रवा इडली

Submitted by डॅफोडिल्स on 1 September, 2010 - 09:38
rava idli sambar chutney
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रवा २ वाट्या (उपम्यासाठी वापरतो तो गव्हाचा मध्यम जाडसर रवा),
उडीद डाळ १ वाटी,
तेल १ छोटा चमचा,
मिठ चविप्रमाणे,
खायचा सोडा ऐच्छीक ( गरज वाटलीच तर),

क्रमवार पाककृती: 

२ वाट्या रवा (उपम्यासाठी वापरतो तो जाडसर रवा) बंद डब्यात ठेऊन कुकरमध्ये कोरडाच वाफवून घ्यायचा. ( मी वरणभाताच कुकर लावतानाच रव्याचा डबा पण ठेवते)

१ वाटी उडद्डाळ साधारण चार तास भिजवून वाटून घ्यायची. पाणी फार वापरायचे नाही.

रवा थोडा थंड झाल्यावर पाण्याने धूउन घेउन वाटलेल्या डाळीत मिक्स करायचा.
रवा वाफवून नंतर धूउन घेतल्याने हलका होतो.

चविपुरते मिठ घालून बॅटर रात्रभर (किंवा सहा सात तास) ठेउन द्यायचे. मस्त पिठ फुगते.
इडल्या करण्याआधी एक चमचा तेल आणि एक चमचा पाणी मिक्स करून ते त्या बॅटर मध्ये घालून इडल्या बनवायच्या. मस्त स्पॉन्जी जाळिदार इडल्या होतात.

idli.jpg

वाढणी/प्रमाण: 
मध्यम आकाराच्या वाटीच्या प्रमाणात २२-२४ इडल्या होतात.
अधिक टिपा: 

इडलीचे पिठ चांगले येण्यासाठी ...

उडिद डाळ वाटताना जास्त पाणी वापरायचे नाही.
पण डाळ भिजवलेले पाणी फेकुन न देता रवा मिक्स करून बॅटर तयार करताना वापरायचे. म्हणजे पिठ छान येते ( फुगते/ आंबते). पिठ पळीवाढे असावे. म्हणजे सहा सात तासानी चांगले फुगते.

वाटीभर भात( उरलाच असेल आणि संपवायचा असेल तर) वाटून ह्या पिठात मिक्स केला तरी चालतो.

काहीवेळा थंडीमुळे पिठ आले नाही किंवा इडल्या लवकर बनवायच्या असतिल तर चिमुट्भर सोडा चमचाभर पाणी आणि चमचाभर तेल मिक्स करून पिठात घालायचे.

ज्यांना तांदूळ चालत नाही त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

माहितीचा स्रोत: 
मावशी :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए खरंच मस्त इडल्या..माझी पोरं ईडली पंखा क्लबचे आजीवन सदस्य आहेत..
आणि रवा धुवायची ़पद्धत विचारल्याबद्दल आभार.
मला कदाचित विचारायचं डेरिंग झालं नसतं...महासुगरण कॅटॅगरीतल्या लोकांना प्रश्न विचारायला भ्या वाटतं तसंच Proud

बरं आणखी एक प्रश्न हा तो लापशी रवा म्हणतात तोच का? हो असेल तर बाबांना पथ्याचं जेवण असतं त्यांनादेखील सजेस्ट करता येईल.
धन्स इन अ‍ॅडव्हान्स.

महासुगरण Rofl भंजाळले मी....
वेका अगं सक्काळी सक्काळी मस्करी नको करु गं !

लपशी रवा नाही नुसता रवा. एक अगदी बारिक असतो तो नाही. दोघांच्या मधला.

मंजुडे आयडिया सांगुका ? सिंक मध्ये रव्याचे कण दिसले ना तर भर्र्कन मोठ्या नळ सोडून पाणी टाकून द्यायचं Wink मेरेकु रवा सांभाळके हळ्ळूवार काम करके न सांडवणेका पेशन्स नय ! Sad

आमच्याकडे पण इडली फॅक्ल चे मेंबर आहेत. हे नक्की करणार. ह्या विकेंडलाच किंवा त्याआधीही.
खरच त्या इडल्या इतक्या पांढर्‍याशुभ्र कशा? उडीद डाळ किंवा र्वा दोन्ही एवढे शुभ्र दिसत नाहीत (ना ?)
Uhoh

माझी फेवरेट रेसिपी पण असा रंग कधीच येत नाही.
कालच केली होती Happy
idli 002.jpgidli 004.jpg

ह्यात २ वाट्या उडीद दाळ + ३ वाटी उपमा रवा + १ वाटी इडली रवा आहे.

इडल्या भारी एकदम. ओव्हरऑल इडली हेल्दी पदार्थ आहे हे खर पण मधुमेही व्यक्तिंसाठी रेग्युलर (तांदळाची) इडली आणि ही इडली सारखीच, कारण दोन्हितुन सारख्याच प्रमाणात कार्बोदके मिळतिल. त्यामुळे तिचा पर्याय म्हणुन ही चालणार नाहि.

