भारतीय मातीची गझल - दुष्यंतकुमार त्यागी

Submitted by विजय दिनकर पाटील on 7 May, 2013 - 06:23

दुष्यंतकुमार त्यागी(१९३३-१९७५)

अवघे ४२ वर्षांचे आयुष्य लाभलेला हा प्रतिभावान कवी जेव्हां इहलोक सोडून गेला तेव्हां मी कदाचित काही महिन्यांचा बाळ असेन. आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर स्वतःला अत्यंत जवळची वाटू शकेल अशी दुष्यंतकुमारांची गझलही कधीतरी माझ्या आयुष्यात येईल ह्याचा विचार अगदी काल परवापर्यंत माझ्या मनाला शिवलेलासुद्धा नव्हता.

गेल्या वर्षी मुंबईला चक्कर झाली होती तेव्हां मनिष मोदींच्या हिंदी ग्रंथ कार्यालयामधून मीर, गालिब, फिराक, मुनव्वर अशा कवींच्या पुस्तकांबरोबर मी दुष्यंतकुमारांचा एकमेव गझलसंग्रह 'साये मे धूप' मोठ्या उत्सुकतेने घेऊन आलो होतो आणि गेले वर्षभर मीर, गालिब आणि फिराकच्या संगतीत त्यांच्या जवळही फिरकलेलो नव्हतो. ही खरे तर चूकच केली होती म्हणायची कारण इतके चांगले काव्य पदरी पुस्तक असताना इतक्या उशीरा अनुभवायचे म्हणजे काय?

तर दुष्यंतकुमारांची गझल कशी आहे ह्यावर विशेष विस्ताराने जमेल तेव्हा नक्की लिहीन. सद्या त्यांच्या गझलेला 'डाऊन टू अर्थ' हे एकमेव विशेषण मला सुचत आहे. प्रस्तुत लेखाचे खरे प्रयोजन दुष्यंतकुमारांची गझल उलगडण्याचे नसून, गझलेविषयी त्यांची किती साधी भूमिका होती हे मांडण्याचा प्रयत्न आहे. ही भूमिका त्यांनी साये मे धूप च्या सुरूवातीला दिलेली आहे. ही भूमिका वाचल्यावर खूप खूप विचार केला आणि लक्षात आले की आज गझलेविषयी ह्यंव त्यंव भूमिका घेणारे 'आम्ही' किती अनभिज्ञ आहोत खर्‍या कवितेपासून!

तर त्यांची ही भूमिका मी त्यांच्याच शब्दांत देत आहे (प्रताधिकाराचा मुद्दा उपस्थित होत असल्यास इथे मराठी अनुवाद टाकून देईन)

मैं स्वीकार करता हूँ…

—कि ग़ज़लों को भूमिका की ज़रूरत नहीं होनी चाहिए लेकिन एक कैफ़ियत इनकी भाषा के बारे में ज़रूरी है. कुछ उर्दू—दाँ दोस्तों ने कुछ उर्दू शब्दों के प्रयोग पर एतराज़ किया है .उनका कहना है कि शब्द ‘शहर’ नहीं ‘शह्र’ होता है ’वज़न’ नहीं ‘वज़्न’ होता है.

—कि मैं उर्दू नहीं जानता लेकिन इन शब्दों का प्रयोग यहाँ अज्ञानतावश नहीं जान बूझकर किया गया है. यह कोई मुश्किल काम नहीं था कि ’शहर’ की जगह ‘नगर’ लिखकर इस दोष से मुक्ति पा लूँ किंतु मैंने उर्दू शब्दों को उस रूप में इस्तेमाल किया है जिस रूप में वे हिन्दी में घुल—मिल गये हैं. उर्दू का ‘शह्र’ हिन्दी में ‘शहर’ लिखा और बोला जाता हैठीक उसी तरह जैसे हिन्दी का ‘ब्राह्मण’ उर्दू में ‘बिरहमन’ हो गया है और ‘ॠतु’ ‘रुत’ हो गई है.

