काय होतं आणी काय होतं आहे !

Submitted by परब्रम्ह on 5 May, 2013 - 11:18

काय होतं आणी काय होतं आहे ?
एखादि गोष्ट सुरु होते कशी आणी कालांतराने त्या गोष्टीच्या मुळाशी असलेली कारणे कशी विसरुन मागे पडतात आणी दुसरेच कुठले शीर्षक त्याला कसे चिकटते ह्याची काही उदाहरणे येथे देतो आहे.
१). रक्षाबंधन - कालामानाने मुळ अर्थ बदलुन एकाच दिशेला मनुष्य कसा एखादि परंपरा घेऊन चालत राहातो ह्याचे हे एक मोठे आश्चर्यजनक उदाहरण - जेव्हां सर्वप्रथम सुर आणी असुरांचा संग्राम होणार हे ठरले, तेव्हां असुरांनी सरळ सांगितले कि इंद्राची राजधानी अमरावती वर आक्रमण करुन ती जींकुन वर आम्ही इंद्रपत्नी "शची ", हिला सुद्धा घेऊन जाऊ.
भयभीत होऊन इंद्रपत्नी शची ने एक सुवर्ण मण्यांत ओवलेला एक कंठा इंद्राच्या उजव्या मनगटावर ( कारण उजव्या हाताने हा शस्त्र धारण करतो, युद्ध करतांना सतत मनात जाणीव रहाते कि ह्या हातावर एक पवित्र बंधन आहे ज्याचा सन्मान राखणे अत्यंत आवश्यक आहे ), बांधला आणी त्याला विदित केले कि ह्या बंधनाचे संपूर्ण दायित्व तुमचे आहे. त्याची रक्षा, त्याचा सन्मान, त्याचे प्रेम ( प्रेम ह्याचा अर्थ ईथे अन्य प्रकारे घेऊ नये ), ह्या सर्वाचे तुम्ही आधार आहात.
तेव्हां आता तुम्ही रक्षा करा.
ही होती ती पहिली राखी जी शचीने आपल्या पतीच्या हातावर बांधली होती.
( इंद्रानेही ह्या वचनाचा मान राखुन असुरांचा पराभव केला होता ).
राखी कोणीही कोणालाही बांधावी, ते एक प्रेमाचे, आपुलकिचे, मैत्रीचे, स्नेहाचे, माणुसकीचे बंधन आहे.
त्यावर निव्वळ भावा-बहिणींचाच हक्क आहे असे अजिबात नाही.

२). लग्नाची हळद - लग्न होण्यार्‍या मुलीच्या अंगावर हळद लावली जाते.
आता हळद का लावली जाते आणी मध किंवा आणखीन काहि का नाही हे सर्वांना ज्ञात असावे.
ज्यांना हे माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो.
हिंदु धर्माचे तीन मुख्य अधिष्ठाते देव आहेत. त्यां मध्ये ब्रह्मा निर्मीती करतो, हा आदी प्रजापती आहे आणी ह्याला प्रजा उत्पन्न करण्याचे व वाढविण्याचे कार्य दिलेले आहे.
ब्रह्मा हा आदि तीन गुणांमध्ये ( तीन गुण - सत्व, रज, तम ) रज ह्या गुणाचा अधिष्ठाता देव आहे, ह्या तीन गुणांचे तीन मुळ रंग निर्मिलेले आहेत ते असे. . . . सत्व गुण - नीळा रंग, रज गुण - पिवळा रंग, तम गुण - तांबडा वा लाल रंग.
ब्रह्मदेवाची आज्ञा आदि काळापासुन शिरोधार्य मानुन " आता आम्ही विवाह-बद्ध होऊन, हे देवा ! तुझ्या आज्ञेप्रमाणे प्रजा वाढवु, उत्पत्ती करु, म्हणुन हे ब्रह्मा, आम्ही तुझ्या रजोगुणाचा आधार घेऊन हे कार्य करु, ह्या आदिगुणाचे प्रतिक म्हणुन आम्ही पीत रंग धारण करतो आहोत, आम्हावर कृपा असु दे ".
आणी दुसरी महत्वाची गोष्ट ही, कि पिवळा रंग हळकुंडा पासुनच निर्माण करायचा कारण हळद हे खूप औषधी मूळ ( वनस्पतिचे मूळ ), आहे, ह्याच्या लेपाने शरिरावरील कांती उजळ आणी रोग मुक्त राहाते.
३). जय बजरंग बली - असं म्हटलं कि वाटतं आपण किती छानपणे मारुतीला उच्चस्वराने आळवतो आहोत !
खरं म्हणजे मारुती असं काही ऐकलं कि विचार करीत असावा . . . . काय आता लोकांना काय समजुन सांगावं कि अरे भक्तांनो ! ! !
अपभ्रंश केला आहे कित्येक वर्षांपासुन तुम्ही माझ्या नांवाचा . . . . हे नांव मला मिळालेलं एक अतिप्राचीन वरदान आहे.
आणी ते आहे . . . . " वज्र अंग बली भवः ", वज्रासारखे अंग तुला लाभो .
अरे भक्तांनो ! म्हणा " जय वज्र अंग बली " ||

आणखीन असे पुष्कळ उदाहरणे आहेत जे आपल्याला कधी ज्ञात नव्हते, आणी बाकिचे म्हणतात म्हणुन आपणही तसेच करण्याआधी व्यवस्थितपणे खरा अर्थ व उद्देश्य उमजुन केले तर निश्च्चीतच खरा लाभ मिळेल आणी समजुन केल्यामुळे नक्की काय व का केले आहे तेसुद्धा समाधान राहील.

तुम्हाला ज्ञात असलेले असे मुळ उद्देश्य ईथे विदीत करुन आम्हाला उपकृत करावे . . . .

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा "शास्त्र" या विषयावर आहे की नाही माहीत नाही परंतु "रात्रीची नखे कापु नयेत" यामागे शास्त्रीय कारण असे होते की-

१. पूर्वी नेलकटर सारखी प्रगत उपकरणे नख काढायला उपलब्ध नव्ह्ती. चाकु किंवा सुरीने क्वचित कात्रीने नखे कापली जात.

२. रात्री आत्तासारखे दिवे नव्ह्ते. कंदील वगैरेच्या प्रकाशात काम करावे लागे.

