माणसे

Submitted by कविन on 3 June, 2013 - 01:06

जंगले ही माणसांची
तरी बेट झाली माणसे
भिडती सिमा तरी ना
भेटती ही माणसे

ना जणू आली त्सुनामी
वाहिले नाही जणू
कोरडी इतकी कशाने
आज झाली माणसे?

टाळण्या अपघात येथे
काळजी घेती किती!
राखूनी अंतर स्वतःशीच
चालती मग माणसे

काय ह्यांच्या अंतरंगी?
कोणती ह्यांची लिपी?
वाचता येती न मजला
दुर्बोध इतकी माणसे

मी तरी कोठे निराळी?
जर पाहते परिघातूनी
अन म्हणे का कोण जाणे
कळलीच नाही माणसे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान .....
काहीशी गझलेच्या अंगाने जाणारी कविता.
"टाळण्या अपघात येथे.....माणसे" >>> हे कडवे विशेष.

अंजू उकाका <<<+१

हेच सांगायला आलो होतो

थोडेफार वृतासाठी व एखाद दुसरा शब्दाचा बदल खयालासाठी केला व महत्त्वाचे म्हणजे ४ ओळीचे कडवे न करता २ ओळीचा शेर केला की होईल ही गझल

तशीही फार छान आहेच ही ..कविता म्हणून Happy