Submitted by रसप on 9 May, 2013 - 08:42
ती हसली..
मीही हसलो..
ती हसली म्हणून नाही,
दुसरं काही सुचलंच नाही, म्हणून..
काय करणार ?
माझ्या हातात होती 'बालवाडी'च्या फीची पावती
"रुपये तीस हजार फक्त!"
आणि तिच्या डोळ्यांत होती भूक
अन् रेखाटलेलं रक्त..
"तुम्ही तिला पन्नास रुपये का दिले?"
"ती त्याचं काय करणार?"
"'क्रेयॉन्स' घेणार की 'चॉकलेट' खाणार?"
..... हे प्रश्न मला ऐकूच येत नव्हते..
आणि मला पडलेले प्रश्न
मलाच समजत नव्हते..
घरी जाता जाता सिगरेटचं पाकिट घेण्याचं
आज पहिल्यांदाच विसरलो..
....रसप....
९ मे २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/05/blog-post_9.html
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मांडणी अतीशय परीणामकारक
मांडणी अतीशय परीणामकारक !
आवडली कविता
'ती' कोण असावी यावर विचार करतोय
अस्वस्थ व्हायला होतय
जबरदस्त.....
जबरदस्त.....
कविता आवडली. ती हसली म्हणून
कविता आवडली.
ती हसली म्हणून नाही,
दुसरं काही सुचलंच नाही, म्हणून..
अगदी नेमकं... उत्तम!
व्वाह!!
व्वाह!!
आवडले, कविता मुद्दाम म्हणत
आवडले, कविता मुद्दाम म्हणत नाही आहे, एक प्रकारचे उत्स्फुर्त वादळी भावनिक चिंतन की असेच काहीतरी वाटले.
मस्तच!
मस्तच!
एक प्रकारचे उत्स्फुर्त वादळी
एक प्रकारचे उत्स्फुर्त वादळी भावनिक चिंतन की असेच काहीतरी वाटले.>> व्वाह !! थँक्स !!
सगळ्यांचेच धन्यवाद !
व्वाह! आवडेश
व्वाह! आवडेश
कविता फार आवडली.
कविता फार आवडली.
व्वा!
व्वा!
वाह !!!
वाह !!!
अस्वस्थ करून गेली कविता.
अस्वस्थ करून गेली कविता.
कविता(?) हसली मीही
कविता(?) हसली
मीही हसले
कां?कां?
समजले? उमजले.......
विजयाजी, प्रतिक्रिया समजली
विजयाजी,
प्रतिक्रिया समजली नाही.
आवडली.
आवडली.
कविता -- प्रश्न चिन्ह
कविता -- प्रश्न चिन्ह एवढ्यासाठी ...ही केवळ कविता कि आणिक बरेच काही...
तीहसली ... मीही हसले ... म्हणजे ती आवडली
पण हे आपणास नाही ना समजले
मला उमजले. असो ,
प्रतिसाद माझ्या कवितांवर ही दिलात तर फारच आवडेल
अजूनही समजले नाही की आपणांस
अजूनही समजले नाही की आपणांस कविता आवडली/ पटली की नाही.
पण असो.
आवडली असणार रे !! ती बाई
आवडली असणार रे !!
ती बाई कितक्या मनापासून लडिवाळ्पणे बोलते आहे बघतरी ..... तुझ्या कवितेशी.
नक्कीच आवडली म्हणूनच असे करत असणार ना !!!
' पावती ' साठी ही पावती
' पावती ' साठी ही पावती बरं का....
म्हणजे आवडली...
मस्त
मस्त
बाप्रे! छान कस म्हणावं रे
बाप्रे!
छान कस म्हणावं रे हिला? पण कित्ती कित्ती म्हणून "खरी" लिहिलियेस!