एकाच भावार्थावर/भावभूमीवर/प्रतिमेवर आधारीत दोन-दोन/तीन शायरांचे शेर......

Submitted by कर्दनकाळ on 7 May, 2013 - 16:12

एकाच भावार्थावर/भावभूमीवर/प्रतिमेवर आधारीत दोन-दोन/तीन शायरांचे शेर......

यहॉ दरख्तोंके सायेमें धूप लगती है
चलो यहॉसे चले और उम्र-भरके लिए
..........दुष्यंत कुमार
तमाम उंचे दरख्तोंसे बचके चला हूं
मुझे खबर है कि साया किसीके पास नही
..........मुमताज शकेब
झाडे चहूकडे पण, छाया कुठेच नाही!
गर्दीत माणसांच्या माया कुठेच नाही!!
..........कर्दनकाळ

.........................................................................

वो शख्स जिसको खिजॉ ले गई बहारोंसे
कभी चमनमें शिगुफ्ता गुलाब जैसे था
...........नसीम महमूदी
सदियोंमें फैलनेकी तमन्ना लिए हुए
क्या शख्स था जो खो गया लम्होंकी भीडमें
.........इर्फान दानिश
नकोस माझी पुसू खुशाली कळीकळीला......
विचार माझा ठावठिकाणा पानगळीला!
............कर्दनकाळ

........................................................................
3
मै उन गहराइयोमें हूं जहॉ अब
समुंदर भी किनारा हो गया है
............कालिदास गुप्ता रजा
हमारी तश्नगीसे लडते लडते
समुंदर बूंद भर का रह गया है
...........तसव्वुर हुसेन जैदी
....................................................................

गोदमें कलतक परिन्दोंको लिए फिरती रही
वो हवा सआन इनके आशियाने ले गई
..........हसन अकबर कमाल
यही हवा मेरे सीनेसे लगके रोती है
इसीका हाथ दीये भी मेरे बुझाता है
.........असद बदायूनी
.........................................................................

हर एहतियात करके भी जख्मी है उंगलियॉं
फूलोंकी आरजूका नतीजा बुरा हुआ
..............बिस्मिल्लाह अदीम
जख्मी हर एक शाखपे कर ली उंगलियॉं
दो फूल भी न तोड सके हम बचाके हाथ
............अली अहमद जलीली
.........................................................................

अच्छा हुआ कि आईना हाथोंसे गिर गया
मुझको तो अपनी शक्लपे धोका खुदाका था
.............अंजुम मजहरी
छुपाके रख दिया इस आगाहीके शीशेको
इस आईनेमें तो चेहरे बिगडसे जाते है
.........................किश्वर नाहीद
........................................................................

दी है दस्तक तो कोई सुबहके सूरजसे कहे
जो न सोया है उसे आके जगाता क्या है
...............कमर इकबाल
‘अजहर’ यहॉ है अब मेरे घरका अकेलापन
सूरज अगर न हो तो जगाता नहीं कोई
...............अजहर इनायती
.........................................................................

आ मेरी तरह कभी समुंदरमें उतर
यूं किनारोंसे न मालूम ये गहराई कर
..............मुहासिन एहसान
मुझको पाना है तो फिर मुझमें उतरकर देखो
यूं किनारोंसे समुंदर नहीं देखा जाता
..............रजी अख्तर शौक
समुद्री दोन डोळ्यांच्या किती भंडावती लाटा....
किनारी थांबणा-याला कधी उमगायचे नाही!
..............कर्दनकाळ

.........................................................................

जिन्दगी हमसे तेरे नाज उठाये न गये
सॉंस लेनेकी फकत रस्म अदा करते थे
.............शाज तमकनत
जिन्दगी यूं मेरे हमराह रहां करती है
जैसे जीनेकी फकत रस्म अदा करती है
.............अली अहमद जलीली
हाय आले जीवनाचे भान मरताना!
श्वास घेण्याचेच केले काम जगताना!!
.................कर्दनकाळ

........................................................................
१०
सब एक नजर फेंकके बढ जाते है आगे
मैं वक्तके शो-केसमें चुपचाप खडा हूं
.......................नजीर बनारसी
जौहर-शनास कोई तो आयेगा इस तरफ
खुद को सजा के बैठ गया हूं दुकानमें
...................मसरूर लखनवी
जीवाश्म मी! जणू मी, तो काळ, लोटलेला!
क्षण एक एक माझ्या हृदयात गोठलेला!!
..................कर्दनकाळ

का मला पाहून सारे लोक परतू लागले हे?
ओसराया लागलेला मी नदीचा पूर नाही!

