एचडीएफसी लिमिटेड्च्या/बॅकेच्या गृहनिर्माण कर्जाबाबत माहिती

Submitted by हर्ट on 28 May, 2013 - 23:54

नमस्कार. मी पुण्यात बावधन मधे एक घर निवडले आहे. एकूण परिस्तिथी, वेळ, आपले रहाण्याचे ठिकाण हे सगळे बघता मी एचडीएफसीकडे लोनचा अर्ज भरला आहे. मला माहिती आहे इतर राष्ट्रीयकृत बँका खूप छान आहेत पण माझ्या काही समस्या आहेत ज्यावर मला सध्या जोर देता येत नाही.

तुमच्यापैकी कुणाचे बरे वाईट अनुभव आहेत ह्या एचडीएफसी बॅकेबद्दल? सांगाल का मला?

मी जे कर्ज घेतो आहे ते मला लवकरात लवकर अगदी पाच वर्षाच्या आत फेडायचे आहे. जर मी मधेच घाऊक रक्कम घरली तर ही बॅक स्विकारते का? काही शिवाय कर लावते का? त्यांचा रीपे-ऑप्शन कसा आहे?

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयसीआयसी बंडल बँक आहे लोनच्या बाबतीत >> खूप जणांना आयसीआयसीआयचा वाइट अनुभव आलाय पण मी त्या बँकेवर आणि त्यांच्या सेवेवर एकदम खूष आहे (१२ वर्षे झाली त्याच बँकेबरोबर आहे). असे फार कमी लोक आहेत हेही मला माहिती आहे. Happy

<मी जे कर्ज घेतो आहे ते मला लवकरात लवकर अगदी पाच वर्षाच्या आत फेडायचे आहे. जर मी मधेच घाऊक रक्कम घरली तर ही बॅक स्विकारते का? काही शिवाय कर लावते का? त्यांचा रीपे-ऑप्शन कसा आहे? >

या प्रश्नांची उत्तरे एचडीएफसीमध्ये जाऊन विचारलेली बरी. त्यावरूनच तुमचा कर्जाचा प्लान निवडावा. प्रिपेमेंटला बहुतेक ठिकाणी पेनल्टी असते.
http://www.hdfc.co.in/others/home_loan_faqs.asp#9
Can I repay my loan ahead of schedule?

Yes, you can repay the loan ahead of schedule by making Lumpsum payments or choose our accelerated repayment scheme. There are NO charges for choosing an accelerated repayment scheme and for lumpsum payments under Adjustable Rate Home Loan.

Adjustable Rate Home Loan [ARHL]
If a prepayment is made within 3 years of the first disbursement*, under Adjustable Rate Home Loan (ARHL) option early redemption charges of 2% of the amount being prepaid is payable if the amount being repaid is more than 25% of the opening balance.

Fixed Rate Home Loan [FRHL]
Redemption charges of 2% of the amount being prepaid is payable if the amount being repaid is more than 25% of the opening balance.

Incase of commercial refinance under both the FRHL and ARHL an early redemption charge of 2% is payable. You may be required to submit copies of your Bank Statements or any other documents that HDFC deems necessary to verify the source of prepayment.

*Subject to terms and conditions

For further details please contact our Loan Counsellor.

हल्ली बहुतेक सगळ्या बँका / वित्त संस्था ह्या प्रिपेमेंट वर पेनल्टी लावत नाहिये. कारण स्लॅक मार्केट आहे... तरीही प्रत्यक्ष बोलुन खात्री करावी.

आयसीआयसीआय बँक सगळ्यांच्या ब्लॅक लिस्ट मधे दिसते आहे?... खरंतर प्रायव्हेट बँकिंग ला ग्लॅमर मिळवुन देण्यात त्यांचा मोठा हात भार आहे. एखादी प्रायव्हेट बँक येवढी मोठी होवु शकते हे त्यांनीच दाखवुन दिले. बाकी अती रिटेल प्रॉडक्ट्स बाजारात आणल्याने त्यांना ती तेवढ्या कुशलतेने सांभाळता येत नाहियेत.

