भरला मासा

Submitted by अवल on 27 May, 2013 - 00:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पापलेट/ सुरमयी/ बांगडा/ जीताड/ रावस, बांगडा असा कोणताही मासा अडवा चीर देऊन ( मासे आणताना मासेवाल्याला सांगा भरला करायचा आहे, तो योग्य पद्धतीने चीर देतो ), लसून ८-१२ पाकळ्या, २ मिरच्या, कोथिंबीर, खोवलेला नारळ , हळद १/४ चमचा, लिंबाचा रस २ चमचे, मीठ चवी नुसार, मासा बांधायला पुडाचा दोरा, २ चमचे तेल.

क्रमवार पाककृती: 

मासा आतून, बाहेरून स्वच्छ धुवा, निथळत ठेवा. त्याला हळद, थोडे मीठ आणि लिंबाचा रस हे चोळून ठेवा.

आता खोबरे, मिरच्या, लसून, कोथंबीर, मीठ ह्याची हिरवी चटणी करा. पाणी अजिबात घालु नका.

आता ही चटणी माशाच्या पोटात भरा ( आडवी चीर दिलेल्या भागात). आता पुडाच्या डॉ-याने हा मासा X आणि | असा बांधून घ्या.

साधारण १० मिनिटांनी पॅन मध्ये २ चमचे तेल टाकून गरम करायला ठेवा. पॅन गरम झाले की आच मंद करा. त्यावर हा बांधलेला मासा ठेवा. झाकण ठेऊन ५-७ मिनिटे ठेवा. नंतर झाकण काढून भातीय ( भात वाढायचे ) घेऊन त्यावर अलगद मासा घ्या, दुस-या उलथन्याने हळूच उलटा करून पॅन वर टाका. पुन्हा झाकण ठेऊन ५-७ मिनिटे ठेवा, झाकण घाला.

आता आच बंद करा. हळूच प्लेट मध्ये मासा घ्या. कात्रीने वरचा दोरा कापून टाका, तो प्लेट मधून बाजूला काढा, आणि ताव मारा भरल्या माशावर !

( फोटो नंतर )

वाढणी/प्रमाण: 
दोघांनी पुरवून खावा
अधिक टिपा: 

भरल्या माशाचा अजून एक कांदा टॉमेटोचा प्रकार आहे तो ही लिहेन

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक सी़केपी पदार्थ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असा सेम भरला मासा माझी एक मैत्रीण बनवायची पण ती तो मासा केळीच्या पानात गुंडाळून मग पॅनमधे ठेवायची. कायच्या काय टेस्टी लागायचा तो मासा. Happy

कोकणाचे वेध लागलेत त्यामुळे माशे आठवताहेत, पण केले नाहीत त्यामुळे फोटो नेक्स टाईम.
नंदिनी हो ग हो. केळीचे पान नाहीतर हळदीच्या पानात तर फारच भारी Happy गेला बाजार कर्डळही चालते. अन मग तेलाला पूर्ण चाट दिलीतरी चालते. चूल, निखारा यात हे ठेवले तर स्वर्गसुखच !
दिनेशदा, टिपिकल सीकेपी शब्द :)... टोप, लंगडी,कालथा, साणशी, कढलं,बुडकुलं, चंबू,... Happy

अवल, तुझी पाकृ वाचताना माझ्या नणंदेच्या हातच्या भरल्या पापलेटाची आठवण झाली. रचाकने फोटो टाकला नाही म्हणून धन्यवाद Happy

अवलचे नाव आणि भरला मासा शिर्षक वाचल्यावर मला भरतकामाचा काही प्रकार आहे असं वाटलं Wink

वा मस्तच.
मी मागे अशी भरल्या पापलेटची पाकृ टाकली होती.

मी हल्ली जास्त तेल खायचे नाही म्हणून केळीच्या पानात गुंडाळूनच मासे पॅनमध्ये तळते.