.................कर्दनकाळ
.........................................................................
टीप: हिंदी टायपिंग अजून जमत नसल्याने ब-याच ठिकाणी शुद्धलेखनाच्या चुका आहेत! क्षमस्व!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत चांगला उपक्रम धन्स

असो
उदाहरण पहिले , ५वे ,९ वे ,१० वे सोडल्यास एका शायराच्या अमुक शेरातून दुसर्‍या शायराचा तमुक शेर मिळताजुळता आहे हे फारसे किंवा चट्कन लक्षात येत नाही आहे
निदान मला तरी तसे साधर्म्य पटले नाही
काही जागी तुमचे शेर दिलेत ...त्याबद्दल मी काही बोलणार नाही आहे

पुनश्च :अत्यंत चांगला उपक्रम धन्स !!!!!!!!!

मला वाटते की, वरिल शेर तुलनात्मकरित्या एकाच प्रतिमेवर आधारीत आहेत, असे म्हणता येईल.
एकाच भावार्थावर/भावभूमीवर आधारीत आहेत, असे म्हणता येणार नाही.

उदा.

तमाम उंचे दरख्तोंसे बचके चला हूं
मुझे खबर है कि साया किसीके पास नही - मुमताज शकेब

भावार्थ - मला माहित आहे की, या ऊंच झाडाकडे देण्यासारखे काहीच नाही, त्यांच्याजवळ अगदी त्यांचीच सावली देखील नाही. ते दिसायलाच केवळ उंच आहेत. म्हणून मी त्यांच्यापासून चार हात लांब राहणेच पसंत करित असतो.

******

झाडे चहूकडे पण, छाया कुठेच नाही!
गर्दीत माणसांच्या माया कुठेच नाही!! - कर्दनकाळ

भावार्थ - सगळीकडे झाडेच झाडे आहेत पण सावली मात्र कुठेच नाही, त्याचप्रमाणे माणसांची खूप गर्दी दिसत असली तरी ते सर्वच्या सर्व प्रेमभाव/भूतदया विसरलेले आहेत.

******

यहॉ दरख्तोंके सायेमें धूप लगती है
चलो यहॉसे चले और उम्र-भरके लिए - दुष्यंत कुमार

भावार्थ - पहा किती कमाल आहे. येथे झाडाची सावलीच मला उन्हाचे चटके देत आहे. जेथे जावे लपायला, तोच बसतो कापायला. येथे आता थांबण्यात काहीच अर्थ नाही. कुणाच्या छत्रछायेखाली राहून सावलीच्या नावाखाली उन्हाच्या झळा सोसण्यापेक्षा आता आपणच स्वयंभूपणे आपला मार्ग आपणच निवडला पाहिजे. मग त्यासाठी आहे ती छत्रछाया कायमची झुगारून द्यायला हवी. आता निघायला हवे पण तात्पुरते नव्हे तर कायमचेच. आता आपल्या आयुष्याची माती होवो अथवा सोने, चिंताच नको. कठोर निर्धार करून आयुष्यभरासाठी येथून निघायलाच हवे.
*******

एक खुलासा करावासा वाटतो.............
प्रत्येक कवी आपल्या पिंडानुसार/वकुबानुसार/प्रज्ञेनुसार/प्रतिभेनुसार/प्रगल्भतेनुसार जीवनात आलेले प्रत्यय काव्यात मांडत असतो! कवीस आलेले अनुभव हे तुम्हाआम्हा सर्वांसारखेच असतात! पण त्याच्या प्रतिभेच्या व कल्पकतेच्या मुशीतून जेव्हा ते अनुभव काव्याच्या पातळीवर उतरतात, तेव्हा ते विश्वात्मक होतात!

