Submitted by के अंजली on 2 May, 2013 - 10:10
त्यांनाच ऐकू येतात फक्त..
झाडांचे श्वास..निश्वास..
कोवळ्या तरुण फांद्यांची सळसळ..
हिरवेगर्द भरलेपण..
हळवसं जुनं जाणतं खोड..
आणि त्याचं भारावलेपण..
त्यांनाच ऐकू येतो फक्त..
धारदार पात्याच्या कत्तलीनंतरचा
मूक आक्रोश....
कोवळ्या बाळपालवीचा टाहो..
पानगळीचे रुदन..
ज्यांना असतात ग्रीन फिंगर्स..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरं आहे अंजली. छान लिहिलंस.
खरं आहे अंजली. छान लिहिलंस. अशी माणसं रस्त्यातून जातानाही झाडांची ख्यालीखुशाली घेत जातात !
कविता आवडली.
कविता आवडली.
मस्त...
मस्त...
थोडक्यात छान आशय मांडलाय.
थोडक्यात छान आशय मांडलाय.
(No subject)
किती सुंदर लिहिलेत हो. मला
किती सुंदर लिहिलेत हो. मला माझ्या बाबांची आठवण झाली. त्यांच्या हातातही अशीच हिरवी जादू आहे.
"ज्यांची हृदये झाडांची असतात त्यांनाच फुले येतात' अशा अर्थाच्या पाडगावकरांच्या ओळीही आठवल्या.
आवडलीच होती पण आत्ता समजली
आवडलीच होती पण आत्ता समजली म्हणून प्रतिसाद देत आहे
भारतीताईंचे आभार त्यांच्या प्रतिसादामुळे समजली
छान, आहे करून वंदन फूल
छान, आहे
करून वंदन फूल न्याहाळावे
हळूच मग हाताळावे
असेच असतात ना ग्रीन फिंगर्स?
कविता आवडली!!
कविता आवडली!!
वा!
वा!
मस्त आहे कविता, आवडली.
मस्त आहे कविता, आवडली.
आ हा - किती गोड लिहिलंस ....
आ हा - किती गोड लिहिलंस ....
आभार सर्वांचे
आभार सर्वांचे
सुरेख गुंफन. आवडली कविता.
सुरेख गुंफन. आवडली कविता.
<< कोवळ्या तरुण फांद्यांची
<< कोवळ्या तरुण फांद्यांची सळसळ.. हिरवेगर्द भरलेपण.. >> मस्त वाटले.
अतिशयच सुंदर !
अतिशयच सुंदर !
धन्यवाद!
धन्यवाद!
कविता अतिशय आवडली.
कविता अतिशय आवडली.