मस्त मस्त प्रीती. Happy चटनी माझ्या आवडीची दिसते अगदी हिरवी Happy
हो ग मलाही रव्या मध्ये दोन तिनदा फरक वाटला. कधी कधी तांबुस दिसतात खरच

चालेल ग पण ते रेग्युलर इडली मध्येहि चालेल म्हणजे दोन्हि सारख्याच (कमी) प्रमाणात खाव्या लागतील कारण डाळिंमध्ये पण कार्बोदके असतातच. पण दोन्हि इडल्या अजीबात वर्ज्य करायची पण गरज नाहि प्रमाणात खाल्ल्या म्हणजे दोन जेवणांमध्ये एकावेळि खुप मोठ्या नसलेल्या (म्हणजे काहि ठिकाणि विशेषतः रेस्टॉरेंट्स मध्ये ज्म्बो इडल्या मिळतात त्या न घेता आपल्या घरच्या इडली पात्रात ज्या आकाराच्या होतात त्या) दोन इडल्या एक वाटीभर सांबार आणि चटणी चालु शकेल (हे बॉलपार्क एस्टिमेट आहे एग्झॅट नाहि). पण अमुक एक गोष्ट मधुमेहिंना पर्याय म्हणुन चालेल अस कळल की कितिहि प्रमाणात चालेल असा गैरसमज होउ शकतो म्हणुन लिहावस वाटल.

रमा अजून एक शंका.. रव्याच्या इडलीचा ग्लायसेमीक इंडेक्स कमी असतो म्हणून नेक्स्ट भूक उशीरा लागते म्हणून तांदळाच्या इडलीपेक्षा गव्हाची सरस (तेवढ्याच प्रमाणातली )असेल का?

नाहि कारण ग्व्हाच वरच आवरण पुर्णपणे काढुन बनवलेला रवा (कोंडा?) आणि वरच तपकिरी आवरण काढुन बनवलेल्या तांदळाचा रवा ह्या दोघांचा ग्लासेमिक इंडेक्स साधारण सारखाच असेल (१९/२० चा फरक) त्यामुळे मधुमेहिंची साखर सारख्याच प्रमाणात वाढेल.

रमा, थँक्स, मला पण काल रेसीपी वाचल्यापासून तोच प्रश्न पडलेला.
http://www.livestrong.com/article/356371-comparison-of-nutrition-in-rice...
हे इथल वाचल्यावर आणखीणच कन्फ्युज झाले मी. बघशील का ती लिंक जरा?

डॅफो, रेसीपी आवडली. फोटो फार मस्त आला आहे.मी रवा इडली आई मिक्स करुन देते गिट्स सारखं त्याची करते. (त्यात फोडणी असते बहुदा)आता ही पण रेसीपी एकदा करुन पाहिन.

सीमा,

मी लिंक बघितलि. मलाहि जरा कन्फ्युजन आहे. सामान्यपणे तांदळाच्या जातीनुसार त्यातिल स्टार्च च प्रमाण आणि म्हणुन कॅलरी ज्यास्त असतात. म्हणजे सारख्या वजनाच्या बासमति किंवा तत्सम तांदुळात आर्बोरो राइस पेक्ष्या कमी स्टार्च आणि कॅलरी असतिल. थोडक्यात जाति नुसार तांदळाच न्युट्रिशन लेबल बदलेल. सामान्य पणे आपण रिसोटो किंवा स्टिकि राइस मध्ये लागतो तितका स्टार्ची तांदुळ वापरत नाहि.
जी लिंक तु दिलि आहेस तिथे तांदळासाठी संदर्भ म्हणुन जी लिंक दिलि आहे ती कुठल्या सांयस जर्नल ची नाहि माय फिटनेस पाल ची आहे. त्यांनी हे संदर्भ कुठुन घेतलेत त्याचा काहि रेफरंस दिला नाहिय त्यामुळे त्या तांदळाच्या पीठासाठी कुठला तांदुळ वापरलाय ते माहिति नाहि. दुसर म्हणजे सगळे हिशोब १ कप ह्या मापात आहे. पिठांच्या संदर्भात व्हॉल्युम हे माप फारस रिलायबल नाहि कारण कपात पीठ किति बसेल हे पीठ कुठल आहे त्यावर अवलंबुन असत. उदा. एका कपात चाळुन घेतलेल ११५ ग्रॅम ऑल परपज फ्लावर बसत तर चाळुन घेतलेल तांदळाच पीठ १२६ ग्रॅम बसेल. मी त्या माय फिटनेस च्या लिंकवर ग्रॅम मध्ये बदलण्याचा प्रयत्न केला पण मला करता आल नाहि.

बॉटम लाईन मला लाईव्ह स्ट्राँग वर लिहलेल चुकीच वाटले कारण तुलना फक्त सारख्या वजनाच्या सॅंपल्स मध्येच होउ शकेल.

