फल ज्योतिषाला ग्राहक संरक्षण कायदा लावावा का?

Submitted by धडाकेबाज on 27 May, 2013 - 07:18

फल ज्योतिषाला ग्राहक संरक्षण कायदा लावावा का? फल ज्योतिषाच्या नावाने फसवणूक करण्याचे प्रकार सर्रास चालू आहेत. अनेक भोळ्या भाबड्या ग्राहकांची फसवणूक होत आहे. पण फसवणूक होऊन सांगणार कोणाला जो तो आपल्या नशिबाला दोष देत बसतो.जर फलज्योतिष हे ग्राहक संरक्षण कायद्याखाली आले तर खरे ज्योतिषी हि खुश होतील आणि भोंदू ज्योतीषानाही शासन होईल. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, . दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> मात्र तुमच्याच उदाहरणात कोणीही सोम्यागोम्या कुठल्याही उपकरणांचा किंवा ज्ञानाचा वगैरे आधार न घेता मनाला येईल तसा नुसता आकाशाकडे पाहून हवामानाचा अंदाज वर्तवू लागला तर ती फसवणूक नक्कीच म्हणता येईल.<<<<
ओहोऽ भास्कराचार्यजी, उपकरण व ज्ञान यान्चा आधार न घेता..... हा मुद्दा महत्वाचा, नै का? म्हणजे याप्रमाणे मग कोणी बुगुबुगु वाद्य वाजवित नन्दीबैलाचा वापर करुन अंदाज वर्तवू लागला तर मात्र ती फसवणूक होणार नाही, बरोबर ना? Biggrin
बर कायदा करायचा, तर हे ज्ञान नेमके कुठे आहे, कसे आहे, त्याचे "टेक्स्ट" काये हे तरी किमान माहिती करुन घेणार ना? की आपले तसेच कोणीही सोम्येगोम्ये पकडून आणून त्यान्ची समिती नेमुन कायदा करणार? Wink

तुम्हीच सांगा, तुम्ही नंदीबैलाच्या आधारे मांडलेल्या अंदाजाला फसवणूक म्हणता का? असेल तर तुम्हाला कुठल्या बैलांनी मांडलेले अंदाज लागतात?

अरेच्च्या भास्कराचार्यजी, मी का अन काय सान्गू?
कायदा तर तुम्हाला करायचा आहे अन त्यातले एक सम्भाव्य गृगितक तुम्ही मान्डलेत, त्याला मी नन्दिबैलाचे उदाहरण देऊन शन्का विचारली, तर उत्तर तर तुम्हीच द्यायचे ना?
माझेबाबत बोलाल, तर मी नन्दीबैलच काय, विशिष्ट पक्षी, प्राणी, सरपटणारे जीव वगैरे बघुन देखिल अंदाज बांधतो! माझ्यापुरताच ठेवतो, फार फार तर लिम्बीशी चर्चा करतो, हो ना, उगाच "बामणाने फसवले" असे म्हणायला माकडान्च्या हातात कोलित नको द्यायला. Proud
येवढेच काय रात्रीबेरात्री कावळा ओरडला, टिटवी ओरडली, कुत्री विव्हळून विव्हळून (रडायला) ओरडू लागली, पालीने कुचकुचाट केला असे अनेक प्रकार घडले तरी आम्ही (निदान आमच्या) भविष्याबाबत काहीबाही अंदाज बान्धतोच! Wink
पण त्याचेशी तुम्हाला काय हो? तुम्ही म्हणणार, साधन हवे, ज्ञान हवे, तर तुमच्या कायद्या नुसार या साधन अन ज्ञानाची व्याख्या काये? त्याची मूलतत्वे कोणती? अहो प्रश्न मी विचारणार ना? उत्तरे तुम्ही अन धागाकर्त्यान्नी अन ज्यान्ना ज्यान्ना ज्योतिष वर्तविणारे "काय-द्याच्या कचाट्यात" आणण्याची घाई झाली आहे त्यानी द्यायला हवेत ना?

मला कायदा करायचा नाही. मी स्वतः कधीही ज्योतिष्याकडे जाणार नाही, त्यामुळे मी मूलतः संरक्षित आहे असे समजायला हरकत नाही. ज्योतिषाकडे बघण्याचा माझा व्यक्तिगत दृष्टीकोन आहे, तसा इतरांचाही असेल. त्यामुळे मी समाजसुधारणा करायलाही निघालेलो नाही.

