निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राणीच्या बागेत पण आहे आयव्हिचा वेल.

मामी असे प्रकल्प राबवताहेत हे वाचून बरे वाटले.

गजानन ते कैलाशपती आहे ना.

शिवाजी पार्कचा प्रकल्प खरंच व्हायला हवा. महाराजांनी सर्व गडावर आधी पाण्याची सोय केली होती.
त्याशिवाय अशा गडांवर इतकी माणसे, तग धरुच शकली नसती.
पावसाळ्यात पुणे हायवेवर पावसाचे कितीतरी पाणी फुकट जाताना दिसते. आणि ते तसेही बर्‍यापैकी स्वच्छ दिसते. तिथेही असे काहितरी व्हायला पाहिजे.

राजस्थानात तर जून्या घरात अशी सोय असतेच. साठवलेल्या पाण्याला हर हवा आणि प्रकाश लागू दिला नाही, तर ते अजिबात खराब होत नाही.

मामे.. या प्रकल्पाबद्दल इथे शेअर केल्याबद्दल धन्स.. बरं वाटलं वाचून..

भिंतीवर क्रीपर्स खूप सुंदर दिस्तात.. एक (कु)शंका.. त्यामुळे पावसाळ्यात घरात किडे शिरण्याची काही संभावना???

झाडाचा बुंधा कोरून त्याचं रूप बदलणं शोभेच्या(आपली निग प्रेमी शोभा नाही हं Wink ) दृष्टीनं ठीक असेल्..पण..

हे झाड तर मुळापासून ते वरपर्यंत पोकळ आहे.. त्यावर एक पाटीही लावलेली आहे ,'आत या आणी पोकळ झाडात उभे राहून फोटो घ्या' ..

हे ते झाड बाहेरून..

त्याचं खोड विभागलेलं आहे. खोडापासून ते वर उंचच्याउंच संपूर्ण पोकळ असलेल्या झाडात शिरून हा फोटो काढला..

सुप्रभात.
अढूळशाचे फुल

मामी अग तू इथे माहीती टाकलीस म्हणून लिहीले हो तसे. जर तू राबवला असतास तर मी एक बालदी घेऊन त्या प्रकल्पात ओतायला आले असते धावत Lol

वर्षूताई, आशुतोष छान फोटो. ते कोरलेल झाड भारीच आहे.

वर्षू, आधी मला वाटले की तू वर झाडावर चढून बुंध्याच्या आतला (वरून खाली) फोटो घेतलास की काय! Lol

मी टाकलेल्या फुलाचा फोटो: मला नक्की माहीत नाही पण साधनाने सांगितल्यावर गूगल केल्यावर वाटले की तो कैलाशपती असावा.

अगं आधी बुंध्याचा फोटो बघितल्यावर त्यात आत जाता येत असेल वाटले नाही. Happy

बायदीवे, झाडावर चढणे हे एक कौशल्यच असते.

वर्षू, आधी मला वाटले की तू वर झाडावर चढून बुंध्याच्या आतला (वरून खाली) फोटो घेतलास की काय! >>>>> अग्दी अग्दी ....
ग्रँडमॉम्स गोईंग स्ट्राँग! Wink Happy

शोभा कविता मस्त! अगदी पाऊस आल्याचाच भास!
मामी रेनवॉटर हार्वेस्टिंगची माहिती छान. आमच्या घराला खूप मोठी गच्ची आहे. मलाही दरवर्षी जो काही तुटपुंजा पाऊस पडतो........त्याचा थेंब न थेंब कुठेतरी साठवून ठेवावासा वाटतो. तसं आम्ही अत्यंत जपूनच पाणी वापरतो. माझी सिटाऊट आणि गच्चीतली झाडं रोपं स्वयंपाकघरातल्या बेसिनातल्या पाण्यावरच फुलतात. अंगणात एक प्लॅस्तीकचे पिंप ठेवलंय. त्यात टाक्यांचं ओव्हरफ्लो झालेलं पाणी साठतं. ते पाणी अंगणातल्या झाडां वेलींना बादलीने घालते. अर्थातच नारळाला पाइपनेच द्यावे लागते.
गजानन कसलं फूल ते?
वर्षू वेण्णामाय मस्तच!
वर्षू, आधी मला वाटले की तू वर झाडावर चढून बुंध्याच्या आतला (वरून खाली) फोटो घेतलास की काय! >>>>> अग्दी अग्दी ....
ग्रँडमॉम्स गोईंग स्ट्राँग! >>>>>>>>>>> गजानन, शशांक +१००
बाकी वर्षू पोकळ झाडही मस्त!
ही आमची कृष्णामाय...........

