धागा

Submitted by कोकण्या on 8 May, 2013 - 08:32

गझले वरच्या गझला वाचुन आणि त्यातिल प्रतिसाद पाहुन एक फुटकळ काव्य सुचले ते इथे टाकत आहे. त्यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी हे डीलिट करुन टाकेन.

(आणि इथे ते सुट होत नसेल तर इतरत्र हलविन्यात येयिल)

एक टाइम पास प्रयत्न

कोणाचा हा धागा
कोणाचा हा त्रागा
कोण भरे रागा
कळेनाचि!!

गझलेच्या बागा
करुनिया रोगा
करमे ती भोगा
फळेनाचि!!!

सरांचा तो सोगा
देउनिया दगा
ओढण्याचा त्रागा
संपेनाचि!!

कोण म्हने उगा
फोडतो हा फुगा
कवटाळी खगा
रुचेनाचि!!

कोन इथे सगा
पांघरुनी झगा
देयीलही दगा
मीळेनाचि!!

(त्.टी-कोकण्या हा डु. आयडी नाही आहे.. तो इथे मागिल ७ वर्षा पासुन कार्यरत आहे.. आणि माय बोलिवर त्याला बरेच जन भेटलेले आहेत.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users