माझा मुद्दा एवढाच, की सगळेच ज्योतिषी चांगले असतात असे समजण्याचे अजिबात कारण नाही. कारण कुठल्याच व्यवसायात ते तसे नसते. मग जे चांगले नाहीत, त्यांपासून लोकांना काहीतरी सुरक्षा असली पाहिजे. हे जर तुम्हाला पटत असेल, तरच पुढे काही बोलण्यात अर्थ आहे. चांगले नसण्याची व्याख्या करण्यात मला रस नाही. ज्यांना त्यात गती आहे त्यांनी ते करावे. जर ज्योतिषी लोकांना आपल्याकडून लोकांची सेवा व्हावी आणि भोंदू लोकांपासून सामान्यांचा बचाव व्हावा असे खरेच वाटत असेल, तर तुम्ही सर्वांनीच खरे तर असा प्रयत्न आपणहून करायला हवा.

ज्योतिषी लोकांना आपल्याकडून लोकांची सेवा व्हावी आणि भोंदू लोकांपासून सामान्यांचा बचाव व्हावा असे खरेच वाटत असेल << भास्कराचार्य या बाबती एकदम सहमत
ज्याप्रमाणे ज्योतिषाच्या क्षेत्रातील भोंदूगीरी बद्दल आपण बोलतो तशीच ती अन्य क्षेत्रातही चालतेच की,
आणि वर म्हटल्या प्रमाणे कायदाच करायचा असेल तर भोंदू याची कायदेशीर व्याख्या आणि त्याची व्याप्ती तुम्ही काय कराल.

>>>> जर ज्योतिषी लोकांना आपल्याकडून लोकांची सेवा व्हावी आणि भोंदू लोकांपासून सामान्यांचा बचाव व्हावा असे खरेच वाटत असेल, तर तुम्ही सर्वांनीच खरे तर असा प्रयत्न आपणहून करायला हवा. <<<<
आपल्या या पोस्टशी सहमत! आपली कळकळ पोचली.
मात्र कायदा करणे हे पूर्णतः सरकारचे अखत्यारितील काम आहे. अन एखाद्या विषयावर कायदा करायचा तर त्या विषयाचे किमान ज्ञान प्रमाणित करुन ते मूळातच प्रसारित करण्याचे (शिकवण्याचे) काम देखिल सरकारचेच आहे. याबाबतीत ज्योतिषशास्त्र विषयक शिक्षण व मूलभूत संशोधन यामधे सरकार कुठेही सहभागि नाही. व जेव्हा जेव्हा असे प्रयत्न झाले तेव्हा तेव्हा कोल्हेकुई प्रमाणे काही धर्मद्वेष्ट्या/निधर्मी/अतिशहाण्या लोकान्नी या प्रस्तावास विरोध तर केलाच, पण अशीही आवई उठवली गेली की बघा हे "हिन्दुत्ववादी(?)" समाजास मागास बनवित आहेत, पुराणकालात घेऊन जात आहेत, एकवीसावे शतक, माणुस चंद्रावर पोचला वगैरे वगैरे! [हिन्दुत्ववादी पुढे मी प्रश्न चिन्ह मान्डले कारण माझ्या अल्प माहितीप्रमाणे ख्रिश्चन धर्मान आधी भविष्य सान्गणे/बघणे हा गुन्हा होता, त्यास चेटूक/काळी विद्या मानले जायचे, पण आज बघितले तर भविष्यशास्त्राबद्दल ख्रिश्चन धर्मिय सर्वात जास्त अभ्यास करतात - भारतापुरते बोलायचे तर तो हिन्दू करतात, म्हणून हिन्दुत्ववादी].
तेव्हा मायबोलीवर धागा उघडून काहीतरी अचकटविचकट बोचरे लिहिण्याइतपत कायदा करणे सोपे नाही.
हां, आता अर्धवट माहितीवर चार्वाकपद्धतीने काहीतरी अचकटविचकट बोलून समाजातील वाचकान्चा बुद्धीभेद करणे, त्यान्चे श्रद्धास्थानान्वर हल्ला चढविणे म्हणजे समाजसेवा किन्वा समाजप्रबोधन असे कुणास म्हणायचे असेल तर म्हणोत बापडे, समाज यामुळे बुद्धिभेद होण्याइतका "मूर्ख" नाहीये यावर आमचा विश्वास आहे व गेल्या शेकडो हजारो वर्षात ते पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे.
असो. कायदा होईल तेव्हा होईल! कदाचित ज्योतिष वर्तविणे म्हणजेच गुन्हा अशा कायद्याची मागणी करणारे अन्निसादिक/कम्युनिस्ट/नक्षली/ब्रिगेडी आहेत ते देखिल यशस्वी होऊ शकतील, लोकशाहीत काय, काहीही घडू शकते.

