समाधी

Submitted by अत्रुप्त आत्मा on 28 May, 2013 - 15:38

वेगळी धुंदी इथे अन्
वेगळा हा बाज आहे.
वेगळे हे विश्व आणी
वेगळा हा साज आहे.

शांत सारे हे स्वयंभू
शांत इथला नाद आहे.
शांतिचे संगीत म्हणूनी
कोकिळाही शांत आहे.

बंद होती येथ वाटा
बंदिचे संगीत आहे.
आज बंदी पाहिली मी
मुक्त येथे गात आहे.

बंदिचेही शब्द ऐसे
मानसीचा साज आहे.
सुप्तता अन् शांततेचा
मूळचा आवाज आहे.

बोलण्यासी आतुरे तो
खोल आतलाच आहे.
आज या ही..कारणाने
मुक्त तो ही होत आहे.

शांती आणी मोक्ष सारा
येथ तो मिळणार आहे.
सत्य शामल नम्रतेने
मी इथे झुकणार आहे.

आज काहि मागणे ना
मुक्तिही मोक्षात आहे.
मुक्तिच्या विहरात येथे
समाधिही स्तब्ध आहे...
https://lh4.googleusercontent.com/EKOJCegmDYNOv-TMRa-o2iqbX2Cr_ug7UnwW4-YDS4Q=w808-h539-no

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवितेतील भाव आणि मांडणी चांगली आहे.
परंतु, कवितेखाली चित्र दिले नसते तर संदर्भ लागला नसता.
म्हणजेच सदर कविता पूर्णतः त्या चित्रावर अवलंबून आहे असे वाटते.
"बोलण्यासी आतुरे तो...........मुक्त तो ही होत आहे." >>> या कडव्यातला 'तो' कोण हे स्पष्ट होत नाही.
वैम. कृगैन.

@म्हणजेच सदर कविता पूर्णतः त्या चित्रावर अवलंबून आहे असे वाटते.>>> तसेच आहे...!

@या कडव्यातला 'तो' कोण हे स्पष्ट होत नाही.>>> अश्या ठिकाणी गेल्यानंतर भावुक होणारा कोणताही मनुष्य! Happy

@आतृप्तीची तृप्ति होणार कधी ?>>> ह्हा ह्हा ह्हा! Happy

@प्यास badhawo !>>> अतृप्ती हा मानवी 'जीवनाचा' मूलाधार आहे! Wink