३. त्यामुळे अंधुक प्रकाशात सुरीसारख्या हत्याराने इजा होउ नये म्हणुन हे शास्त्र होते. जे आता कालबाह्य झाले असे म्हणायला हरकत नाही.

अवांतरः डबल धागा उडवा.

पियु,
हा धागा शास्त्र ह्या विषयावर नाही, हा धागा आहे "खरे दृष्टीकोन".

तुमचा प्रतिसाद बरोबरच आहे, हो, ह्या सर्व गोष्टी ईथे लागु होतात. धन्यवाद.

अनिश्का,
लाँग टाईम ? म्हंटलं सुट्टीवर गेलात कि काय ?
रात्री कचरा बाहेर टाकु नये कारण, बाहेर अंधारात, बरेच प्राणी ( सर्व प्रकारचे ), इतस्ततः वावरत असतात, आपापली खाद्ये वा शिकार शोधीत, त्यांत काही गंभीर इजा करु शकणारे सुद्धा असतात, म्हणुन उजेड असतांना ही कामे करावित. उजेडात ह्या प्राण्यांचा वावर खूपच कमी असतो.

पियु आणी अनिश्का,
ह्या जगात रुढी, परंपरा, समजुती- गैरसमजुती पुष्कळ आहेत.
आणी परमेश्वराने आपल्याला काही अस्त्रे जन्मतःच दिली आहेत. . . ती म्हणजे, ईच्छाशक्ति ( फार भयंकर शक्तिमान असु शकते जर बरोबर उपयोग केला तर ), सारासार विचार बुद्धी, आपली स्मरणशक्ति, आपले अनुभव साठवुन ठेवण्याची क्षमता, मन.
आपली विचारधारा नेहेमी चांगली ( घनभारित = positive ) ठेवली तर कोणतिही शक्ति आपले वाईट करु शकत नाही. आणी हवे ते साध्य करुन घेता येते.

स्वामी विवेकानंदांचे एक वक्तव्य ईथे देतो आहे, हे जे काही त्यांनी विदीत केले , ते तंतोतंत खरे होते. . . . "give only ten men with pure thinking power as I possess & I shall practically show how to rotate the Earth in opposite direction".

आकाश नील,

हे विश्व फक्त (परब्रम्हाच्या) कल्पनेतच आहे (...अकल्पयत ...), कि त्याला काही अस्तित्व आहे? (प्रश्न कदाचित थोडा चुकीच्या शब्दात विचारला आहे).

What did Einstein mean when he said "Reality is merely an illusion, albeit a very persistent one"? > > > >

हे विश्व परब्रह्माच्या कल्पनेत नाही, ह्याला अस्तित्व आहे पण मायेच्या द्वारे. ह्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती हा परब्रह्म मायेच्या आधारे करतो पण स्वत: मात्र त्यात आंत-बाहेर असुनही त्या सर्वांपासुन पूर्ण अलिप्त असतो. हा फक्त द्रष्टा आहे, त्यापेक्षा आणखीन काही हा स्वतः हुन करीत नाही.

कारण काहीही करण्यासाठी गुणांची आवश्यकता असते पण हा तर संपूर्ण निर्गुण आहे, आणी निर्गुण आहे तर काही निर्माण कसे करील ?

ह्या चरचरात आपल्याला जे काही ज्ञात आहे वा ज्ञात नाही, त्या सर्वांमध्ये हा भरुन राहिला आहे, आत आणी बाहेरही.
ह्याचाच अर्थ कि परब्रह्म तत्व हेच एकमेव अबाधीत सत्य असुन बाकिचे सर्वकाही मायेचा खेळ आहे.

आधीभूतात, आधीदैवात, आधीयज्ञात, अध्यात्मात, सर्व कर्मांत, सर्व वस्तु-पदार्थाच्या सूक्ष्माति सुक्ष्म स्वरुपांत, एकच परमेश्वर ओतप्रोत भरलेला आहे. परंतु पंचमहाभूतांनी निर्मिल्या गेलेल्या ह्या शरीराने त्याला जर अनुभवायचे असेल तर एक मार्ग सांगितला आहे.
हा करुन पहावा . . . .
स्थीर सुखासनावर बसावे, डोळे मिटुन घ्यावेत, म्हणजे बाह्य जगाशी संबंध दूर होतो.
आता विचार अंतर्मुख करावा कि, ऐकु येत असुनही ऐकु नये, डोळेतर बंद आहेतच, त्वचेला हवेचा स्पर्श होत असला तरीही उमजु नये, नाकास गंध येत असला तरिही वास घेउ नये, फक्त हळु-हळु श्वासोछ्वास चालु द्यावा पण त्याचे नियमन करु नये, हे बाह्य जग वा त्यातील कोणतीही दृश्य वस्तु म्हणजे तो ( परब्रह्म ) नाही, आपले शरीर म्हणजे तो नाही, आपली ज्ञान-इंद्रीये म्हणजे तो नाही, कर्मेंद्रीये म्हणजे तो नाही, आपले मन म्हणजे तो नाही, ही आपली बुद्धी म्हणजे तो नाही . . . .
आता ह्या बुद्धीच्याहे पलिकडे जो आहे . . . . हाच तो परमात्मा . . . . परब्रह्म . हाच आहे तो, जो ह्या चरचरात संपूर्ण भरुन राहिला आहे.
आकाश नील . . . . आता इथपर्यंत पोहोचणे मोठ्या-मोठ्या योग्यांनाही जमत नाही, पण एथपर्यंत आला , कि येऊन ईथे परस्पर भाव नष्ट होतो, "तो", माझ्यात आहे, हे ज्ञान ( अज्ञान )नष्ट होउन, मीच सर्वत्र आहे आणी माझ्याशिवाय काहिच नाही हा अनुभव येतो. जसे एखाद्या महासागरातील एका किनार्‍या जवळच्या थेंबाने म्हणावे कि, मी इथे आहे आणी मी तिकडे पलिकडच्या किनार्‍या जवळही आहे, मीच आहे, दुसरे काहीही नाही, मी आता खरे तर थेंब नाही, मी तर संपूर्ण महासागर आहे, इथुन तिथुन सर्वांत मीच आहे , सर्व मीच आहे, तर मग केवळ एकच झालो . . . .