अठराव्या शतकापर्यंत डोळ्यांना दिसू शकणाऱ्या शनीपर्यंतच्या ग्रहांनाच पत्रिकेत स्थान होते. कारण त्यापुढे ग्रह आहेत हे ज्ञात झाले नव्हते. त्या काळातही ज्योतिषशास्त्र परिपूर्ण मानले जात होते. ज्योतिषशास्त्रात काही अपूर्णता आहे व ग्रहांचे फलित चुकीचे आल्यास त्याला दृष्टीस न पडलेले काही अज्ञात ग्रह कारणीभूत असावेत, अशी शंका एकाही विद्वानाने व्यक्त केली नाही.
याउलट खगोलशास्त्रज्ञांनी आधीच्या कक्षेतील ग्रहांच्या परिभ्रमणातील अनियमिततेवरून प्रथम अज्ञात ग्रहांची शक्यता वर्तवली. गणिताने त्यांच्या कक्षा निश्चित केल्या व पुढे दुर्बिणीच्या मदतीने प्रत्यक्ष ग्रहांचा शोध लावला. युरेनस् (१७८१), नेपच्यून (१८४६) व प्लुटो (१९३०). फलज्योतिष शास्त्राने या आयत्याच मिळालेल्या माहितीच्या आधारावर वरील तीन ग्रहांना पत्रिकेत स्थान दिले व त्यांची फलिते मांडली. विज्ञानाने लावलेल्या शोधांना अंधश्रद्धेच्या दावणीला कसे बांधले जाते, याचे हे उत्तम उदाहरण

>>> त्या काळातही ज्योतिषशास्त्र परिपूर्ण मानले जात होते. ज्योतिषशास्त्रात काही अपूर्णता आहे व ग्रहांचे फलित चुकीचे आल्यास त्याला दृष्टीस न पडलेले काही अज्ञात ग्रह कारणीभूत असावेत, अशी शंका एकाही विद्वानाने व्यक्त केली नाही. <<<< Lol Lol Lol
या एकुणच पोस्टसारखी हास्यास्पद पोस्ट दुसरी नाही, आजचा दिवस कारणि लागला माझा Lol
अन एकुणच हिन्दू धर्मशास्त्रान्बद्दलचा कच्चाच नव्हे तर अजिबातच नसलेला अभ्यास कळून आला.
महाशय, हिन्दू धर्मशास्त्राप्रमाणे, केवल एक इश्वर सोडला तर बाकी कोणतीही बाब "परिपूर्ण" मानली जात नाही, संपुर्ण मानली जात नाही, अगदि तुम्ही स्वतःस "पुरुष" म्हणवुन घेत असाल/समजत असाल, तरी तुम्ही "पूर्ण पुरुष" मानले जात नाहीत केवळ श्रीराम हा पूर्ण पुरुष मानला गेला. बाकी सर्व सृष्टीच अपुर्ण मानली गेलीये.
अन परिपूर्णतेपर्यन्त पोचण्याचे बाबत तर हिन्दूधर्मशास्त्र कधीच कोतेपणा दाखवित नाही. शेकडॉ वर्षांपूर्वी कोणीतरी लिहीलेले एकच एक पुस्तक्/कोणतरी एकच एक प्रेषित अन त्याचे संदेश-आज्ञा/कोणितरी एकच एक कुठच्यातरी झाडाखाली बसून त्या एकासच ज्ञान(?) मिळणे/ वगैरे वगैरे एकमेव बाबींमधे धर्म, कर्म व ज्ञान बान्धुन ठेवत नाही. Proud
ज्योतिषाचे (भविष्य वर्तविण्याचे) बाबतीतही केवळ अन केवळ ग्रहतार्‍यान्चे दाखले न घेता सृष्टीतील यच्चयावत घटकान्ची दखल घेऊन त्यान्चेकडूनही मिळू शकणारे "संदेश" समजुन घेऊ पहातो.
ज्ञानात जर भर पडत असेल तर त्याचे स्वागतच करतो. पण जाऊद्याहो, तुम्हाला त्याची "चव" काय कळणार? Proud Biggrin

मनगटातला जोर संपला कि माणूस हातांच्या रेषात आणि नशिबाच्या पटलावर आपले भविष्य शोधू लागतो स्वतावर विशेवास ठेवा जग लोटांगण घालेल... इति स्वामी विवेकानंद

लोकमान्य टिळकांनी आपला एकही राजकीय निर्णय ज्योतिषांच्या सांगण्यानुसार बदलला नाही. त्यांचे उत्तर असे,
‘‘ग्रह आपले काम करतील, मला माझे काम करू द्या.’’

