खर सांगू ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 May, 2013 - 02:41

खर सांगू ?
एकवार बोलायचय मनातल...
लख्ख चांदण्यांशी...
विचारायचय त्यांना
प्रत्यक्षातही इतकच विलोभनीय असत का हे लखलखणं?
.
.
.
कि दूरून डोंगर साजरे ?

नजरेतल्या टप्प्यातील चंद्र
खुणावतो वारंवार !
अंतर मिटवायचय त्याच्या- माझ्यातल
हो!
पण माझ्या परीघात राहून.
.
.
.
कि सा-या कक्षा भेदून?

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"हो!
पण माझ्या परीघात राहून.
कि सा-या कक्षा भेदून?" >>>> विचार करण्यास भाग पाडणार्‍या ओळी... छान कविता.

मस्त

एंड समजला नाही
शन्द समजले पण भावना समजल्या नाहीत (नक्की काय म्हणायचे आहे असा प्रश्न पडला )

शिवाय अशी एकदमच लगेचच आल्यासारखा ....पहिल्या कडाव्यातल्या प्रस्तावनेशी जराशी व चट्कन /अचानकच असंगत असा जाणवला

माला वाटले मधे जरा योग्य वळणे घेत कविता जराशी लांबवायला हवी होतीत

वैयक्तिक मते आहेत ...सुचवणी/ विनंती /आग्रह काहीही...काहीही नाही... गैरसमज नसावा Happy

कविता चांगली.

प्रश्न गहन आहे. कविता उत्तर देऊ शकणार नाही.
उत्तर आणि मार्ग निवडण्याचे कवितेने वाचकावर सोपवले, हे बरे केले.

थोडक्यत गोड.आवडली कविता..!