तुझ्या चिंतनाची नशा और आहे...

Submitted by मुग्धमानसी on 22 May, 2013 - 03:39

तुझ्या चिंतनाची नशा और आहे
तू नसणे समोरी... तसे गौण आहे!

जिथे पाऊले दूर वळली तुझी रे
तिथे मी स्वतःची रोवली वेल आहे!

पहाडाप्रमाणे तुझे स्वत्व जपले
तिथे पायथ्याशी मी अनभिज्ञ आहे!

फुले सांडली ओंजळीतून काही...
तुला काय नुकसान कळणार आहे?

नसूदे तुझा थेंबही सोबतीला
मनी दाटले तूच आभाळ आहे!

मनीच्या प्रदेशी तुझे राज्य असते
जरी ते अताशा कोरडे शुष्क आहे!

अशा छान बेबंद जमतात गप्पा...
मध्ये शब्द उच्चारणे.. व्यर्थ आहे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिथे पाऊले दूर वळली तुझी रे
तिथे मी स्वतःची रोवली वेल आहे!

पहाडाप्रमाणे तुझे स्वत्व जपले
तिथे पायथ्याशी मी अनभिज्ञ आहे!
>>>>>>>>
व्वाह
मस्त, सुरेख, अप्रतिमच
आणखी काय सांगु Happy

फुले सांडली ओंजळीतून काही...
तुला काय नुकसान कळणार आहे?

नसूदे तुझा थेंबही सोबतीला
मनी दाटले तूच आभाळ आहे!

>> सुरेख!

पहाडाप्रमाणे तुझे स्वत्व जपले
तिथे पायथ्याशी मी अनभिज्ञ आहे!
>> आशय खूप आवडला.

चिंतनाची नशा जssरा खटकले.
शुभेच्छा!

केवळ अप्रतीम !!
अनेक शेर छान आहेत
(काही ठिकाणी लयीत नसणे ही बाब लक्षात घेवून सगळ्याच द्वीपदीना शेर म्हणत नाही आहे इतकेच )

अकारांत स्वरकाफिया मान्य केल्यास त्यातील एक अप्रतीम गझल म्हणून हे उदाहरण देता येईल/ आले असते

खूपच दर्जेदार कवयित्री आहात आपण
तुम्हाला वाचायला मिळाले हे आयुष्यास सुखावणारे

कल्पना विस्तार छान आहे,पण शब्दांची गुंफण अजुन नीट जमली/वृत्तात नीट ''बसली'' की अजुन छान वाटेल. Happy