अरे वा छान चर्चा चालू आहे. मला एक विचारायचे आहे.पोपट घेऊन बसणारे ज्योतिषी बरोबर भविष्य सांगतात का हो? कुणाला अनुभव असेल तर कृपया सांगा.उगाच जाऊन फसवणूक नको. अनुभवी लोकांना विचारलेले बरे.

<<एकतर तुम्ही ज्योतिषाचा काहीही अभ्यास न करता, किन्वा सोईस्कर तेवढाच वर वर माहितीसदृष "अभ्यास(?)" करुन मत मान्डता आहात किन्वा जाणून बूजून गैरसमज पसरवत आहात.>>
अस समजा कि आम्हाला ज्योतिषातले काहीही कळत नाही. पण आम्ही ज्योतिषातील अंतर्विसंगती / मतभेद हे मांडतच असतो. जे व्यावसायिक ज्योतिषी व या क्षेत्रातील दिग्गज समजले जातात त्यांची मते देखील तुम्हाला गैरसोयीची अशी आहेतच ना! विवाह मंगळाची अनावश्यकता हे ज्योतिषाचार्य सुंठणकर यांचे पुस्तक वाचले तर लक्षात येईल की ज्योतिषांची व ज्योतिषविषयाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे असो! हा विषय आम्ही गेली पंचवीस वर्षे मांडत आहोत. लोकांनी ही ज्योतिषाचा अभ्यास करावा म्हणजे त्यांना त्यातील तार्किक विसंगती लक्षात येतील.
अवांतर- आम्ही ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद ची लिंक वेळोवेळी देत असतो. पण फक्त जिज्ञासू लोकच त्या लिंकवर जाउन ते संपुर्ण वाचतात. बाकीचे लोक संबंधीत विषयाचा भाग पुढ्यात आला तरच वाचतात असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे कधी कधी आम्ही मजकूर कट पेस्ट करुन लावत असतो.
मायबोलीकरांनी आमच्या फलज्योतिष चिकित्सा मंडळा ला जरुर भेट द्यावी

घाटपांडे यांनी त्यांच्या कुठल्यातरी लिंक वर म्हटले होते की अनिश्चितता आहे तोपर्यंत ज्योतिषाला मरण नाही. हा मुद्दा मला फार पटतो. कितीही आदळआपट केली तरी काहीही फरक पडणार नाही. मुळात सर्वांची क्षमता सारखी नसते पण तरीही प्रत्येकाची श्रीमंत किंवा चांगले सर्व व्हावे ही इच्छा असते. एखाद्याला परिस्थितीचे चटकन आकलन होते आणि निर्णय घेण्याची क्षमता मुळातूनच असते किंवा भरपूर टक्के टोणपे खावून येते. पण हे सगळ्यांच्याच बाबतीत होत नाही मग त्या लोकांनी काय करायचे ह्याचे उत्तर किंवा त्यांना सपोर्ट कसा द्यायचा असे पर्याय जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत कितीही महापुरुषांची उदाहरणे दिलीत तरी लोक जाणारच ज्योतिषाकडे. जेंव्हा बाकीचे पर्याय मिळतील तेंव्हा हे कमी होईल. तिकडे त्या होमिओपॅथिक च्या धाग्यावर एवढी चर्चा झाली तरी फार काही फरक पडला नाही मग इथे कसा काय पडेल.

