Submitted by मुग्धमानसी on 15 May, 2013 - 07:19
’आताच दमू नकोस फार
जायचं आहे लांब’ म्हण
एकदा तरी हात धरून
मला ’थोडं थांब’ म्हण...
माझं गुर्हाळ तक्रारिंचं
कुरकुर करु लागलं की
जवळ बसवून मला फक्त
’ऐकतो मी तू सांग’ म्हण...
कधी चिडेन जगावरती
कावून जाईन, त्रासून जाईन
हसून माझी धग सोसून
’जगाच्या नानाची टांग’ म्हण...
कधी माझ्या डोळ्यांमधून
निसटून जाईल काहितरी
तेही पकडून शिताफीनं
’याचा पत्ता सांग’ म्हण...
मी हसताना उधाणलेले
मी रडताना गहिवरलेले
अश्रू माझे टिपून ठेव अन्
’जपून ठेवलंय वाण’ म्हण...
मोठेपण सोसणार नाही
पायांत त्राण उरणार नाही
तेंव्हा कुशीत घेऊन मला
’बाळ माझी छान’ म्हण...
फार काही मागत नाही
माझी तहान भागत नाही
हरलेच कधी मी तर हसून
’मी आहे ना सांग?’ म्हण...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एवढे उत्स्फूर्त प्रतिसाद...
एवढे उत्स्फूर्त प्रतिसाद... माझ्या या साध्याच बाळबोध कवितेला... भरून आलं मला! धन्यवाद तरी किती देऊ समजत नाहिये. शब्दच नाहियेत.
मी इतकं छान लिहीते हे आजवर कुणीच मला असं कळू दिलं नव्हतं. मला माझी नव्याने ओळख करून दिल्याबद्दल लक्षावधी धन्यवाद मायबोली!!!!
अजून एक सुंदर कविता !! वा
अजून एक सुंदर कविता !!
वा वा
_______________________________
एवढे उत्स्फूर्त प्रतिसाद... माझ्या या साध्याच बाळबोध कवितेला.<<<<<<
खरय !! तुकोबाराय म्हणालेच होते ....कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे
आवडेश
आवडेश
खुप सुंदर. वाचता वाचता केव्हा
खुप सुंदर. वाचता वाचता केव्हा डोळ्यात पाणी आल, कळलच नाही.
अप्रतिम कविता. दिर्घ काळ
अप्रतिम कविता.
दिर्घ काळ स्मरणात राहिल अशी कविता.
धन्यवाद!
धन्यवाद!
सगळ्यांनी इतकं भरभरुन लिहीलं
सगळ्यांनी इतकं भरभरुन लिहीलं आहे कि मी आणखी वेगळं काय लिहू!
संपूर्ण कवीता कोट करावी लागेल...
छान ... खुपच छान!
'कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे' + १००!
सहज आणि छान कविता.
सहज आणि छान कविता.
हम्म मस्तच !
हम्म मस्तच !
धन्यवाद!
धन्यवाद!
छान, आवडली !
छान, आवडली !
व्वा! सहज सुंदर!!
व्वा! सहज सुंदर!!
धन्यवाद!
धन्यवाद!
सहज, साधी, खूप आतून आलेली गोड
सहज, साधी, खूप आतून आलेली गोड कविता
लाजवाब! प्रचंड आवडली कविता!!
लाजवाब!
प्रचंड आवडली कविता!!
वा ! क्या बात है |
वा ! क्या बात है |
मानसी तू मनातलं लिहितेस
मानसी तू मनातलं लिहितेस
सहज, सोपी .... सरळ ह्रदयातून
सहज, सोपी .... सरळ ह्रदयातून आलेली .... खूप आवडली
कित्ती छान आहे ही कविता. खूप
कित्ती छान आहे ही कविता. खूप दिवसांनी इतकी गोड कविता वाचायला मिळाली.
सुंदर कविता ! आवडली !
सुंदर कविता ! आवडली !
अत्यंत निखळ सुंदर कविता..
अत्यंत निखळ सुंदर कविता..
basss ....max aavadliye...mi
basss ....max aavadliye...mi hi kavita kitihi vela vachu shakto...arthat thodya divsat pathch hoil mhana
खुप खुप धन्यवाद!
खुप खुप धन्यवाद!
चेतन सेम हिअर मी थोपुवर पण
चेतन सेम हिअर
मी थोपुवर पण शेअरली
आवडेश
आवडेश
धन्यवाद!
धन्यवाद!
अप्रतीम!!!! कित्ती साधी सोपी,
अप्रतीम!!!! कित्ती साधी सोपी, तरीही सहज-सुंदर!!!! सगळीच कडवी थेट भिडली आतपर्यंत!!!
'धन्यवाद' तर आम्ही तुला म्हणायचं मुग्धमानसी!!!!
मस्त. आवडली कविता.
मस्त. आवडली कविता.
खूपच सुंदर...!!
खूपच सुंदर...!!
पुन्हा एकदा... किती सहज किती
पुन्हा एकदा... किती सहज किती सुंदर.
मुग्धमानसी, तुझं वाचलं की अजून काही वाचायचं नाही असं काय म्हणून करून ठेवतेस बाई?.. आज पुन्हा एकदा... हे असच.
(खूप आतलं, तरल तरीही सहज शब्दांत किती अचुक पकडतेस... माझ्या... आमच्या स्वार्थासाठी हे कध्धी कध्धी बदलू दे नको, देवा)
Pages