मग मापानेच (व्हॉल्युम) मोजलेल्या इडल्यांमध्ये फारसा फरक नाहि अस मी का म्हंटल असा प्रश्ण पडेल कदाचीत. तर त्याच उत्तर इडली च फायनल टेक्स्चर अचिव्ह करण्यासाठी जेव्हढा स्टार्च (उडदाच्या डाळितल्या प्रोटिन्स च्या प्रमाणात) लागेल त्या शिवाय इडली ईडली सारखी वाटणार नाहि. म्हणजेच ती जर तशी वाटत असेल तर दोन्हि प्रकारच्या इडल्यात सारखाच स्टार्च आणि म्हणुन कार्बोदके असतील.

मधुमेहींसाठी करायची तर लापशी रवा चालावा. खरं म्हणून मी तो वरचा प्रश्न विचारला होता आणि डाळ पण सालवाली हवी. म्हणजे फायबर कंटेट वाढेल.
माझं एका dietitian शी झालेल्या बोलण्याप्रमाणॅ मैदा आणि रवा equally bad आहे. त्याऐवजी लापशी रवा, दलिया हे वापरावं.

आता मला माहित नाही ही रेस्पि लापशी वापरून कशी लागेल पण प्रयोग म्हणून करायला हवी. आणि तरिहि एकंदरित कार्ब पाहता दोन-तीन छोट्या इडल्या ही सर्विंग साइज असावी.

डॅफो तू रवा साबणाने धुतेस की काय Light 1 केवढ्या सफेद त्या इडल्या. गुड वर्क.

धन्यवाद ह्या रेसिपी करिता.I tried this today but idli didn't turn out as expected.They were flat and not fluffy Sad :(. can you help me to understand what must have gone wrong?

P.S. Sorry to put this message in English but i'm still trying to learn Marathi typing here Sad

प्राची, पळीवाढे म्हणजे बहुतेक नेहमीसारखेच इडलीच्या पीठासारखे असावे असा माझा अंदाज.

मी या इडल्या करायच्या म्हणून उडदाची डाळ भिजत घातली होती, पण प्रीतिने टाकलेला फोटो पाहून माझ्याकडचा रवा वापरला तर इडल्यांचा रंग कसा येईल त्याची पूरेपूर कल्पना आली आणि मी नेहमीसारख्याच पोहे, इडली रवा घालून इडल्या केल्या Wink

वेका Lol तिट पावडर लाउन फोटो काढलाय Wink

They were flat and not fluffy >>>> पिठाची कन्सिस्टन्सी बरोबर होती का ? जास्त पातळ झालं असेल कदाचित. आणि किती वेळ बॅटर ठेवले होते फर्मेंट झाले नव्ह्ते का निट ? तसे फर्मेंट झाले नसेल तर वर सांगितल्या प्रमाणे तेल पाणी मिक्स करून त्यात चिमुट्भर सोडा घालून पिठात मिक्स केले तरी मस्त फ्लप्पी जाळिदार इडली होते.

प्राची हो पळीवाढे म्हणजे नेहमी तु आप्पे इडली सठि बनवते तसेच Happy

मी आजच सकाळी करुन बघितल्या, छान झाल्या Happy
काल दूपारी डाळ भिजत घातली, सायंकाळी रवा वाफवुन घेतला व बारीक केलेल्या डाळीमधे मिक्स केला, आज सकाळी इडल्या केल्या Happy वरल्या फोटो सारख्या नै झाल्या, पण चविला छानच झाल्यात.
याचे धिरडे मात्र होत नाही असा अनुभव आला.
कृति इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

मी ही केल्या इडली रवा+उपमा रवा मिक्स घातले रंग वरच्या प्रितीने टाकलेल्या फोटो सारखाच आला. हलक्या झाल्या

रवा कोरडाच वाफवायचा म्हणजे नक्की कसा? (मी हौशी स्वयंपाकी आहे).
एका कुकर मध्ये तळाशी वाटीभर पाणी ठेवायचे. त्यात एक कुकरचा डबा ( बंद करून ?) त्यात रवा ठेवायचा आणी एक शिट्टी जेमतेम होईल इतके तापवायचे. बरोबर ? रवा धुवून घ्यायचा की कोरडाच ?

डॅफो, तुझ्या फोटोतल्यांसारख्या शुभ्र पांढर्‍या नाही झाल्या, पण इडल्या चांगल्या झाल्या. पाककृतीसाठी धन्यवाद!

विकु, रवा ठेवलेल्या डब्याचा पाव भाग बुडेल इतपत पाणी कुकरमधे घालून रवा वाफवायचाय. आधी कोरडाच वाफवून, गार झाल्यावर धुवायचा.

एकदा केल्यावर ही पाककृती विसरूनच गेले होते. तब्बल दोन वर्षांनी वर आली. त्याकरता cha ह्यांना धन्यवाद.

लवकरच करणार.

Pages