<<मग त्या लोकांनी काय करायचे ह्याचे उत्तर किंवा त्यांना सपोर्ट कसा द्यायचा असे पर्याय जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत कितीही महापुरुषांची उदाहरणे दिलीत तरी लोक जाणारच ज्योतिषाकडे>>
सहमत आहेच. आम्ही हे सांगत असतोच
फलज्योतिषाकडे येणारे लोक विविध प्रकारचे असतात. कुणी हताश होवून येतो. कुणी मार्गदर्शनासाठी येतो. कुणी उत्सुकतेपोटी येतो. भविष्यात काय होण्याची शक्यता आहे या एकाच प्रश्नाचे उत्तराभोवती सर्व जण येवून ठेपतात. नैराश्यापोटी आलेल्या लोकांना मन व मनाचे आजार याविषयी योग्य माहीती दिली गेली पाहिजे. चिंता, नैराश्य हे मनाचे आजार आहेत. मानसोपचार तज्ञांचा सल्ला व मानसोपचारावरील योग्य औषधांनी ते बरे होतात. शिवाय कौन्सिलिंग सेन्टर्स हे पण तुमच्या समस्या समजावून घेवून त्यावर कायदेशीर व व्यावहारिक उपाययोजना सुचवतात. सर्वांचे सर्व प्रश्न सुटतीलच असं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोणाचा अवलंंब केला तर तर्कबुद्धी, विवेक व आत्मनिरीक्षण यांच्या सहायाने आपले काही प्रश्न सुटू शकतात. अनिश्चितता ही सर्वांसाठी आहे. ती पचवायला शिकलं पाहिजे. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या पेक्षा जी गोष्ट आपल्या हातात आहे तिचा विचार केला पाहिजे. प्रयत्न ही आपल्या हातातली बाब आहे. अपयश ही यशाची पायरी आहे.
काही ज्योतिषी हे चांगले कौन्सिलर्स असतात. जातकांना दिलासा देतात. काही मात्र आपली पोळी भाजून घेणारे असतात. पण हे सर्व क्षेत्रात असते.

ज्योतीषाहून सहज एक जोक आठवला.

ज्योतिषी : तुझे नाव झंप्या आहे?
झंप्या : हो..
ज्योतिषी : तुला एक मुलगा आहे?
झंप्या : हो.. ज्योतिषी महाराज
ज्योतिषी : तू आत्ताच पाच किलो गहू घेतले.
झंप्या : तुम्ही अंतर्यामी आहात महाराज.
ज्योतिषी : मुर्खा, पुढच्या वेळी येताना पत्रिका घेऊन ये. रेशनकार्ड नको!

घाटपांडे गुरूजी, ते तसं आहे म्हणून तर लागू असलेले सगळे ट्याक्स सांगितले. सगळे कायदे सांगितले तर गाशा गुंडाळून पळून जातील हे सगळे Wink

<<धागाकर्ते धागा उघडताना ज्योतिषाबाबत कायदा करा असे म्हणताहेत, पण हळूहळू मूळरूपात येऊ लागलेत अन ज्योतिष थोतान्ड असे सिद्ध करू पहाताहेत.>>

हे सत्य आहे , माझा ज्योतिषा बाबब्त्चे गैरसमज समजावून सांगणारा लेख पहा ,अनेक प्रश्नाची उत्तरे मिळतील धडकेबाज साहेब

धडाकेबाज,

>> अठराव्या शतकापर्यंत डोळ्यांना दिसू शकणाऱ्या शनीपर्यंतच्या ग्रहांनाच पत्रिकेत स्थान होते.
>> कारण त्यापुढे ग्रह आहेत हे ज्ञात झाले नव्हते.

महर्षी व्यासांना युरेनस, नेपच्यून व प्लुटो ज्ञात होते. त्यांना अनुक्रमे श्वेत, श्याम व तीव्र अशी नवे नावे दिली होती. याचा माबोवर इथे उल्लेख सापडेल. मूळ इंग्रजी संदर्भ इथे आहे : http://goo.gl/q2D9X

यावरून पारंपारिक फलज्योतिषात शनीच्या बाहेरील ग्रहांना पत्रिकेत स्थान नसावे असे दिसते. हल्लीचे काही ज्योतिषी का देतात ते माहीत नाही.

आ.न.,
-गा.पै.

मनोरंजक चर्चा.

