आंबोळ्या

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 May, 2013 - 08:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदुळ १० वाट्या
मुगडाळ, तुरडाळ, मसुरडाळ, चणाडाळ, उडीदडाळ प्रत्येकी १ वाटी, पाव वाटी मेथी दाणे.

मिठ
ताक
तेल

क्रमवार पाककृती: 

आंबोळ्यांचे पिठ बनवण्यासाठी तांदूळ व सगळ्या डाळी एकत्र धुवाव्यत व उन्हात वाळवाव्यात. वाळलेल्या डाळीत मेथीदाणे घालून पिठ दळून आणावे.

आंबोळ्या करायच्या ५-६ तास आधी पिठ पाण्याने जाडसर भिजवायचे. ५-६ तासांनंतर करताना त्यात थोडे ताक घालून सैलसर करायचे व चवीनुसार मिठ घालायचे.


नंतर तव्यात जरासे तेल पसरवून त्यावर आंबोळीचे पिठ पसरायचे.

आता तव्यावर लगेच झाकण द्यायचे.

२ मिनिटांत चर्रर्र आवाज होतो मग झाकण काढायचे आणि आंबोळी उलटी करुन १-२ मिनिटे ठेवायची.

नंतर गरमा गरम आंबोळी चटणी बरोबर सर्व्ह करायची.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ संपतातच.
अधिक टिपा: 

काही जण घावण, आंबोळी उलटत नाहीत. पण मी उलटते कारण त्यामुळे कुरकुरीत होतात.
पाककृती हवी आहे माहीत आहे का ह्या धाग्याच्या ८२ व्या पानावर अजुन वेगवेगळ्या टिप्स मुग्धा, मंजूडी आणि सुचारीता यांनी दिलेल्या आहेत. http://www.maayboli.com/node/24273?page=81

माहितीचा स्रोत: 
पाककृती हवी आहे माहीत आहे का ह्या धाग्यावर मुग्धा, मंजूडी, सुचारिता व जुन्या मायबोलीवरील सोनचाफा यांच्या मदतीने ही रेसिपी मिळाली
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो. आंबोळ्याम्चे पीठ घरी कायम असणे हा केव्हढा आधार असतो घाईगडबडीच्या दिनक्रमांमधे. मी दळून आणताना यात मेथ्या आणि जिरेही घालते. किलोच्या प्रमाणात एक किलो जाड्या तांदळाला बाकीच्या डाळी प्रत्येकी शंभर ग्रॅम.

जागू, मस्त दिसताहेत आंबोळ्या!
मस्त जाळी पडली आहे. चुरचुरीत झाल्यात हे कळतंच आहे.
अगदी लगेच लोण्याचा गोळा घालून खायलाच घ्याव्यात असं वाटलं. Happy

हे पीठ ५-६ तास भिजवून नाही ठेवलं तरी चालतं. भिजवून लगेच आंबोळ्या घातल्या तरी चालतात. मी यात कधी जिरं-मिरची वाटून घालते, कधी हळद-लाल तिखट-ओवा घालते, कधी कांदा-टोमॅटो घालून टोमॅटो आम्लेटही करते, ओली लसूण मिळाली तर ती पातीसकट बारीक चिरून घालते, मेथी / पालकपैकी घरात असेल ते बारीक चिरून घालते, वाळूतली मेथी मिळाली तर ती पण घालते कधी कधी.

काहीही घाला, आंबोळ्या चविष्ट होणारच. शर्मिला म्हणते ते खरं आहे, हे पीठ घरात असलं की फार मोठा आधार वाटतो.

अहाहा!! अतिशय आवडता प्रकार, नारळाच्या गोड चटणीसोबत अप्रतिम लागतो.
मला रेसीपी माहीत नव्हती.
धन्स जागूडे Happy
मी मुंबईला आले की आणेन तुझ्यासाठी लोणचं Happy

अप्रतिम दिस्ताहेत.

प्रज्ञा९ ने दिलेल्या साधारण अशाच रेसिपीनं आंबोळ्या करून बघितल्या होत्या. उन्हात वाळवणं जमलं नसल्यामुळे १८० डिग्रीज फॅ.वर भाजल्या. पण कोरडं पीठ फारवेळ ठेवता आलं नाही.