हेच ते कैवल्यपद ! हीच ती परमहंस गति . . . .

हाच तो, जो तुम्ही, आम्ही, ह्या सर्व चरचरात आहे.
ह्या अवस्थेत आल्यावर उमजुन येतं कि अहं ब्रह्मास्मि, ईथेच कळतं ही सर्व सृष्टी मायेच्या आधारावर आहे, असुनही मिथ्या आहे.

आणी ही स्थिती आल्यावर एक अनन्य साधारण परम आनंद आपल्यात परिपूर्ण भरुन . . . .अथवा आपणच हा आनंद असल्याचा अनुभव येऊ शकतो . . . . हा तो परमावधीचा अवसर आणी स्थान.

जर तुमच्या शंकेचे समाधान झाले असले तर कृपया सांगावे, अन्यथा आपण ह्याचे आणखीन खोलात जाऊन समजुन घेऊया.

धन्यवाद . . . .

फार चांगला धागा, तितकीच अप्रतिम सुरवात...

अन्यथा आपण ह्याचे आणखीन खोलात जाऊन समजुन घेऊया. >>> मला तुमचे निवेदन आवडले, मला एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणता ती स्थिती ही फक्त एक मानसिक अवस्था पण असु शकते. प्रत्येक गोष्टी पासुन अलिप्त राहाणे ही सुखाची किल्ली आहे पण त्यात जगण्याची मज्जा नाही. तुमचे काय मत?

प्रत्येक गोष्टी पासुन अलिप्त राहाणे ही सुखाची किल्ली आहे पण त्यात जगण्याची मज्जा नाही. तुमचे काय मत? > > > >
तेच ते ! ही मजाच तर नंतर वेग-वेगळे फणे उभारते !
इंद्रीये फार- फार बलवान असतात, ते मनुष्यास फसवु शकतात एव्हढे कि मनुष्य आपला ताबा हरवु शकतो.
पण एकदा का मनोनिग्रह करता आला आणी त्याची संवय झाली, कि मग आपली इंद्रीये आपल्या आज्ञेत राहतात.

उदाहरणार्थ : इंद्रीय भोगांसाठी प्राप्त झालेली इंद्रीये योग्य वेळेसाठी, पण ही इंद्रीये सरळ्-सरळ काम झाले कि काढुन बाजुला ठेवता येत नाहीत, मग काय होतं ? ह्यांचा अपव्यय अथवा दुरुपयोग पुन्हा-पुन्हा सुखाच्या ( मजेच्या ) लालसेने, आणी असाच मग मनुष्य त्या कर्मांमध्ये गुंतुन पडतो, असेच बाकिचे इंद्रीय ? जीव्हा ? चमचमित खाणे, अवास्तव खाणे आणी त्याचबरोबर अनेक व्याधी, ही त्या आवर न घालता केलेल्या कर्मांचीच फळे नाहित का ?

ही सर्व सुखे आहेत पण सर्व सुखे क्षणिक असतात, आणी ती सुखे असतात म्हणुन पुन्हा-पुन्हा हविशी वाटतात.

ह्यावर संयम हीच ती अनासक्ति क्षणैक सुखांची.

नाहितर माणुस शरिरावर ताबा ठेवण्या ऐवजी शरीर माणसावर ताबा ठेवु लागते आणी माणुस माणसातुन उठतो . . . .
---------------------------------
अन्यथा आपण ह्याचे आणखीन खोलात जाऊन समजुन घेऊया. >>>

आणी हो . . . . ती स्थिती मानसिक नसते ( वर आधी लिहिलेली ), ती स्थिती अध्यात्मिक असते, आणी ह्या स्थितीत पोहोचलेला शारिरीक कुठल्याही अवस्थेत नसतो, त्याची अवस्था आता मी महासागरातला थेंब नसुन संपूर्ण महासागरच आहे अशी होते . . . .

धन्यवाद . . . .

आता विचार अंतर्मुख करावा कि, ऐकु येत असुनही ऐकु नये, डोळेतर बंद आहेतच, त्वचेला हवेचा स्पर्श होत असला तरीही उमजु नये, नाकास गंध येत असला तरिही वास घेउ नये, फक्त हळु-हळु श्वासोछ्वास चालु द्यावा पण त्याचे नियमन करु नये

आता इथपर्यंत पोहोचणे मोठ्या-मोठ्या योग्यांनाही जमत नाही

ज्या द्रष्ट्या लोकांना हे सुचले त्यापैकी बहुधा अनेकांना हे जमले नाही, नाहीतर मनुष्यजात शिल्लकच राहिली नसती. किंवा आपण त्या द्रष्ट्या लोकाचे वारस नाही.

या कल्पनेचा शब्दशः अर्थ समजतो.बाकी काही कळत नाही, कारण मायाजात शरीर, व विचारशक्ति व बुद्धी यावरील मायेचेच अत्यंत अभेद्य आवरण. मानसिक शांति समजते. आध्यात्मिक शांति नाही.
त्यावर जास्त विचार करण्याइतकी अक्कल नाही. आध्यात्मिक शांति, चिरंतन सुख या सध्या केवळ कल्पना. कदाचित् ते आणखी काहीतरी चांगले असेल, जसे अमृत, किंवा स्वर्ग वगैरे.
सायन्स फिक्शन मधे तीनशे वर्षांनंतर मनुष्याला विज्ञानाच्या आधारे सर्वत्र संचार करता येतो अशी कल्पना केली आहे, किंवा हॅरी पॉटर मधल्या कल्पना ज्याप्रमाणे खर्‍या समजून आपण त्याचे सहा ग्रंथ नि सात सिनेमे बघतो तसेच हेहि वाचतो.