{ त्यांच्या बॅक ऑफिस मधे मी माझ्या टीम सह एक आउट सोर्स्ड प्रॉजेक्ट केला होता ( तेंव्हा माधुरी पुरी- चीब व चंदा कोचर ह्यांना ५ मिनिटांसाठी भेटण्याचा योग आला होता )}

खरंतर माणसं खुप चांगली आहेत. ए.टी.एम. चे जाळे कसे विणावे हे त्यांच्या कडुन शिकण्या सारखे आहे. त्यांनी रीटेल बँकींग मधे प्रचंड क्रांती केली ह्यात वादच नाही.....

असो.....

आमचाही अनुभव HDFC LTD. च्या बाबतीत उत्तम आहे. पार्शल रिपे करायचे असले तरीही फक्त मागिल ६ महिन्याचे बँक स्टेट्मेंट आणि अमाऊंटचा चेक एव्हढेच लागते आणि कामही लगेच होते.

बी, तुम्ही होम लोन इन्शुरन्स बद्दलही विचार करत आहात का? तो सुद्धा आम्ही HDFC ERGO करून घेतला आहे. लोन अमाऊंट मधे क्लब करतात. चांगली सुविधा आहे.

आणि एक विनंती वजा सुचना..कितीही वाईट वेळ आली तरिही आय सी आय सी आय कडून कर्ज घेऊ नकोस.>>> दक्षिणा व नंदिनी यांना १०१ % अनुमोदन. आम्हालाही फार वाईट अनुभव आहे त्या बँकेचा.

या प्रश्नांची उत्तरे एचडीएफसीमध्ये जाऊन विचारलेली बरी. त्यावरूनच तुमचा कर्जाचा प्लान निवडावा. प्रिपेमेंटला बहुतेक ठिकाणी पेनल्टी असते.
<<
याला अनुमोदन.
प्रिपेमेंट करू देत नाहीत म्हणूनच मी काही लोन्स नॅशनलाईज्ड बँकेला ट्रान्स्फर केलीत. होम लोन चे ठाऊक नाही.

आयसीआयसीआय चे एक कर्ज गाडीसाठी घेतले होते. अतीशय स्वस्तात मिळाले होते. प्रीपेमेंट केले नाही. पण काहीच अडचण आली नव्हती. तितके स्वस्त कर्ज आता ते देखिल देत नाहीयेत.

कितीही वाईट वेळ आली तरिही आय सी आय सी आय कडून कर्ज घेऊ नकोस. >>>>> तुमचे आय सी आय सी आयचे 'वाईट' अनुभव इथे सांगणार का? अर्थात बी(धागाकर्ता)ची हरकत नसेल तर.

अवांतरः आयसीआयसीआयच्या एनआरइ/एनआरओ सर्विसचा बरा-वाईट अनुभव आहे का कोणाला? स्टँडर्ड चार्टर्डला अतिशय कंटाळुन बहुतांशी अ‍ॅसेटस आयसीआयसीआय मध्ये फिरवण्याच्या विचारात आहे...

हो. तुझा अनुभव तिथे वाचला म्हणून इथल्या बाकींच्यांना मी विनंती केलीय/करतेय. (कारण तू सोडून कुणीच तिथे काय त्रास झाला हे लिहिले नाहीये.) Happy

. ए.टी.एम. चे जाळे कसे विणावे हे त्यांच्या कडुन शिकण्या सारखे आहे. त्यांनी रीटेल बँकींग मधे प्रचंड क्रांती केली ह्यात वादच नाही.>> ह्याला +१.
ते फॅसिलिटी खुप उत्तम देतात. अ‍ॅक्सेस खुप उत्तम असतो ह्यात वादच नाही.
पण बदललेले नियम एवढा सर्व अ‍ॅक्सेस असतानाही फक्त ब्रॅन्च मध्ये लावतात.
सर्वाना इतर मार्गाने कळवण्याचे कष्ट घेत नाहीत.
त्यामुळे नियम भंग केला म्हणुन पेनल्ती चार्जेस देखील लावतात ते ही कळत नाही.
सर्वसामान्य कस्टमरला कचर्‍यापेक्षा वाइट वागणुक असते. (एनाआरआय अकाउन्ट वाल्याण्च माहिती नाही. किंवा करोडपतींच माहिती नाही. )
फक्त आणि फक्त ह्याच कारणाने लोकं ती बेन्क अव्हॉइड करतात.
वसुलीसाठी गुन्डं पाठवणे ह्यानीच सुरु केल होतं बहुद्धा.

Pages