ग्रीन फिंगर्स..

Submitted by के अंजली on 2 May, 2013 - 10:10

त्यांनाच ऐकू येतात फक्त..
झाडांचे श्वास..निश्वास..

कोवळ्या तरुण फांद्यांची सळसळ..
हिरवेगर्द भरलेपण..

हळवसं जुनं जाणतं खोड..
आणि त्याचं भारावलेपण..

त्यांनाच ऐकू येतो फक्त..
धारदार पात्याच्या कत्तलीनंतरचा
मूक आक्रोश....
कोवळ्या बाळपालवीचा टाहो..
पानगळीचे रुदन..

ज्यांना असतात ग्रीन फिंगर्स..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सुंदर लिहिलेत हो. मला माझ्या बाबांची आठवण झाली. त्यांच्या हातातही अशीच हिरवी जादू आहे.
"ज्यांची हृदये झाडांची असतात त्यांनाच फुले येतात' अशा अर्थाच्या पाडगावकरांच्या ओळीही आठवल्या.

आवडलीच होती पण आत्ता समजली म्हणून प्रतिसाद देत आहे

भारतीताईंचे आभार त्यांच्या प्रतिसादामुळे समजली Happy

छान, आहे
करून वंदन फूल न्याहाळावे
हळूच मग हाताळावे
असेच असतात ना ग्रीन फिंगर्स?

वा!