पण सर्वसामान्य लोकांना प्रत्येक गोष्टी पासुन अलिप्त राहाणे ही सुखाची किल्ली आहे पण त्यात जगण्याची मज्जा नाही
असे वाटते. म्हणजे मनुष्याला दोन्ही हवे असते, जगण्याची मज्जा नि शिवाय चिरंतन आनंद. हे कसे साधावे? बालपणीच ध्यानधारणा इ. करून बाह्य जगाशी संबंध तोडावा? मग मज्जा नाही. मज्जा हवी असेल तर ती उपभोगण्याची शक्ति आहे तोपर्यंत ती का न अनुभवावी? चिरंतन शांतीसाठी त्यानंतर प्रयत्न करावे असे असते का? मग या मायेने सीलबंद टाईट्ट पेटीत ठेवलेल्या विचारशक्तीला, बुद्धीला मायेनेच पटवावे का, की चिरंतन सुख प्राप्ती झाली!! म्हणजे कुटुंब, समाज, देश, विश्व इ. प्रति असलेले कर्तव्य यथाशक्ति पूर्ण केले आहे, आता विचारशक्ति, बुद्धि यांना न जुमानता केवळ शरीराच्या वेदना त्रास देतात तर मलमपाणी, औषधे घेणे इ. चालूच ठेवावे. नामस्मरणा सारख्या सोप्या मार्गाने आपल्याला चिरंतन शांति मिळालीच आहे, असे,या मायावेष्टित बुद्धीला मायेनेच पटवून द्यावे!

शेवटी परब्रह्म काही का असेना, मा़झ्या मनाला जर खरेच शांति लाभली असे मला वाटू लागले तर मा़झे काम झाले.

जसे अत्यंत दुर्दम्य अश्या रोगांना, पीडेला तितकीच महाकठीण उपचार प्रक्रिया लागते, किंवा जगात आर्नॉल्ड श्वार्त्झनेगर सारखे जगातील उत्तम बॉडी बिल्डर व्हायचे असेल तर प्रचंड परिश्रम, खाण्यापिण्यावर संयम इ. करावे लागते, तसे आध्यात्मिक आनंद, चिरंतन आनंद इ. गोष्टी साठी वरील उपाय. सर्वांसाठी नाहीत.

पुढे . . . .

४). सरस्वती . . . .
ह्या देविला बुद्धीची, ज्ञानाची देवता असे समजले जाते.
मला बुद्धी दे असे म्हणुन ह्या देविची प्रार्थना केली जाते.
पण हे असे नाही आहे. . . .
सरस्वती बुद्धीची देवता नसुन ती वाणीची अधिष्ठात्री देवता आहे.
म्हणुन प्रार्थना करतांना मला उत्तम वाणी दे अथवा माझ्या मुखातुन सतत भगवन्नामाचा उच्चार होत राहो अशी कृपा कर, अथवा आपल्या वाणीला उद्देशुन जे काय असेल ते मागावे.
शुद्ध वाणी प्राप्त्यर्थ सरस्वती ची आराधना करावी.

शंकर
बुद्धी व ज्ञान ह्यांचा अधिष्ठाता देव भगवान शंकर आहे.
ज्याला बुद्धी हवी असेल त्यांने शंकराची पूजा करावी, शंकरा सारखा ज्ञानी ह्या संपूर्ण चराचरात फक्त एकच भगवान विष्णु आहे, दुसरा कोणताही देव शंकराप्रमाणे अथांग ज्ञानी नाही.

विष्णु आणी शंकर हे दोघेही श्यामवर्णि ( मेघांप्रमाणे पण थोडेसे निळसर जास्त ), असतात ह्याला कारण त्यांचे अथांग ज्ञान आहे.
ज्या-ज्या गोष्टींत अपार खोली, विस्तार, असे असते ते सर्व असेच निळसर श्यामवर्णि असते. . . . . महासागर ( खरे तर ह्यांत वरील आकाशाची निळाई प्रतिबिंबित होते ), आकाश ( वायुमंडलातील अन्य प्रकृतिंमुळे हे असले तरीही आहे हे विश्वरचनेचा एक भागच ), अंतरिक्ष ( बहुतेक श्यामवर्णि ).
हे सगळे असेच निळसर श्याम असते ह्याचे कारण त्या प्रकृतिंचे अथांग विस्तार.

ज्याला बुद्धी हवी त्यांनी शंकराची पूजा करावी.

हो . . . . आणखीन एक गोष्ट आहे . . . . वाचुन सर्वांना खूप आश्चर्य वाटेल पण हे सुद्धा एक सत्य आहे कि भगवान विष्णुचा ह्या आजपर्यंतच्या संपूर्ण चराचरातला सर्वांत मोठा, अतिमहान भक्त म्हणजे स्वतः भगवान शंकर.
शंकरासारखा दुसरा कोणीही भक्त नाही विष्णुचा.

लक्ष्मी . . . .
ज्यांना धनाची प्राप्ति हवी त्यांनी मायादेवीची ( प्रकृति वा माया ) पूजा करावी.

( लक्ष्मी, हीच धनसंपत्ती प्राप्त करुन देणारी देवी हा एक फार पुरातन काळापासुन चालत आलेला चुकिचा समज आहे ).
ह्या समुद्र कन्येचे नांव लक्ष्मी आहे आणी धन संपत्तीलाही लक्ष्मी असे संबोधतात, म्हणुन हीच ती धन प्राप्त करुन देणारी देवी लक्ष्मी असा अर्थ होत नाही ).
विष्णु खूप सगळे अलंकार घालुन असतो, आणी लक्ष्मीचा पति म्हणुन तो लक्ष्मी पति असे नाही.

परंतु आजपर्यंत जे काही करीत आलो तेच खरे असे नसते.

खरे समजुन घेणे अतिशय आवश्यक आहे.
क्रमशः

रात्रीचा कचरा बाहेर टाकू नये कारण, पुर्वी दिवे नसायचे, त्यामुळे एखादी मौल्यवान वस्तू चुकून खाली पडली असेल तर तशीच केराबरोबर बाहेर जाऊ नये म्हणून.

बुद्धी व ज्ञान ह्यांचा अधिष्ठाता देव भगवान शंकर आहे.
ज्याला बुद्धी हवी असेल त्यांने शंकराची पूजा करावी, >>>>>>>पण शंकराला तर भोळा सांब म्हणतात.

शैव पुरण वाचले तर त्यानुसार शंकर बलवान. वैष्णव पुराण वाचले तर विष्णू बलवान. देवी चरित्र वाचले तर देवी शक्तिशाली बाकीचे सर्व देव दुर्बल नक्की हा काय प्रकार आहे? ह्यामुळे कुठल्या देवाची भक्ती करावी ह्याबाबतीत कनफुजन होते.

