चुकूनसुद्धा...

Submitted by मुग्धमानसी on 14 May, 2013 - 01:55

चुकूनसुद्धा माझा विषय निघू देऊ नकोस
मनात माझ्या क्षणांनाही जगू देऊ नकोस...

हसून सगळं टाळत जा
क्वचित काही बोलत जा
बोलतानाही शब्दांमध्ये
उगाच हसू घोळत जा
दोन शब्दांत जीवघेणं अंतर पडू देऊ नकोस..

देवापुढे दिवा लाव
हात जोड, डोळे मिट
पसरलेलं सगळं मन
पुन्हा लावून ठेव नीट
पण आठवांच्या उतरंडीला धक्का लागू देऊ नकोस...

पानांमागे विसावलेला
चंद्र हळूच बघताना
गार झुळूक हलकेच तुझ्या
अंथरुणात शिरताना
कवटाळलेल्या स्वप्नांत डोळे भिजू देऊ नकोस...

मोगर्‍याचा वेल काही
आकाशाला भिडत नाही
माझ्यावाचून तसे तुझे
काहिसुद्धा अडत नाही
कधी वाटलंच यावं तर मग पाऊल अडू देऊ नकोस...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

धन्यवाद! रिया... खरेबुवांच्या पंगतीत बसायला फार वेळ लागेल गं मला अजून... Happy

क्लास !!!
उत्तम गीत लेखन

तुम्ही माझ्या एक अतीशय आवडत्या कवियित्री झालेल्या आहात आता

ओळ न् ओळ अतीशय सहजसुंदर करता तुम्ही अन् अलगद नेवून ती काळजाला भिडवता

यमकांचं नेमकं ज्ञान आणि अतीशय दर्जेदार खयाल अतीशय साध्या शैलीत साकार करणे हे तुमच्या कवितेतले दोन गूण पाहताक्षणीच प्रेमात पाडतात (तुमच्या कवितेच्या ;))

मी अनेक दिवस सांगतोय की तुम्ही गझल लिहायचं मनावर घ्याच म्हणून आजही सांगतो मनावर घ्याच राव !!!

मी नेहमीच मानात आहे ते बोलायचा प्रयत्न ठेवतो
तुम्हाला चेष्टा वाटत असेल तर तसे समजा

देवापुढे दिवा लाव
हात जोड, डोळे मिट
पसरलेलं सगळं मन
पुन्हा लावून ठेव नीट
>> व्वा!!! शेवटी देवापुढे जाऊन शांतता शोधायची! हे शब्दांत छान मांडलंय...

कुणाचंही कुणावाचून अडत नाही, हेही खरं! अडत नाही हे सांगणारी कारणांची यादी तयार असते आपल्याकडे... Happy

आशय आवडला, पण not one of ur best...

<<देवापुढे दिवा लाव
हात जोड, डोळे मिट
पसरलेलं सगळं मन
पुन्हा लावून ठेव नीट
पण आठवांच्या उतरंडीला धक्का लागू देऊ नकोस...<<<

वाह!! अप्रतिम!! सुंदर कविता! Happy

धन्यवाद सर्वांना.
वैवकु>> तुम्ही नाही पण मी चेष्टाच केली तुमची. मनावर घेऊ नका. हे असं होतं आणि मला उत्तरं देता येत नाहीत म्हणूनच मी गज़ल विभागाकडे फिरकायला घाबरते.

आनंदयात्री>> प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

म्हणूनच मी गज़ल विभागाकडे फिरकायला घाबरते.

अग भिड बिंधास ! Happy

कविता तर जाम आवडली...नेहमीप्रमाणे

म्हणूनच मी गज़ल विभागाकडे फिरकायला घाबरते.

अग भिड बिंधास !
>>>
Sad
मला कल्पनेनेच भिती वाटली... इतक्या चांगल्या कवियित्रीच्या कल्पनेची पर्यायी वाट लागेल तिकडे Sad
मानसी, तू गझला लिही आणि स्पष्ट टिप लिही की या धाग्यावर काही ठराविक आयडींनी प्रतिसाद द्यायला मनाई आहे.

धन्यवाद अमेय, सुप्रिया आणि रिया...

अग भिड बिंधास !>>> ठिक आहे सुप्रियाताई. भविष्यात करेन प्रयत्न बहुदा!

अतिशय सुंदर कविता ....

<<<<ओळ न् ओळ अतिशय सहजसुंदर करता तुम्ही अन् अलगद नेवून ती काळजाला भिडवता

यमकांचं नेमकं ज्ञान आणि अतिशय दर्जेदार खयाल अतिशय साध्या शैलीत साकार करणे हे तुमच्या कवितेतले दोन गुण पाहताक्षणीच प्रेमात पाडतात (तुमच्या कवितेच्या ) >>>>> +१००

छान!

अग भिड बिंधास ! ठिक आहे सुप्रियाताई. भविष्यात करेन प्रयत्न बहुदा!....
ये हुयी न बात....

(काही) प्रतिसादंची पर्वाच करायची नाही.. हाकानाका! Wink

असो कवीता नेहमीप्रमाणे उ त्त म! Happy

Pages