Few Facts (w.r.t above comments):
1. स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण इंग्लंड पाण्याखाली जाणार (१००० वर्षांनी) असे भविष्य वर्तविले आहे.
२. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण संप्रदाय ७००-८०० तरी वर्षे संपूर्ण जगाला मार्गदर्शन करेल असे भविष्य वर्तविले आहे.
३. योगी क्थामृतात वाचा - स्वामी विवेकानंदांनी एका युवकास भविष्य सांगितले आहे कि त्याचे गुरु त्याला भविष्यात भेटतील आणि खूण म्हणून एक चांदीचा पेला देतील.
४. संपूर्ण रामकृष्ण चरित्रात भविष्य सांगण्याची रेलचेल दिसते. स्वतः ठाकुर सर्व शिष्यांचे भविष्य सांगत.
५. लोकमान्य टिळक अनेकदा प्रसिद्ध भविष्यकारांना भेटत व आपले भविष्य विचारत. बहुधा केळकरांचे टिळक चरित्र किंवा बापटकृत आठवणी ....
६. गोंदवलेकर महाराजांनी अणुयुद्धाचे भविष्य केले आहे (बेलसरे कृत चरित्र).
७. टेंबे स्वामींनी हजारो व्यक्तीचे तंतोतंत भविष्य सांगितले आहे.

I respect all comentators, and I and my family personally never visit any astrologer (I do not trust most of them, and I agree most of them are after money). But there are a few respectable exceptions.

ग्राहक संरक्षण कायदा ज्योतिषांना लावायचा झाल्यास कसा लावावा याविषयी कुणी काही भाष्य केलेले नाही.

>>>> ग्राहक संरक्षण कायदा ज्योतिषांना लावायचा झाल्यास कसा लावावा याविषयी कुणी काही भाष्य केलेले नाही. <<<<
अहो केव्हापासून विचारतोय, आधी कायद्याची मूलतत्वे/गृहितके आणि कलमे तरी निश्चित करा, ती करण्याकरता ज्योतिषशास्त्राची पायाभूत तत्वे समजुन घ्यायला लागतील, कुन्डलीतील अमुक तमुक ग्रहस्थिती असता अमकेढमकेच भविष्य वर्तवायला हवे असे निश्चित करायला लागेल, त्याबद्दल बोला की राव!
अजुन कशात काय नाय अन डायरेक्ट कायदा अम्मलात आणायला निघताय? कायदा तर तयार करा की!

रवी म्हणजे सूर्य. सूर्य हा तारा आहे. तारा स्वयंप्रकाशी असतो. ग्रह परप्रकाशी असतात. ग्रह हे तार्‍याभोवती फिरतात. तरीही ज्योतिषी अजूनही रवीला म्हणजे सूर्याला ग्रह मानून तुमच्या-माझ्या पत्रिकेत पृथ्वीभोवती हिंडवत असतात. सूर्य-रवी हा तारा आहे, ग्रह नाही हे विद्वान ज्योतिषी केव्हा स्वीकारणार?

तुमची ग्रहतार्‍यांची व्याख्या आणि त्यांची व्याख्या एकच असावी असे का? तुम्ही विज्ञानाच्या पुस्तकात शिकता 'ग्रह' आणि 'तारे' म्हणजे काय ते. ज्योतिषशास्त्राचे पुस्तक असते तर हाच प्रश्न तुम्ही विज्ञानाला विचारला नसता कशावरून?

>>>> तरीही ज्योतिषी अजूनही रवीला म्हणजे सूर्याला ग्रह मानून तुमच्या-माझ्या पत्रिकेत <<<<< Lol तेच ते नेहेमीचे आचरट प्रश्न! असो.
सूर्याचे काय घेऊन बसलाय? आमच्या हिन्दू संस्कृतीत तर, बरका, जावयाला देखिल "(दशम)ग्रह" म्हणतात (म्हणजे नऊ ग्रहानंतरचा अजुन एक तापदायक ग्रह या अर्थाने) Wink
आता तुम्ही कोणाचे जावई झालेले असाल तर आमच्या मते तुम्ही पण तुमच्या सासर्‍याच्या राशीला आलेले "(दशम)ग्रहच". Proud Biggrin