—कि उर्दू और हिन्दी अपने—अपने सिंहासन से उतरकर जब आम आदमी के बीच आती हैं तो उनमें फ़र्क़ कर पाना बड़ा मुश्किल होता है. मेरी नीयत और कोशिश यही रही है कि इन दोनों भाषाओं को ज़्यादा से ज़्यादा क़रीब ला सकूँ. इसलिए ये ग़ज़लें उस भाषा में लिखी गई हैं जिसे मैं बोलता हूँ.

—कि ग़ज़ल की विधा बहुत पुरानी किंतु विधा है जिसमें बड़े—बड़े उर्दू महारथियों ने काव्य—रचना की है. हिन्दी में भी महाकवि निराला से लेकर आज के गीतकारों और नये कवियों तक अनेक कवियों ने इस विधा को आज़माया है. परंतु अपनी सामर्थ्य और सीमाओं को जानने के बावजूद इस विधा में उतरते हुए मुझे संकोच तो है पर उतना नहीं जितना होना चाहिए था. शायद इसका कारण यह है कि पत्र—पत्रिकाओं में इस संग्रह की कुछ ग़ज़लें पढ़कर और सुनकर विभिन्न वादों रुचियों और वर्गों की सृजनशील प्रतिभाओं ने अपने पत्रों मंतव्यों एवं टिप्पणियों से मुझे एक सुखद आत्म—विश्वास दिया है. इस नाते मैं उन सबका अत्यंत आभारी हूँ.

…और कम्लेश्वर! वह इस अफ़साने में न होता तो यह सिलसिला यहाँ तक न आ पाता. मैं तो—

हाथों में अंगारों को लिए सोच रहा था

कोई मुझे अंगारों की तासीर बताए.

—दुष्यन्त कुमार

हे वाचल्यानंतरच लक्षात आले की केवळ काही पानांचा असलेला हा संग्रह वाचताना खूप डचमळायला होणार आहे कारण ही गझल एका मातीच्या माणसाने लिहीलेली आहे. ह्यात कुठलाही अविर्भाव नसणार आहे. आणि विश्वास ठेवा, अगदी तसेच झाले माझे!

ओळीओळीत दुष्यंतकुमारांची गझल आपल्याला विचार करायला भाग पाडते. जे म्हणायचे आहे ते इतक्या सोप्या शब्दांत तरीही प्रतिमांची पखरण करीत म्हटले गेलेले आहे की बहुपदरीपण शेराशेरात ओतप्रोत आपोआपच भरले गेलेले आहे. दुष्यंतकुमारांची गझल केवळ अनुभवायचीच गोष्ट आहे हे मात्र खरे!

काही शेर सर्वांच्या आस्वादाकरीता देत आहे,

एक चिनगारी कहीं से ढूंढ लाओ दोस्तो
इस दिये मे तेल से भीगी हुई बाती तो है

----------

दुख नही कोई की अब उपलब्धियों के नाम पर
और कुछ हो या न हो आकाश-सी छाती तो है

----------

ये सारा जिस्म झुककर बोझ से दुहरा हुआ होगा
मै सजदे में नही था आपको धोखा हुआ होगा

----------

कई फाके बिताकर मर गया जो उसके बारे मे
वो सब कहते है अब ऐसा नही ऐसा हुआ होगा

----------

यहां तो सिर्फ गूंगे और बेहरे लोग बसते है
खुदा जाने यहां पर किस तरह जलसा हुआ होगा

-----------

कुछ दोस्तों से वैसे मरासिम नहीं रहे
कुछ दुशमनों से वैसी अदावत नहीं रही

------------

यहाँ दरख़तों के साये में धूप लगती है
चलो यहाँ से चलें और उम्र भर के लिए

------------

वे कह रहे है गजलगो नही रहे शायर
मै सुन रहा हरेक सिम्त से गजल लोगो

------------

कैसे आकाश में सूराख़ हो नहीं सकता
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो

------------

बाढ़ की संभावनाएँ सामने हैं
और नदियों के किनारे घर बने हैं

-------------

फिर मेरा जिक्र आ गया होगा
वो बरफ सी पिघल रही होगी

-------------

जाने किस—किसका ख़्याल आया है
इस समंदर में उबाल आया है

------------

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विदिपा, अगदी साध्या क्षणात सामावलेले आशय ताकदीने व्यक्त करणार्‍या या गझलकाराचा तुम्ही सुंदर परिचय करून दिला आहे..लेखाचा आकार अधिक वाढावा अशी अपेक्षा.