ब्रह्मदेवाची आज्ञा आदि काळापासुन शिरोधार्य मानुन " आता आम्ही विवाह-बद्ध होऊन, हे देवा ! तुझ्या आज्ञेप्रमाणे प्रजा वाढवु, उत्पत्ती करु, म्हणुन हे ब्रह्मा, आम्ही तुझ्या रजोगुणाचा आधार घेऊन हे कार्य करु, ह्या आदिगुणाचे प्रतिक म्हणुन आम्ही पीत रंग धारण करतो आहोत, आम्हावर कृपा असु दे ".

आणी दुसरी महत्वाची गोष्ट ही, कि पिवळा रंग हळकुंडा पासुनच निर्माण करायचा कारण हळद हे खूप औषधी मूळ ( वनस्पतिचे मूळ ), आहे, ह्याच्या लेपाने शरिरावरील कांती उजळ आणी रोग मुक्त राहाते.>>>>>

एकच कहितरि सांगा.

मस्त विनोदी लेखन.

विष्णु आणी शंकर हे दोघेही श्यामवर्णि >>
शंकराला 'कर्पुरगौर' म्हणतात ना म्हणजे तो गोरा असावा.

बुद्धी व ज्ञान ह्यांचा अधिष्ठाता देव भगवान शंकर आहे. >>
गणपती बुध्दीची देवता आहे ना?

दक्षिणा,
रात्रीचा कचरा बाहेर टाकू नये कारण, पुर्वी दिवे नसायचे, त्यामुळे एखादी मौल्यवान वस्तू चुकून खाली पडली असेल तर तशीच केराबरोबर बाहेर जाऊ नये म्हणून. > > > >
किती लोकं असतील कोणत्याही काळात ज्यांच्याकडे अश्या मौल्यवान वस्तु असाव्यात ज्यांची कचर्‍यामध्ये चुकुन जाण्याची सक्यता असावी ?
असो, तरीही तुमचे म्हणणे बरोबर आहे पण ही शक्यता फार थोड्या लोकांच्याच बाबतीत.
---------
पींटू,
पण शंकराला तर भोळा सांब म्हणतात. > > > > बरं मग त्याला बुद्धी नाही ( थोडक्यात अक्कल नाही ) असं म्हणु का ? भोळा एव्हढ्यासाठी कि त्याची स्तुती करुन त्याला लवकर प्रसन्न करुन घेतात, पण मग हा तर खूपच त्वरीत रागावतो ही, आणी मग पुन्हा ह्याची स्तुती करुन, पूजा करुन, ह्याची क्षमा मागुन, प्रयत्न केला कि त्वरीत प्रसन्न ही होतो.
भोळा म्हणजे जो मनाने, विचारांनी खूपच सरळ आहे, ज्याच्या मनात कधिच कोणताही विचार असत नाही लोक कल्याणा व्यतिरीक्त, जो वाईटातही चांगले पाहातो . . .
जो जगताच्या कल्याणासाठी, त्यांचे दु:ख दूर करण्यासाठी हलाहल प्राशन करतो, आधीच स्वतः मेघ्-श्यामवर्णी असुन आपला कंठ निळा करुन घेतो पण ते विष संपूर्ण पिऊन ह्या जगाला त्याच्या असहनीय विषारी प्रभावापासुन वाचवतो.
जो ह्याच जगताच्या पुनः कल्याणासाठी ब्रह्मलोकातुन कोसळण्यार्‍या गंगेला आपल्या मस्तकावर घारण करुन तीच्या तीव्र वेगामुळे संभावित क्षतीपासुन पृथ्वी व त्यावरील लोकांचे रक्षण करतो.
जो स्मशानात भस्म लेपुन, गळ्यात रुण्डमाला धारण करुन स्वतः वाम शक्तिंचे नियमन करुन ह्या जगाला त्याच्या प्रभावापासुन दूर ठेवतो.
जो स्वत: सर्वशक्तिमान असुन कैलास पर्वतासारख्या कठीण क्षेत्रात राहातो.
स्वतः सर्वशक्तिमान असुनही संन्याश्यांप्रमाणे फक्त व्याघ्रचर्म धारण करुन अत्यंत निरासक्त वृत्तीने ह्या जगाला ज्ञान दान करीत असतो . . . .

आणी शीव शंकरा ! ! अश्या आळवण्याने धावुन येतो भक्तांसाठी . . . . हा भोळाच आहे हो . . . हा खरोखर भोळा आहे.

आपले आई-बाबा सुद्धा भोळेच असतात पण म्हणुन त्यांना बुद्धी वा अक्कल नसते असे नाही ना ?
ते तर आपल्या वरच्या त्यांच्या प्रेमामुळे, वात्सल्यामुळे, जिव्हाळ्यामुळे भोळे असतात . . . . तसाच हा सांब ही भोळा असतो. . . . .
अहो . . . . हा देवच आहे जो आपल्या जन्माची व्यवस्था आपल्या जन्माच्या फार पूर्वी करुन ठेवतो आणी आपल्याला खूप कष्टांनी जन्म देऊन स्वतःच्या निर्दिष्ट आयुरेखेच्या अंतापर्यंत आई-बाबांच्या रुपाने आपल्या बरोबर राहुन आपले मार्ग दर्शन करतो, प्रेम देतो, खूप काही शिकवतो, ज्ञान देतो . . . .
आपल्यासाठीच ह्याने आई-बाबा ह्यांसारख्या थोर लोकांची रचना आदी काळापासुन केली आणी त्यांच्याच रुपाने हा आपणा सर्वांच्या आई-बाबांच्या रुपाने येतो ! ! ! ! !
हेच ते ह्याचे भोळेपण . . . .
-----
पींटू,
नक्की हा काय प्रकार आहे? ह्यामुळे कुठल्या देवाची भक्ती करावी ह्याबाबतीत कनफुजन होते.> > > >
विष्णु, शंकर, देवी हे तीन प्रकार झाले वैष्णव, शैव, शाक्त पद्धतिने देवाची भक्ति करण्याचे.
ह्या तिन्हि पद्धतिंनी आपण देवाला प्राप्त करुन घेणे, देवत्व प्राप्त करुन घेणे, मोक्ष प्राप्त करुन घेणे अथवा सर्वांत चांगले असे कैवल्यपद / परमहंस पद, परब्रह्मात विलीन होणे अशी अवस्था ( म्हणजे आपणच ब्रह्म आहोत आणी हे सर्व चराचर आपलीच रुपे आहेत वेग-वेगळी ), प्राप्त करुन घेणे.

