आभाळात आले किती .... काळे काळे ढग

Submitted by पुरंदरे शशांक on 29 April, 2013 - 00:35

आभाळात आले किती .... काळे काळे ढग

आभाळात आले किती .... काळे काळे ढग
येना बाहेर लवकर आई ....बघ वर बघ

आरडाओरडा कित्ती यांचा .... गडाडगुडूम
वीज कशी मधूनच .....जाते सणाणून

वारे कसे घोंघावती .... आवाज करून
पाला पाचोळ्याने गेले .... आभाळ भरून

टपटप टपटप आले आई .... थेंब हे वरून
भिजू मस्त पावसात ..... गोल गोल फिरून

गाणे गाऊ पावसाचे ..... हात उंचावून
ये ना आई लगेच बाहेर .... काम दे सोडून

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गडाडगुडूम !!

मस्त आहे. तुमची बालगीतं छोट्यांबरोबरच मोठ्यांनाही आवडावीत अशी असतात. लहान मुलांना आवडेल असं लिहीणं हे अवघड आहे. मन घासूनपुसून पुन्हा निर्मळ करावं लागेल त्यासाठी Wink