मानवी अनुभव हे थोड्याफार फरकाने सारखेच असतात! कवीचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, मानसिक स्तरावर तो प्रत्येक प्रत्यय कसा घेतो हे कवीनिहाय वेगळे असू शकते आणि म्हणूनच प्रत्येकाची अभिव्यक्त होण्याची शैली वेगवेगळी असते!

वरील धाग्यात दिलेले शेर मिसरा टकरानासाठी दिलेले नाहीत!
भावभूमी, प्रतिमेची भूमी एकच असून विविध काव्य विविध कवी कसे निर्माण करतात हे दाखविण्याचा हेतू आहे! इथे भावार्थाचा शब्दश: अर्थ घेऊ नये! साथ साथ दिलेल्या शेरांचा अर्थ जवळ जवळ सारखा आहे असा समज नसावा! उलट प्रतिमा तीच असून वेगळे वेगळे आशय कसे काव्याच्या पातळीवर उतरतात हे लक्षात यावे यासाठी वरील धाग्याचा प्रपंच!

काही वेळा एकाच प्रतिमेवर आधारीत पण आशय भिन्न असे असतानाही दोन्ही/तिन्ही शेर इतके सुंदर असतात की, कोणता शेर अधिक सुंदर हे सांगणे कठीण जावे! कारण प्रत्येक शेर हा त्याच्या जागी सुंदर व अलौकिक असतो, प्रामाणिक असतो!

शेरातील सर्वच्या सर्व प्रतिमा हुबेहूब जुळणा-या आहेत असेही वरील शेरांत नाही! एखादी प्रतिमा सामाइक असेल वा अनेक प्रतिमा सारख्या असतील, तरीही अभिव्यक्त झालेला काव्यात्मक आशय हा भिन्न पण तितकाच सुंदर असतो!

एका शेरात कवी अनेक प्रतिमांची कलात्मक गुंफण करतो व आपल्या अंतरंगातील काव्य शेर नामक कलाकृतीत
साकार करत असतो! इथे दिलेले्या वरील प्रत्येक शेरांच्या संचात फक्त एका वा काही प्रतिमांचे साधर्म्य आहे! पण प्रतिमांची गुंफण, अभिव्यक्तीची शैली, कलात्मकता ही शायरागणिक वेगळी आहे! हेच अधोरेखित करण्यासाठी आम्ही १० शेरांचे संच या धाग्यावर प्रकाशित केले! शेरावरून शायराच्या चिंतनाची चव/खोली/प्रत/व्यक्तित्वाचा युनिकनेस इत्यादी गोष्टी ध्यानात येतात!

खयाल टकराना ही गोष्ट अतिशय वेगळी व स्थल-काल-व्यक्तिनिरपेक्ष आहे! इथे योगायोगाने एखादा मिसरा जवळ जवळ सारखाच आल्यसारखा वाटतो वा शेरातील एकंदर मथितार्थ, शब्द, प्रतिमा इत्यादी अगदी सारख्याच असतात! चुकून असे होऊ शकते, कधी कधी, पण ही गोष्ट एकसारखी होत नसते!

असे साधर्म्य जर कदाचित आले असेल तर तो एक मानवी योगायोग म्हणता येईल!
कृपया वरील धाग्यावरील शेरांच्या संचांकडे वर उहापोह केलेल्या दृष्टीकोनातून पहावे!
******************कर्दनकाळ

उदाहरणादाखल आपण आपले शेर दिले नसतेत तर बरे झाले असते प्रोफेसर.

नॉर्मल शायर स्वत:च स्वतःचे शेर अशा धाग्याकरीता देत नसावेत.

नॉर्मल शायर स्वत:च स्वतःचे शेर अशा धाग्याकरीता देत नसावेत.

<<<

नॉर्मल शायर अशीही एक कॅटेगरी असते का?

क्षमस्व!
हा रिवाज माहीत नव्हता!
आम्ही आपले भाबडेपणाने ते टाकले!
झालेल्या क्लेशांबद्दल पुन:श्च क्षमस्व!
पुढील वेळी आवर्जून काळजी घेऊ!