बाकिचे देव दुर्बल नाहित परंतु विष्णु आणी शंकर हे दोघेच स्वनिर्मित आहेत, हे दोघेही त्या परब्रह्माच्या पासुन आधी नारायण ( ज्याचे सहस्त्रशीर्ष असेही नांव आहे ) आणी मग विष्णु आणी शंकर असे झाले.
कोणतीही देवी ही मायेचा ( प्रकृती ), अवतार असुन पुढचे ब्रह्मदेवा सहित सर्व देव नंतर निर्मिले गेले आहेत.
ह्यापुढचे उत्तर मी खाली श्री. गमभन ह्यांच्या प्रश्नाच्या उत्तरातच सामावित केले आहे, ते कृपया वाचावे.

थोडक्यांत सांगतो . . . . सर्व देव नमस्कारम् केशवं प्रति गच्छती |
------------
सूनटून्या,
नमस्कार . . . .एकच कहितरि सांगा. मस्त विनोदी लेखन. > > > >
मी खूपच भाग्यवान आहे कारण तुम्हाला माझे लेखन विनोदी वाटले. . . . कधी-कधी बाकिच्यांना राग ही येतो माझ्या लेखनाने . . . .

सतीश . . . . हे आपले नांव ! आता हे "सत् + ईश " असे आहे कि सत्य + ईश ", असे आहे ?
एकच काहितरी सांगा.

हळद ही anticeptic ही असते आणी antibiotic ही असते . . . . मग एकच काही कसे सांगणार ?

तसेच . . . . हळद , ही रंग-गुण ह्यांचे प्रतिक असुन त्याच बरोबर औषधी ही असते . . . .

एकाच गोष्टींचे एकापेक्षा अनेक लाभ असणे ही त्या परमेश्वराची आणखीन एक कृपा नाही का ?

काही चुकिचे लिहिले असल्यास कृपया क्षमा करावी . . . . आभार
------------
गमभन ! नमस्कार , कसे आहात ?
गणपती बुध्दीची देवता आहे ना? > > > > कुठलाही देव आपल्याला बुद्धी, ज्ञान, शक्ति, धनसंपत्ती
देण्यास संपूर्ण समर्थ असतो ह्याचे कारण पाहुया . . . . देव म्हणजे मनुष्य प्राण्यापेक्षा कैक पटींनी जास्त ऋद्धी-सिद्धी, शक्ति, ज्ञान, समर्थता आणी सामर्थ्य, रुप-गुण, ईहलोकापेक्षा ऊच्च लोक प्राप्त असे असतात.
ह्यांच्यापुढे आपण मनुष्य म्हणजे यःकश्चित प्राणी पण तरीही ह्यांच्यासारखे सामर्थ्य प्राप्त करुन घेण्यास समर्थ असतो. ही क्षमता आपल्याला मनुष्य जन्मांत मिळालेली असते ( आपण ह्याचे कितपत ज्ञान राखतो वा किती उपयोगात आणतो हे वेगळे ),
म्हणुनच आपल्याला बुद्धी देण्याची कृपा सर्वच देव करु शकतात. परंतु शंकरा सारख्या अनंत ज्ञानी देवाची ज्ञानाची पातळी मात्र बाकिचे देव प्राप्त ( विष्णु सोडुन ), करु शकत नाहित ह्याचे सुद्धा कारण असे, कि विष्णु, शंकरासारखे देव आपल्याच परमतत्वापासुन झाले आहेत आणी, बाकिचे देव तद्- नंतरचे त्यांच्याच पासुन उत्पन्न झालेले. ईतकेच नाहितर स्वयं ब्रह्मासुद्धा एका विशीष्ट क्षमतेच्या बाहेर जाऊ शकत नाही.

श्री गणेश हे आधी पार्वतीच्या अंगापासुन निर्माण झालेल्या घामरुपी त्याजलेल्या द्रवाचे मातीतुन मिश्रीत केलेले एक मानवी रुप होते. पार्वतीच्याच कृपेने त्यास साहाजिक शक्ति आणी सामर्थ्य प्राप्त होते. त्यात चेतना देउन त्यास पूर्ण मानवी रुपात परिवर्तित करुन पार्वतीने मोठ्या मायेने आणी वात्सल्याने एका विशीष्ट कार्यासाठी नियुक्त केले.
जन्मतःच आपली माता पार्वती आणी स्वतः आपण ह्यांच्या शिवाय दुसरा कोणीही शक्तिशाली देव ( आणी आपला पिता शंकर ही ), न जाणल्यामुळे, अजाणतेपणी त्याच्याकडुन शंकरा विरुद्ध वर्तन झाले. ज्याचा पुढचा सगळा परीणाम आपणाला ज्ञात आहेच.
संकुचित ( ईथे ह्याचा अर्थ limited knowledge असा घ्यावा), ज्ञान आणी मळापासुन निर्मिलेले शरीर हे भगवान शंकराने जाणुन नष्ट करुन त्यास हस्ति-मुख ( हत्तीची बुध्दी फार तिक्ष्ण असते ) आणी त्याचबरोबर वरदान युक्त ज्ञान, सामर्थ्य, ऋद्धी-सिद्धी, हे सर्व प्रदान करुन त्यास सर्व पूजांचे आरंभी त्याचेच नाम स्मरण होईल असा वर ही दिला.
आता प्रत्यक्ष भगवान शंकराचाच पुत्र . . . . मग अगाध ज्ञान आपोआपच येणार ना ?
म्हणुन . . . . ज्ञान्-विद्येचा खरा अधिष्ठाता देव भगवान शंकर आहे, आदी काळापासुन.
--------
शंकराला 'कर्पुरगौर' म्हणतात ना म्हणजे तो गोरा असावा. > > > > सांगण्याचा प्रयत्न करतो, थोडा वेळ द्यावा कृपया . . . .

शंकराला 'कर्पुरगौर' म्हणतात ना म्हणजे तो गोरा असावा. असे नाहि तर
कर्पुरगौरं म्हणजे कापरा साऱखा शुध्द आणी पवित्र असा आहे.

परब्रम्ह,

एक चांगला लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.