कई फाके बिताकर मर गया जो उसके बारे मे
वो सब कहते है अब ऐसा नाही ऐसा हुआ होगा

कुछ दोस्तों से वैसे मरासिम नहीं रहे
कुछ दुशमनों से वैसी अदावत नहीं रही

वे कह रहे है गजलगो नही रहे शायर
मै सुन रहा हरेक सिम्त से गजल लोगो<<<

दर्दी शायराचे सखोल शेर! लेख आवडला. माझी मते:

१. भूमिका म्हणून जे पॅरा घेतलेले आहेत ते सिलेक्टेड घेतलेले दिसत आहेत. त्यातून भूमिका म्हणावे इतपत काही झिरपवून घेता आले नाही मला! मात्र जे म्हंटले गेले आहे ते समजले व पटलेही. त्याला दुष्यंतकुमारांची गझलेबाबतची व्यापक भूमिका म्हणता येईल की नाही याबद्दल मात्र मी साशंकच राहिलो.

२. गझलीयत म्हणजे नक्की काय हो या आपल्या लेखाचे उत्तर या शेरांमध्ये मिळत आहे असे मला वाटते. (तसेच ते अनेक उर्दू व मराठी शायरांच्या शेरांमध्येही मिळतेच, पण शेरांची उदाहरणे न देता त्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा एक प्रयत्न सर्वांनी मिळून केला होता म्हणून तिथे आपण कोणी तशी मते व उदाहरणे नोंदवलेली नव्हती.)

३. लेखाचे शीर्षक नेमके वाटले नाही. भटांच्या गझलेला जसे खणखणीतपणे मराठी मातीची गझल म्हणता येते तशी ही भारतीय मातीची गझल असे म्हणता येईल का असे मनात आले. गंमत म्हणजे मीर, गालिब, फिराक आणि अनेकांची गझल भारतीय मातीत, तत्कालीन भारतातील घडामोडींना साक्षी ठेवूनच रचली जात होती व रचली गेली. गालिबने फार्सीप्रचूर भाषेचा मुक्त वापर केला व फार्सी संस्कृतीतील प्रतिमांची मुक्त उधळणही केली. पण इतर अनेक मातब्बरांनी तितके क्लिष्ट न लिहिताही उत्तम गझल रचली. भारतीय मातीची गझल ही संज्ञा मला त्यामुळेच थोडीशी गोंधळात पाडते, पाडत आहे. तसेच, ती संज्ञाच गोंधळात पाडत असल्याने दुष्यंतकुमारांची गझल त्या संज्ञेच्या व्याप्तीत अचूकपणे बसते का हे समजण्याची कुवत त्यामुळे माझ्यात नाही.

४. उर्दू व हिंदीचा संगम याबाबतची भूमिका भावली.

या लेखावर माझ्यामते तुम्ही स्वाती आंबोळे, समीर चव्हाण, अनंत ढवळे, ज्ञानेश पाटील व पुलस्ती यांचीही मते मागवावीत असे मला वाटते. (गझलकार म्हणून) (त्यांना खास विपू करून)

याशिवाय, भारती यांनी लिहिलेले आहेच.

धन्यवाद या लेखाबद्दल.

-'बेफिकीर'!

धन्यवाद मंडळी.

भूमिका म्हणून जे पॅरा घेतलेले आहेत ते सिलेक्टेड घेतलेले दिसत आहेत.>>> हे आणि इतकेच त्यांनी लिहीलेले आहे पुस्तकात!

चांगला लेख.
या निमित्ताने दुष्यंतकुमार त्यागींच्या गझलांचा परिचय होऊ शकेल.