नॉर्मल हा अ‍ॅबनॉर्मलचा विरूद्धार्थी शब्द गृहीत धरावात.<<<

मी तसाच गृहीत धरायचो, हल्लीच वाटू लागले होते की अ‍ॅबनॉर्मलच्या विरुद्ध काही नसतेच, सगळे अ‍ॅबनॉर्मलच असते.

म्हणजे मांडण्याचा मुद्दा असा की, स्वतःच्या रचनांकडे तितक्याशा त्रयस्थपणे कुठल्याच निर्मात्याला बघता येणे शक्य होत नसावे.

नॉर्मल शायर <<<<<<<

Lol

देवसर अ‍ॅब्नॉर्मल आहेत असा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतोय या वाक्याचा !!!!

आधी सविस्तर शीर्षक मग सविस्तर शेर व खालील देवसरांचा सविस्तर प्रतिसाद !!
.......एकूणच काहीतरी विसंगती असल्याचे जाणवतेय

हा धागा जरासा गंडलाय असेच वाटू लागलेय
.... थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईलसे वाटते !!
______________________________________
भोआकफ<<<????????

तुमचा भाबडेपणा गेला तर बरेच प्रश्न सुटतील<<<<<<<<<<<

भाभडेपणामुळेही बरेच प्रश्न निर्माण होतात, हा नवीच संकल्पना वाटली!
आम्ही वेगळेच समजायचो की, जहांबाजपणामुळे प्रश्न निर्माण होतात!
असो!
आमचे शेर वाचलेत तर आम्ही किती भाबडे/जहांबाज आहोत ते कळावे!

वैवकु, भोआकफ म्हणजे भोगा आपल्या कर्माची फळे! हे उत्तर मी लगेच देण्याचे कारण असे आहे की ते उत्तर मिळाले की तुम्ही सतरांदा हाच प्रतिसाद संपादीत करत बसायचा नाहीत.

मी तसाच गृहीत धरायचो, हल्लीच वाटू लागले होते की अ‍ॅबनॉर्मलच्या विरुद्ध काही नसतेच, सगळे अ‍ॅबनॉर्मलच असते.>>>

क्या बात!!

बेफि Rofl

अरे रे खरेच की आता काय आलिया भोगासी असावे सादर Sad

वर बघा सुरुवात झालेली आहेच.............
मी म्हटले नव्हते थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल असे??

(मला कधी कधी वाचासिद्धी प्राप्त आहे की काय असे वाटते !! किंवा विठ्ठलाचे शेरच्याशेर केल्याने जीभही काळी झालीय की काय असे वाटते Sad )

_____________________
भो आकफ चा लाँग फॉर्म आवडला Happy

नॉर्मल हा अ‍ॅबनॉर्मलचा विरूद्धार्थी शब्द गृहीत धरावात.<<<<<<<<<<<
कोणताच शायर/कवी/कलाकार हा नॉर्मल नसतो! म्हणूनच तो कलाकृती निर्माण करतो!
नॉर्मल माणसे त्यांच्या प्रत्ययांची कलाकृती करत नसतात!
अवांतर: विजयराव,above normal, below normal,super normal यांचे काय?

above normal, below normal,super normal यांचे काय?<<<

यांचे कुठे काय? यांनी कुठे काय धागे काढले आहेत?

प्रत्येक कलाकार हा जरा imbalancedच असतो normalमाणसांच्या तुलनेत म्हणून त्याच्या हातून विश्वात्मक कलाकृती निर्माण होतात!
*************इति कर्दनकाळ
टीप: वरील विधान भाबडेपणाने केलेले नाही!

धागे काढले आहेत?<<<<
Lol

त्यांनी काय धागे काढलेत माहीत नाही पण या धाग्याची चांगलीच पिसे निघताय्त !!:हाहा:

यांचे कुठे काय? यांनी कुठे काय धागे काढले आहेत?<<<<<<<<<<<
धागा काढण्याशी वरील शब्दांचे काहीच नाते नसावे!

प्रत्येक कलाकार हा जरा imbalancedच असतो normalमाणसांच्या तुलनेत म्हणून त्याच्या हातून विश्वात्मक कलाकृती निर्माण होतात!

<<<<<<<<
सहमत

imbalanced या शब्दाचा वापर सुयोग्य व चपखल!!

Pages