शंकर व विष्णूच नात कसं काय ऊघडवुन सांगता येईल ?

विष्णूचा सर्वात मोठा भक्त म्हणून शंकर आपल्याला माहीत आहे
पण विष्णूने शंकराची आराधना केल्यानंतर शंकर भगवान प्रसन्न होऊन त्यांनी विष्णूला सुर्दशन चक्र वरदान
म्हणून दिले.

तसेच एकदा विष्णू व ब्रम्ह देवात मोठा कोण ह्या वरून वाद झाला,
त्यावर निवाडा करण्यासाठी विष्णूने शंकराला पाचारण केले जेंव्हा शंकराने विष्णूच्या बाजू ने निकाल दिला
त्यावर ब्रम्हदेव रृ्ष्ट झाले व त्यांनी शंकराचा अपमान केल, त्यावर शंकरही भयंकर क्रोधीत झाले. त्यांनी आपली एक जटा ऊपटली व त्यातुन भैरव जन्मला त्या भैरवाने ब्रम्हदेवाच्या पाच डोक्यापैकी एक डोके धडावेगळे केले. हा भैरव म्हणजे शंकराचेच रुप.

आपल्याला हे माहीती आहे की लक्ष्मी देवी धनदेवता आहे आणी कुबेर खजिनदार पण ह्याना धन कोण देतो.
ह्यांना धन देतो स्वर्णाकर्षण भैरव, हा भैरव तप्त सुर्वण मुद्राचा वर्षाव करतो.

मृत्यंजय देवता ही अष्ट भैरवरुप.

परब्रम्ह तुमच्या कडे नक्कीच काही विचार आहेत
चांगले आहेत पण तेच अंतिम सत्य आहेत का

आपला फोन नंबर देवू शकत असाल तर द्याल का
माझा नंबर ९०२८५८८८४१ आहे मी सद्ध्या पुण्यात आहे

इथे बोलण्यात मला काही मजा नाही वाटत आहे Happy

~वैवकु Happy

विवेक नाईक,
आभार, ज्ञानात भर पडली आज तुमच्यामुळे.
वाद तर विष्णु आणी शंकर ह्यांच्यातही झाला होता, त्यावेळेस एका ब्राह्मणाने प्रगट होऊन विचारले कि तुम्ही दोघे ज्याच्यासाठी वाद घालत आहात त्यात काहिही तथ्य नाही.
तुम्ही मला ओळखता का ? दोघे ही म्हणाले नाही ! तुम्ही आमच्या सृष्टीतले दिसत नाही ? कोण तुन्ही ?
तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला मी तुमच्या सृष्टीतला नाही परंतु तुम्ही दोघेही माझ्या सृष्टीतलेच आहात, ज्या परब्रह्मापासुन तुम्ही निर्माण झालात तो मीच आहे . . . . "दत्त", म्हणुन जो उभा . . . तोच हा.

विष्णुचं आणी शीवाचं नातं कळण्यासाठी हे आधी समजणे महत्वाचं आहे कि आधी कोणाची निर्मिती झाली.

आहेत हे सगळे प्रकृतिच्या उत्पत्ती नंतरचेच, कारण कोणताही गुण असल्या शिवाय कुठलिही निर्मिती शक्यच नाही. आणी माया वा प्रकृति, ही प्रथम.

मला वाटते विष्णु प्रथम कारण गुण निर्मितीच्या क्रमाने सत्व गुण प्रथम आला,

पण मग रजोगुणाच्या क्रमा प्रमाणे ब्रह्मा , नंतर तमोगुणाचा शिव हे थोडे विस्कळित वाटते,

नाहितर क्रम असा असावा . . . .सत्व, तम, रज.

काय मत आहे ?

गमभन , अभय९ . . . .
नमस्कार . . . .
अभय म्हणत आहेत त्यात तथ्य आहे जर नीट विचार केला तर. प्रत्येक उपमा मिळाल्यानंतर तो देव तसाच गृहित धरावा असा काहि नियम नाही, त्या कधी उपमा शरीर दर्शना ऐवजी स्वभाव दर्शक सुद्धा असु शकतात.

अथवा भगवान शिव जेव्हा सर्वांगास भस्म लेपुन पौर्णिमेच्या रात्री दिसत तेव्हा हे कर्पूरा सारखे गोरे दिसण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
सर्वांगास भस्म लेपण्याची वेळ बहुतेक वाम शक्तिंचे बाबतीत काही कार्य करत असतांना तेही पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात, असु शकते.

आणखीन कोणी काही जास्त सुसंगत उत्तर देऊ शकेल का ? कृपया अनुग्रह करावा. . . .तरी अभय९ ह्यांच्या विचाराशी सहमत.

धन्यवाद

वै.व्.कु. . . . सादर प्रणाम,

बरेच दिवसांनी आपली कृपा दृष्टी झाली ह्यात आनंद आहे.
. . परब्रम्ह तुमच्या कडे नक्कीच काही विचार आहेत चांगले आहेत पण तेच अंतिम सत्य आहेत का > > >

अंतिम सत्य अगदी साधे आणी सरळ आहे . . . .परब्रह्म हा एकच आणी एकटाच आहे ह्या संपूर्ण चराचरात आणी प्रकृतिच्या द्वारे तोच ह्या सर्व दृष्य -अदृष्य रुपांनी वावरतो.
खरे तर हा स्वतः निर्गुण असतो ( ह्या सत्यानंतरचे जे काही आहे ते सर्वच्या सर्व असत्यच आहे ).