मस्त फोटो आणि गप्पा Happy

वर्षू, आधी मला वाटले की तू वर झाडावर चढून बुंध्याच्या आतला (वरून खाली) फोटो घेतलास की काय!>>>>>मी अजुनही तसंच समजतोय. Proud Happy

शोभा कविता मस्त! अगदी पाऊस आल्याचाच भास!>>>>"तेजोमय नादब्रह्म" या अल्बममधील सुरेश वाडकरांनी गायलेलं गाणं. मस्त मस्त. Happy

शशांक्,जिप्स्या.. मी कस्ची चढतीये रे झाडांवर जाने कहाँ गये वो दिन... Uhoh
... Rofl

जो-एस लिंक जबरदस्त आहे.. कागदी महासत्तेसमोर चिनी घोडे! . वाचून अवाक व्हायला होतं...

शिट.. प्रतिसाद टायपला आणि अचानक गायबला Sad

आयवी किंवा इतर क्रिपरवर पाली वगैरे होतात, पण जर क्रिपर घराबाहेर असेल तर मग काय? जे आहे ते बाहेरच राहणार.

वर्षू, तुअ टाकलेल्या पोकळ बुंध्याच्या झाडाकडे चिन्यांनी काय लिहिले होते माहित नाही, पण अशी झाडे बुंधे पोखरुन बनवत नाही तर चार कोप-यात चार झाडे लावुन मग ती वाढतानाच त्यांना हव्या त्या आकारात वाढवुन बनवतात. तुझ्या फोटोत चार कोपरे आहेत, पण असे खुप आकार बनवतात, त्यासाठी नीट नियोजन करुन झाडे लावतात आणि ती वाढवतात.

बुंधा हा झाडाची मुळे आणि वरचा क्राऊन यामधला दुवा आहे. मुळांनी शोषलेले पाणी आणि इतर अन्न व वर पानांनी तयार केलेली उर्जा यांची देवाणघेवाण बुंध्याकरवी केली जाते. बुंध्याची साल बाहेरुन काढली किंवा बुंधा आतुन भरपुर पोखरला (बाहेरची सालच शिल्लक राहिल इतका) तर झाड मरेल.

वर्षू, तुझ्या दुस-या फोटोत मला वाटते दोन झाडे आहेत. एक मुळ झाड जे उजव्या बाजुला दिसते आणि एक वेलीटाईप किंवा फायकस जातीचे झाड ज्याच्यात पारंब्या येतात ते झाड. मुळ झाडावर दुस-याच्या पारंब्या चिकटल्यात. राणीबागेतही असे एक झाड आहे. नॅशनल पार्कातही मी पाहिलेले.

लेख वाचल्यावर कडूनिंबाबाबत तरी चिन्यांचे कौतुन वाटले. कडुनिंब आपला आहे हे खरेच पण आपण काय आणि कितपत उपयोग करतोय त्याचा? आपल्याला सगळॅ माहित असते, सगळे आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेले असते पण क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे हे मात्र आपल्याला माहित नसते. चिन्यांनी तर चिन्यांनी, कोणीतरी नैसर्गिक किटकनाशके वापरली तर पर्यावरणासाठी चांगलेच आहे.

आपण तोपर्यंत आपले आजीआजोबा कडुनिंब वापरुन घरातल्या माशा हाकलत होते याच्या गप्पा मारुया आणि आपल्या घरांमध्ये संध्याकाळी डास घालवण्यासाठी काला हिट वापरुया.

वर्षू, त्याचं खोड विभागलेलं आहे. खोडापासून ते वर उंचच्याउंच संपूर्ण पोकळ असलेल्या झाडात शिरून हा फोटो काढला.. >>>>>>>>>>काय मस्त वाटेल आत जाऊन बसायला. Proud
आशुतोष,>>>>>>>>>गुलाब खूप छान. Happy
जागू, मानुषी, मस्त फोटो.

(आपली निग प्रेमी शोभा नाही हं डोळा मारा ) >>>>>>>>>>ती मी नव्हेच. Lol

@गजानन | 16 May, 2013 - 20:47नवीन.
राग मानू नका पण कैलशपतीची संपूर्ण सुंदर रचना आपल्या प्रचित दिसत नाही.
तसा प्रचि काढून इथे टाकाल तर उत्तम!
मंद सुवास असलेलं , खोडातूनच ज्याच्या फुलांच्या फांदीचा उगम होतो असे फारच सुंदर फूल आहे ते.
त्याचे फळ तोफेच्या गोळ्यासरखे मोठे आणि गोल असते म्हणून या झाडाला कॅनन बॉल ट्री असेही म्हणतात. जमल्यास फळाचाही फोटो द्या.हे फळ खाली पडून फुटल्यावर मात्र दुर्गंधी येते.

साधना... ओह थांकु
त्या पहिल्या प्रचितील डिझाईनर झाडाचं चं रहस्य आत्ता समजलं.. खरच कि चार सेपरेट झाडं दिसू लागलीयेत तू सांगितल्यानंतर..

चार नाहीयेत, १२ आहेत ती झाडे. Happy

अतिशय चिकाटीने ही झाडे वाढवणा-यांना सलाम.

मी जिथे कुठे हे फोटो पाहिलेत तिथे बहुतेक सगळीकडे फायकस वापरलेली पाहिली या कामासाठी. बहुतेक फायकसला वळवणे सोप्पे असावे.

Pages