थना-2
(अंबा जननी विश्वाची माया आदी पुरुषाची )
अनंत हे विश्व निर्मिले तू जगतजननी,
कणकणात वास तुझा हे जाणले मी मनोमनी.
हे आदी शक्ती तू असे या विश्वाची सर्वेश्वरी,
सकळ शिरोमणी,तू असे त्या सर्वोच्य शिखरावरी ||१||
ठाव हीन हे जगदंबे,तव पश्चात न कोणी.
तव अंश सर्व देवता,जाणती राजे आणिक मुनी.
भजिले जे देव असंख्यात मी ह्या भू वरी,
दिसे रूप तुझेच सर्वत्र हा हर्ष त्या वरी ||२||
मन माझे चंचल आणिक सैरभर,
शक्तीविना होऊन दुर्बल, वागेल ते गैर.
पराभूत करण्या ह्या शत्रूस मज देई शक्ती,
पुरे करी मनोरथ,मज देई नितांत भक्ती ||३||
स्तवन तव व्हावे नित्य आणि एकाग्र,
मोह पाश सुटोनी सर्व, मी बदलावे अमुलाग्र .
जन्मोजन्मी न कळे अगाध महिमा तुझा,
बाळ म्हणावे तू मजला हा ध्यास माझा ||४||
ढळो न दृष्टी न वसो कुविचार मनी,
अपशब्द नसो वचनी,सुमधुर शब्द पडो कानी.
सन्मान तो तुझा असे, मी तर अपमानाचा धनी.
पराजयात हि असो उच्य संस्कार मनी.||५||
विश्व खेळाचा हा डाव तू ठरवलेला पावलोपावली,
व्यर्थ असे माझी चिंता,तू तर कल्पवृक्षाची सावली.
स्वार व्हावे हे सरस्वती, तू मम जिव्हेवरी.
निर्भय होऊनी मी वदावे,वाचस्पती परी.||६||
राहू दे मज दिन,नसेच काही संकट आजवरी,
बळ न वाढो रीपुंचे,हे हि मनोरथ पूर्ण करी.
नेई पैलतीरी सुखरूप, मज हे सिंधुसते.
माते,तव गुण गाया हि भाग्य लागते||७||
बालक मी अजाण,आणिक धावतसे अनवाणी
कवटाळुनी मजला हे आई,मस्तकी ठेव वरदपाणी.
शोधीतसे मी तुजला व्याकुळतेने, हे जगत जननी.
मला न कळले कधी हे आई,तूच मम ह्रदय निवासिनी ||८||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनायक,

फारच सुंदर रचना आहे,

मोह पाश सुटोनी सर्व, मी बदलावे अमुलाग्र
वाटच पाहातो आहे, कळाले आहे केव्हाचे, वळणाचीच आता प्रतिक्षा आहे . . . .

नमस्कार . . . .