आज कुठलेही भौतिक जगातले सर्व शास्त्र जितके प्रगत आहे त्यांच्या कडे अजुन ह्या गोष्टींचा कस लावण्यासाठी काही भौतिक मोजमापाचे उपाय नाही आहे.
खरेतर हे मोजमाप परमेश्वराने आपल्या सगळ्यांना जन्मत:च दिलेले असते, ते म्हणजे आपली अनुभव करण्याची क्षमता आणी पातळी. हेच ते एकमेव आहे ज्याने हे चिरंतन सत्य आपण खरोखर अनुभवु शकतो.
पण आपण सर्वच अजुनही ईतके हट्टी आहोत कि सायन्स खूपच प्रगत झाले आहे ( चंद्रावर गेला आता मंगळावर ही जातो ), म्हणतो आणी त्या ( तोटक्या ) आधाराच्या कसावर सर्वच गोष्टी लावतो, आणी त्यामुळे जे उमजत नाही ते शेवटी प्रश्नवतच सोडतो.
१००० watts चे जनरेटर असतांना आपण ते चालु करुन त्याने फक्त एक ट्युब, चार पंखे आणी पाच बल्ब फक्त चालवतो.
असे काहितरी आहे.
वैवकु . . . . मी काही तुमच्या एव्हढा मोठा माणुस नाही, पण ह्या चराचराच्या मुळाशी जे एकच सत्य आहे ते मी ओळखलं आहे . . . .जायचं कसं हे सांगु शकतो, गंतव्य स्थान दाखवु शकत नाही कोणिच, कारण ते प्रत्यकाने स्वतःच अनुभवायचं असतं, दुसर्‍या कोणाच्याही शब्दांनी वा कृतींनी ते उमजु शकत नाही.

एव्हढच सांगु शकेन कि कळालं आहे, वळायचं राहिलं आहे.
रस्ता अचुक दाखवु शकेन, पण त्यावरुन गंतव्य स्थानापर्यंत पुढे जाणे हे तुमच्यावरच अवलंबून असते.

तुमच्यासारख्या ज्ञानी विभुतींनी आज मला प्रत्यक्षात संवाद करुन धन्य केले आहे. तुमच्या प्रश्नाचे तोडके-मोडके उत्तर देतांना जर काही चुक झाली असेल तर कृपया मोठ्या मनाने मला आपण क्षमा करावी ही विनंती.

परब्रम्ह ,
आपण म्हणता ते ब्ररोब्रर आहे पण वरील गोष्टींचा विचार करताना पुराणांचा विचार केला जाउ नये असे वाटते कारण पुराणांत नायकच मोठा करुन दाखावला आहे. आपण जे आकाश नील,ना सांगितले त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वत: अभ्यास करुन तर्काशी यावे या मताचा मी आहे. जो पर्यंत स्वत:अनुभव घेत नाही तो पर्यंत काहीही उपयोग नाहि आणि आमचे तर कळते पण वळत नाही अशी स्थिती आहे. अजुनही कमी पडतो आहोत तुमच्यासारख्या ज्ञानी विभुतींशी संवाद करुन धन्य वाटले खरोखरीच मनापासुन धन्यवाद............

अभय ९ . . . .

हो , ज्याचे त्याने अभ्यास करुन अनुभवले तरच त्याचे महत्व आहे आणी अभ्यासकाचे त्यात प्रभुत्व सुद्धा येते कारण हे त्याने स्वतः करुन पाहिलेले असल्यामुळे कुठले खाच-खळगे कसे वाचवून जायचे हे त्याला कळलेले असते.

कोणी लेखकांनी म्हंटले ते तंतोतंत खरे आहे . . . .अनुभवापेक्षा मोठा गुरु कोणीही नसतो.

पण जिथे परमतत्वाचा विषय येतो तिथे एक गोष्ट लक्षात ठेवणे अति आवश्यक कि, हा त्या परब्रह्माचा प्रभाव आहे कि वेद असोत, पुराण असोत वा ईतिहास असो . . . . त्याच्या प्रत पोहोचण्याचा मार्ग कसाहि पाहिला तरी एकच आहे.

सगुणातुन निर्गुणाकडे अथवा सरळ-सरळ निर्गुणाकडे . . . .

आणी हे काय अभय ?
अजुनही कमी पडतो आहोत तुमच्यासारख्या ज्ञानी विभुतींशी संवाद करुन धन्य वाटले खरोखरीच मनापासुन धन्यवाद............ > > > >
आम्ही ही तुमच्याच बरोबर आहोत, पहाना ? आमचंही वळत नाही आहे अजुन . . . .कळालं आहे एव्हढंच काय ते समाधान, म्हणुन मार्ग ज्ञात झाला आहे, मार्गावर नाही मिळालो तरी तिथे तर मिळणार आहोच आपण सगळे . . . .

परब्रम्ह,
आपला अभ्यास खुपच आहे खुप छान वाटले. कधी वाटले तर विचारपूस वर काही प्रश्न विचारले तर चालेल ना?

अभय९,
तुम्हा मला काही वेळापूर्वी विचार पूस हुन इमेल पाठवलित काय ?

तिचे ऊत्तर देण्याचा प्रयत्न दोनदा केला पण ते बाऊन्स बॅक होते आहे .

परब्रम्ह,

धन्यवाद,

माझ्यामुळे ज्ञाना भर पडली अस म्हणून लाजवू नका ! आपल्या ज्ञाना बद्दल मला आदर आहे आणि माझ्या अज्ञाना बद्दल खात्री !

आपल्या सर्व देवता मध्ये सर्वात कमी माहीत असलेल्या देवा बद्दल " भैरव "

भैरव देवते ची उत्पत्ती वर सांगीतलीच आहे.

काळ भैरव किंवा अष्ट भैरव,

१. अष्टांग भैरव
२. रुरु भैरव भैरव
३. क्रोध भैरव
४. छंद भैरव
५. उन्मत्त भैरव
६. कपाल भैरवभैरव
७. भिषण भैरव
८. संहार भैरव

काळ भैरव हा क्षेत्रपाल म्हणून ही ओळखला जातो. महत्वाची देऊळे खास करुन शिव मंदिराच्या बाहेर
ह्याची स्थापना केलेली असते आणि देऊळ बंद करुन देवळाच्या चाव्या क्षेत्रपालाच्या गाभारर्यात ठेवण्याची प्रथा आहे.

काळ भैरव हा मृत्यू देवता ही आहे आणि काही त्याला काल (टाईम) देवता ही समजतात. अष्ट भैरव
मृत्युंजय महा मंत्राच्या यंत्रावर अष्टदिशेला विराजमान आहेत.

काळ भैरव शनीचा गुरु आहे आणि शनी यमाचा मोठा भाऊ. शनी महाराजांनी दाखवल्याशिवाय यम कोणाला (मर्त्य माणसाला) हात लावत नाही. दुसरीकडे काळ भैरव महामृत्युंजय मत्रांच्या यंत्रावर ही आहेत
म्हणजे जिवन देणारे आहेत.

आज साठी ईतकेच,......

bhairava 3.png

Pages