राहू, केतू हे काल्पनिक ग्रह आहेत.आपण शाळेमध्ये जे ग्रह शिकलोत त्यात राहू, केतू नावाचे ग्रह नाहीत. सूर्यमंडळामध्ये मुळात नसलेले हे ग्रह आलेत कुठून? हजारो वर्षाआधी केवळ डोळ्यांच्या साहाय्यानं माणसानं ग्रह शोधले. त्या वेळी आपल्यापासून या ग्रहांचं अंतर किती असावं याचा त्याला अंदाज करता येणं शक्यच नव्हतं. म्हणून ग्रहणाचा अभ्यास करताना काहीतरी चंद्र आणि सूर्याला गिळंकृत करत असावं असा त्यानं अंदाज केला. राहू, केतू, साप आहेत किंवा राक्षस आहेत. विशिष्ट काळात ते चंद्राला वा सूर्याला गिळतात म्हणून चंद्रग्रहण व सूर्यग्रहण लागतं असा समज रूढ झाला. आजही पुराण ग्रंथांमधून तो वाचायला मिळतो.चंद्र आणि सूर्याच्या भ्रमणकक्षा जिथे छेद देतात त्या बिंदूंना राहू आणि केतू असं मानलं गेलं. आता हे छेदनबिंदू मुळातच काल्पनिक आहेत. कारण पृथ्वीपासून चंद्राचं अंतर एक फूट पकडलं तर पृथ्वी, सूर्य यांचं अंतर 385 फूट पकडावं लागेल. पृथ्वी मध्यबिंदूवरून 1फुटावर फिरणार्‍या चंद्राची भ्रमणकक्षा 385 फुटांवरून फिरणार्‍या सूर्याच्या कक्षेला कधीही छेद देऊ शकणार नाही.त्यामुळं राहू, केतू हे छेदनबिंदू आहेत ही मांडणीसुद्धा ज्योतिष्यांचं पृथ्वीपासून सूर्य आणि चंद्र यांच्यातील अंतराबद्दल त्यांचं अज्ञान दर्शविणारी आहे, काल्पनिक आहे.सूर्य आणि पृथ्वीच्या मधे चंद्र आला तर सूर्यग्रहण लागतं आणि सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली तर चंद्रग्रहण लागतं हे ज्ञान मानवजातीला झाल्यानंतर ज्योतिष्यांचे राहू, केतू म्हणजे साप व राक्षस या कल्पना हास्यास्पद ठरू लागल्या. म्हणून हुशार ज्योतिष्यांनी त्यांना 'इन्व्हिजिबल प्लॅनेट्स न दिसणारे ग्रह' ठरवलेत..

सूर्याचे काय घेऊन बसलाय? आमच्या हिन्दू संस्कृतीत तर, बरका, जावयाला देखिल "(दशम)ग्रह" म्हणतात >>>>>>>बरोबर आहे तुमचं फक्त कुंडलीत अजून एक ग्रह म्हणून जावई हा ग्रहहि जोडू नका.

धडाकेबाज,

आपला इथला संदेश वाचला. फलज्योतिषशास्त्राला निरर्थक ठरवण्याच्या खटाटोपात तुम्ही ज्योतिषशास्त्रात (म्हणजे ज्योति:शास्त्रात म्हणजेच खगोलशास्त्रात) नकळत प्रवेश करीत आहात. तेव्हा आपली मर्यादा सांभाळून असावं ही विनंती.

१.
>> त्या वेळी आपल्यापासून या ग्रहांचं अंतर किती असावं याचा त्याला अंदाज करता येणं शक्यच नव्हतं.

आर्यभट्टाने लिहून ठेवलंय की सूर्य पृथ्वीपासून १०८ सौरव्यासांइतका दूर आहे, आणि चंद्र पृथ्वीपासून १०८ चांद्रव्यासांइतका दूर आहे. ही अंतरे आजच्या मोजमापाच्या जवळपास आहेत. कुणाला काय शक्य होतं आणि काय शक्य नव्हतं याविषयी बांधलेले आडाखे वस्तुस्थितीवर आधारित असावेत.

२.
>> राहू, केतू, साप आहेत किंवा राक्षस आहेत. विशिष्ट काळात ते चंद्राला वा सूर्याला गिळतात म्हणून चंद्रग्रहण
>> व सूर्यग्रहण लागतं असा समज रूढ झाला. आजही पुराण ग्रंथांमधून तो वाचायला मिळतो.

हा समज प्राचीन युरोपातही होता. Caput Draconis असा राहूचा उल्लेख केला जाई.

तुमच्या मते प्राचीन (म्हणजे ख्रिस्तपूर्व) युरोपीय श्रद्धाळू की अंधश्रद्ध?

