फोटोग्राफी स्पर्धा.. एप्रिल.."चाहुल उन्हाळ्याची" ..निकाल

Submitted by उदयन.. on 1 April, 2013 - 06:29

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे "एप्रिल" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या महिन्याचा विषय आहे " चाहुल उन्हाळ्याची "

या वर्षीचा उन्हाळा जरा जास्तच कडक आहे.. त्यात भर दुष्काळाची..:( .. उन्हाळ्याची चाहुल लागल्यावर निसर्गात बरेच बदल होत असतात.. माणसांच्या कार्यांमधे ही बदल होतात ...या वरच या महिन्याची थीम आधारीत आहे..

जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

निकाल :-
प्रथम क्रमांक : Dev_ - कैरी
हिरव्यागार आंबट-गोड कैर्‍या खरच उन्हाळा जवळ आल्याची चाहुल देतात. टेक्निकली करेक्ट फोटो.

dev 1st.jpgद्वितीय क्रमांक :- विभागुन
१. प्रसन्न अ - ग्रीष्माची चाहूल (थीमसाठी परफेक्ट फोटो)

prasanna 2nd.jpg२.गिरिश सावंत - ऊन ऊन (विषयाशी संबंधित पण थोडासा हटके असा फोटो. उन्हाच्या झळा फोटोतुनही जाणवत आहे. Happy

girish 2nd.jpgतृतिय क्रमांक :- विभागुन

१. रोहित ..एक मावळा - पाण्यासाठी वणवण (कंपोझिशन आवडले)

rohit 3rd.jpg२. ferfatka - लगबग वाळवणाची

ferfataka 3rd.jpg

विशेष उल्लेखनिय: जागु - रानमेवा

jaagu.JPG

नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :

१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी

२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

३) फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च..""भावमुद्रा"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो एक जज गेला साउथ आफ्रिकेला
दुसरा जज कामात गुंतला आहे
.
आपापली कामे सांभाळुन जजेस आपल्यासाठी वेळ देत आहेत....थोडा वेळ लागणारच.....त्यात मायबोलीकरांनी अतिशय उत्तम प्रकाशचित्रे दिलेली आहे...निवडायला वेळ तर लागतोच
काही दिवसातच निकाल लागेल

>>> काही दिवसातच निकाल लागेल <<<<
हो का? ठीके मग, काय करणार! वाट पहातो.
पण मग असे करायचे का? आपल्याला जे प्रथम द्वितीय तृतिय क्रमांक येतिल असे वाटते, त्याचे अंदाज बान्धायचे का? ज्याचा अंदाज अधिकाधिक अचूक येईल, त्यालाही आपण एखादे बक्षिस देऊ! तेवढाच टाईमपास होईल :P, अन जजेसनाही थोडे मार्गदर्शन होईल Wink

लिंबुजी,
वेळ असेल तर ज्योतिषाचा बाफ वर पत्रिकांना उत्तर द्या ना!! तेवढाच वेळ सत्कारणी लागेल.

?

शापित गंधर्व आणि जिप्सी यांचे मनोगत :-

मंडळी, काहि अपरिहार्य कारणांमुळे मार्च आणि एप्रिल महिन्याचे निकाल थोडे उशिरा लागले त्या बद्दल दोन्ही ज्युरी, जिप्सि आणि शापित गंधर्व यांनी सगळ्या स्पर्धकांची माफी मागितली आहे. भविष्यात (शक्यतो) अशी चुक होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही पण त्यांनी दिली आहे.

विषेश आभारः
limbutimbu यांचे विषेश आभार. ज्या हिरिरीने ते या स्पर्धेत भाग घेत आहेत ते खरोखर वाखणण्याजोगे आहे. त्यांच्या मुळे या धाग्याची रंगत आणि लज्जत द्विगुणित होते आहे. लिंबु काकांचे खरोखर मनापासुन आभार.

सर्व विजेत्यान्चे अभिनन्दन!
मायबोलीवर काय होऊ शकत नाही? एकसे एक फोटु येताहेत, तर सर्व सहभागी माबोकर छायाचित्रकारान्नाही धन्यवाद, निरनिराळे फोटो पहाण्याचि संधी दिल्याबद्दल Happy
उदयन, विशेष आभाराबद्दल धन्यावाद, पण आभार कशाबद्दल मानायचे? उलट मीच आभार मानतो, अशी निकोप भन्नाट स्पर्धा योजल्याबद्दल.
तुला माहिते? लहानपणी आम्ही चांदोबा वाचित असू. त्यात शेवटच्या पानावर जोडनावे सूचवा म्हणून दोन वेगवेगळे फोटो दिलेले असायचे, दोन्ही फोटोतील समान धागा पकडून दोनोळी/चारोळी द्यायची असायची. आम्ही ती दोनोळी/चारोळी देणे तेव्हा शक्यच नव्हते, पण मे महिन्याच्या सुट्टीत कोकणात आजोळी गेल्यावर लायब्ररीतून आणलेल्या चांदोबांची चळत अधाशासारखी सलग वाचून काढीत असताना ते जोडनावाचे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो चान्गलेच लक्षात राहिलेत. एकसे एक फोटो असायचे. त्यानन्तर इतक्या वर्षान्नी तसे फोटो हे इथेच मायबोलीवर बघतोय Happy ते देखिल माबोकरान्नी काढलेले!

सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन. > +१

पैल्या क्रमांकाच्या प्रचिची केवळ लिंक दिसावी अशी व्यवस्था करावी.. :p

Pages