सर्वांच्या आस्वादाकरीता दिलेल्या शेरापैकी

जाने किस—किसका ख़्याल आया है
इस समंदर में उबाल आया है

हा खूप खूप आवडल्ला. प्रभावी वाटला.

बाकी शेरांच्या आशयाशी जुळते-मिळते आशय नेहमीचेच वाटल्याने आज मला नाविन्यपूर्ण वाटले नाही. हे शेर रचल्याला ६०-७० वर्ष उलटली आहेत. त्या काळात ते नक्कीच नाविन्यपूर्ण असतील. यात शंका नाही.
****
बाढ़ की संभावनाएँ सामने हैं
और नदियों के किनारे घर बने हैं

या शेरावरून मला माझा एक शेर आठवला.

कशी झोपडी हीच अंधारलेली
कुण्या उंदराने दिवावात नेली

माझा हा शेर अनेक गझल दिग्गजांना "शेर" वाटला नव्हता.
*****
आज यह दीवार परदों की तरह हिलने लगी
शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए

सिर्फ़ हंगामा खड़ा करना मेरा मक़सद नहीं
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए

मला हे शेर खूप आवडतात.

>>
हाथों में अंगारों को लिए सोच रहा था
कोई मुझे अंगारों की तासीर बताए
<<

एरवी दुष्यंतकुमार इज नॉट माय कप ऑफ टी, पण हा शेर आवडला.
धन्यवाद विदिपा. Happy

आज गझल क्षेत्रातले अजून एक मोठे नाव माहीत झाले याचा मला आनंद झाला
बाकी थोरामोठ्यांच्या गंभीर गझलचर्चांमध्ये आता पडण्याचे माझे साहित्यिक वय नाही म्हणून ................. Happy

दुष्यंतकुमार यांच्या गझलांचा मराठी लोकांना परिचय म्हणून ह्या लेखाकडे पाहिले जाईल अशी आशा आहे.
त्यांच्या वैचारिक बंडखोरीमुळे बहुधा त्यांची गझल उर्दूचे पारंपारिक वळण सोडूनही आपले अस्तित्व टिकवून आहे.
अनेक वर्षे टीका होऊनही त्यांच्या नंतरच्या पिढीने त्यांना स्वीकारले हे लक्षात घ्यायला हवे.
उर्दूच्या रिवायती शायरीत हरवलेल्या शायरांची मोजदाद नाही हे कटू सत्य आहे.

धन्यवाद.

जे स्थान मराठी गझलेत सुरेश भटांचं आहे तेच स्थान् हिंदीमधे दुष्यंत कुमारांचं आहे. निव्वळ एका गझल संग्रहामुळे हा अवलिया हिंदी गझल क्षेत्रात अग्रणी आहे.

 कुमार.jpgDushyant_Kumar_Painting.JPG

''साये में धूप'' या गझल संग्रहाखेरिज त्यांचे ,''सूर्य का स्वागत''; ''आवाज़ों के घेरे''; ''जलते हुए वन का वसन्त'' हे कवितासंग्रहसुद्धा प्रसिद्ध आहेत.

''एक कण्ठ विषपायी'' ही काव्य नाट्यिका सुद्धा प्रसिद्ध आहे.

त्यांचा सुप्रसिद्ध ''साये में धूप'' हा गझलसंग्रह खालील लिंकवर विनामूल्य वाचनास उपलब्ध आहे.

Saaye_me_dhoop.jpghttp://www.kavitakosh.org/kk/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4...

विदिपा,

'साये मे धूप' 'कविताकोशा' वर चाळतो आहे. काही काही शेर पार घर करतात.

क्या वज़ह है प्यास ज्यादा तेज़ लगती है यहाँ
लोग कहते हैं कि पहले इस जगह पर था कुँआ ।

वा वा... तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत!

मीही वाचतो आहे काल पासून थोड्थोडे शेर
कुँआ चा शेर मलाही फार आवडला

सायेमे धूप .... हा 'टायटल' वाला शेर ही मस्तय ....

मला तर "साये मे धूप" संग्रह उत्तमोत्तम शेरांची अख्खीच्याअख्खी खाणच वाटू लागलाय !!