नको येवूस कधीही (बदलून)

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 June, 2013 - 13:40

नको येवूस तू कधी
काही अडणार नाही
तुटुनिया गेली स्वप्ने
शोके रडणार नाही

झेलला मी आहे उरी
तप्त खदिरांगार ही
दु:खे कधीच कुठल्या
आता जळणार नाही

सारे आयुष्य फुंकले
असा खचणार नाही
प्रीतीच्या नाटया तुझ्या
पुन्हा बधणार नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीताईंशी १००% सहमत
मलाही जरा कमीच मजा आली पण चांगली आहे कविता

भग्न झाली स्वप्न सारी
तरी रडणार नाही <<<<<

माझा एक शेर आठवला ...............

हा वाडा पडणार उद्या
मी नाही रडणार उद्या

Happy
~वैवकु

भारतीताई,वैभव ,उल्हास, यांनी दिलेल्या प्रतिसाद नंतर कवितेचे पुनर्लेखन केले . Its better now म्हणजे मला असे वाटते

विक्रांत, आता बेटर आहेच,पण अधिक प्रवाहिता आणण्यासाठी अजून थोड्या अवधानाची गरज आहे असं मला वाटतंय..