३.
>> आता हे छेदनबिंदू मुळातच काल्पनिक आहेत. कारण पृथ्वीपासून चंद्राचं अंतर एक फूट पकडलं तर
>> पृथ्वी, सूर्य यांचं अंतर 385 फूट पकडावं लागेल. पृथ्वी मध्यबिंदूवरून 1फुटावर फिरणार्‍या चंद्राची
>> भ्रमणकक्षा 385 फुटांवरून फिरणार्‍या सूर्याच्या कक्षेला कधीही छेद देऊ शकणार नाही.त्यामुळं राहू, केतू
>> हे छेदनबिंदू आहेत ही मांडणीसुद्धा ज्योतिष्यांचं पृथ्वीपासून सूर्य आणि चंद्र यांच्यातील अंतराबद्दल त्यांचं
>> अज्ञान दर्शविणारी आहे

तुम्ही सांगोवांगीच्या बाजारगप्पांवर स्वत:च्या धारणा बनवून घेतल्या आहेत. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणप्रतलास (पृथ्वीच्या कक्षेस नव्हे!) चंद्राची कक्षा ज्या दोन बिदूंत छेदते त्यांना राहू आणि केतू अशी नावे आहेत.

४.
>> सूर्य आणि पृथ्वीच्या मधे चंद्र आला तर सूर्यग्रहण लागतं आणि सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली तर
>> चंद्रग्रहण लागतं हे ज्ञान मानवजातीला झाल्यानंतर ज्योतिष्यांचे राहू, केतू म्हणजे साप व राक्षस या
>> कल्पना हास्यास्पद ठरू लागल्या. म्हणून हुशार ज्योतिष्यांनी त्यांना 'इन्व्हिजिबल प्लॅनेट्स न दिसणारे
>> ग्रह' ठरवलेत..

राहू व केतू हे न दिसणारे ग्रह फलज्योतिषातील आहेत. त्याचा ज्योतिषशास्त्राशी म्हणजे खगोलशास्त्राशी संबंध जोडू नये.

शिवाय तुमचा दाव्याप्रमाणे ग्रहणांचं ज्ञान मानवजातीला कोण्या एका दिवशी झालेलं नाही. निदान भारताच्या बाबतीत तरी हे प्राचीन आणि परंपरागत ज्ञान आहे. याच ज्ञानाच्या सहाय्याने आजही पंचांग बनवले जाते. जेव्हा कालनिर्णय छपाईला टाकले जाते तेव्हा पुढील किमान दोन वर्षांच्या खगोलीय घटनांची (अमावस्या, पौर्णिमा, ग्रहणे, इत्यादि) आगाऊ माहिती असते.

तेव्हा फलज्योतिषाच्या आडून प्राचीन खगोलीय ज्ञानास खोटे पडण्याचा तुमचा उपद्व्याप थांबवावा ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

राहू व केतू हे न दिसणारे ग्रह फलज्योतिषातील आहेत. त्याचा ज्योतिषशास्त्राशी म्हणजे खगोलशास्त्राशी संबंध जोडू नये.

आश्चर्य म्हणजे न दिसणारे ग्रह ही कल्पना एका सत्यावर आधारित होती. युरेनस आणि नेपच्यून हे दोन्ही ग्रह शास्त्रज्ञांना आधी गणितात आढळले. त्यानुसार त्यांनी शोध घेतल्यानंतर त्या स्थानांवर हे ग्रह दिसले.प्लूटो हा ग्रह गणितानुसार असावा असे वाटल्यानंतर बर्‍याच काळानंतर तो सापडला, दिसला.

स्वाभाविकच ज्योतिष्यांची न दिसणारे राहू, केतू ग्रह ही चलाखी काही काळ चालली. पण त्या स्थानांवर राहू, केतू असूच शकत नाही. या निर्णयाप्रत खगोलशास्त्रज्ञ आल्यावर मात्र ज्योतिष्यांची फारच पंचाईत झाली. मग त्यांनी राहू, केतू हे 'इंटरसेक्टिंग पॉइंट्स' आहेत, असं सांगायला सुरुवात केली.

भारतातील महान ज्योतिषी आर्यभट्ट याने पाचव्या शतकाच्या शेवटी 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वी स्वत:च्या आसाभोवतीही फिरते' हे मत गणिताच्या आधारे मांडलं. पण डोळ्यांना पृथ्वीभोवती सूर्य फिरताना दिसत असल्यामुळं या ज्योतिर्विदांची मतं नाकारण्यात आली. उलट त्यांची खिल्ली उडवण्यात आली.

तुमच्या मते प्राचीन (म्हणजे ख्रिस्तपूर्व) युरोपीय श्रद्धाळू की अंधश्रद्ध?>>>>>> अंधश्रद्ध

Pages