आंबोळ्या प्रचंड आवडतात....

मस्त जाळीदार झाल्यात तुझ्या आंबोळ्या Happy

आईच्या हातच्या आंबोळ्यांची आठवण झाली....

मस्तच फोटो जागू.

आम्ही आंबोळ्यात फक्त तांदूळ आणि उडीद च घालतो आणि त्या थोड्या जाड्सर असतात. चहा बरोबर खायला पण आवडतात.

आमच्या ओळखीतल्या एक आजी मला नेहमी आंबोळ्यांचे कोरडे पीठ बांधून द्यायच्या इथे येताना. आजी गेल्यापासून पुन्हा करणं झालंच नाही. आता ह्या पद्धतीने करून बघेन.

मस्त दिसतायत. ह्याला आंबोळ्या म्हणायचं की धिरडी? मला वाटलेलं आंबोळ्या म्हणजे गोड नारळाच्या दुधाशी खातात.
मृ, इकडे सगळ्या डाळी वाळवून मिक्सरलाच पीठ केलंस का?

आम्च्याकडे(कोल्हापूर आणि परीसर, विशेषतः राधानगरी, भुदरगड, कागल तालुके) 'हावळा' ही एक तांदळाची जात आहे त्याच्या आंबोळ्या करताना ताक, खूप वेळ भिजत ठेवणे वगैरे गोष्टी अजिबात कराव्या लागत नाहीत. शिवाय ह्या निव्वळ तांदळाच्या आंबोळ्या होतात.

जागूची रेसिपी नेहमीप्रमाणे हीटच!

सायो गोड नारळाच्या दुधाशी खातात ते घावणे. त्याला रस घावणे म्हणतात.
नॉनव्हेज पदार्थाबरोबर आंबोळ्या करतात त्या जरा जाडसर असतात. आंबोळ्या बरोबर कॉम्बीनेशन म्हणजे आंबोळ्या -चटणी, आंबोळ्या -चिकन/ मटण रस्सा, आंबोळ्या- काळ्या वाटाण्याचे सांबार आणि गावी आंबोळ्या-चहा किंवा आंबोळ्या -चटणी.

>> मला वाटलेलं आंबोळ्या म्हणजे गोड नारळाच्या दुधाशी खातात.>> त्या खापरपोळी

आमच्याकडे आंबोळीला तांदळाबरोबर फक्त उडीद डाळ, मेथ्या, जीरे आणि थोडी बडिशेप असते.

>>मृ, इकडे सगळ्या डाळी वाळवून मिक्सरलाच पीठ केलंस का?
हो. निथळून घेतल्यावर फॅनखाली वाळवल्या. हाताला किंचित दमट लागायला लागल्यावर ओव्हनमधे टाकल्या. पण त्या बहुतेक आतपर्यंत खुटखुटीत वाळत नाहीत. बारिक करताना खूप वेळ लागला.

नॉनव्हेज पदार्थाबरोबर आंबोळ्या करतात त्या जरा जाडसर असतात >>> ह्या त्याच जरा खोलगट तव्यात करायच्या ना ? माझी एक केरळी मैत्रिण करते तशा.

हां ? अप्पम आणि आप्पे वेगवेगळे का ? (आता ह्या धाग्याचा श्रा घे होणार का ? ;))

अग्गं जागू, कसल्या देखण्या दिसताहेत तुझ्या या आंबोळ्या. मस्त रेसिपी. मी सध्या एक नवान्न आंबोळी पीठ आणलंय आयतं. त्याच्याही अशाच होतील अशी आशा! नाहीतर येईनच तुझ्या घरी! Proud

हो, आप्पे म्हणजे आप्पेपात्रात करतो ते. अप्पम म्हणजे खोलगट कढईत डोशासारखे पसरुन त्यात चटणी घालून खायचे. डोंबिवली इस्टला एका अप्पमवाल्याकडे भरपूर गर्दी असते.

मस्त रेसिपी .. फक्त ज्वारीच्या पीठाची पण करता येते .. बिडाच्याजाड तव्यावरची चव ही मस्त येते
मी सध्या ज्या भाज्या आहेत त्या घालुन करतेयं

Pages