घन उष्ण पिवळा (घनःशाम सुंदरा - विडंबन)

Submitted by दाद on 18 April, 2013 - 23:41

घन उष्ण पिवळा पीवळा
पडसोदय झाला
धरी लवकरी रुमाला, रुमाला
धरी लवकरी रुमाल नासिकातळी श्लेम आला॥

आणुनद्या लॉजिंजीस, ही बाटली
व्हिक्सची सरली
करी गार्गल मिठ-पाणी घेउनी
रेकी घसा शेकी
"गरम शेण लेपा" देती कुणी अचरटसा सल्ला.......॥१||

सायंकाळी एकेवेळी
खो-गो अवघे भक्षी
अरुणोदय होताच जळाची
गरम पिशवी कुक्षी
प्रभातकाळी उठुनी लावली
सुंठ निज वक्षी
करुनी सडा युकॅलिप्टस, झोपी.....
गुंडाळुन मफलरशी
शिंका, ताप, पडसे, ..... बरा हा होईल कधी खोकला?.......॥२||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

Lol

सायंकाळी एकेवेळी
खो-गो अवघे भक्षी
अरुणोदय होताच जळाची
गरम पिशवी कुक्षी
प्रभातकाळी उठुनी लावली
सुंठ निज वक्षी
करुनी सडा युकॅलिप्टस, झोपी.....
>>> हे झक्कास जमलंय. Proud

भारी विडंबन!
दादच्या पाटोपाठ लाजो, मामी सुटल्यात!
शेंबडन काय, खोकाळी काय!
ओक्के दाद................गेट वेल सून!(तीच ती .......हसून दात काढणारी बाहुली!)

>>>करी गार्गल मिठ-पाणी घेउनी
रेकी घसा शेकी
करी गुळण्या मिठ-पाणी घेऊनी
शेकी घसा शेकी....हे कसं वाटतंय?

चालीत म्हणतांना एकदोन ठिकाणी थोडं गडबडायला होतंय..पण तबलापटू दादने हे विडंबन केलंय त्याअर्थी ते विचारपूर्वकच केलेलं असणार ही देखील खात्री आहेच.

(लॉजिंजीस आणि युकॅलिप्टस हे दोन शब्द चालीत बसवतांना माझी थोडी अडचण होतेय.)

विडंबन आवडलं.

धन्यवाद. खोकाळी.. शेंबडन...
नाही.. मला सर्दी झालेली नाही... आणि हे खूप जुनै. टाकलं होतं का नाही आठवत नाही... म्हटलं टाकूया. फारतर शिव्या बसतिल Happy

प्रमोददा, झक्कं बसतय चालीत... म्हणून दाखवेन कधीतरी Happy

इथे खोका खोकी चाले म्हणून
मास्क तोंडाला मी आलो लावुन
फुरफुरणा-या संगीता वरून
कविता ऐकवीन नेम धरून

चाल : तुझे देखा तो ये जाना सनम
कवीपासून पडसे सर्दीवालेही दूर राहतात. Proud

Rofl

मजेदार आहे.
शेवटचं कडवं विशेष.

याला 'अमर खोकाळी' नाव द्या. >>>> आयडिया छानच आहे मामी.
’अमर शिंकाळी’ असं नाव माझ्या मनात आलं होतं पण शिंकांचा उल्लेख नसल्याने ’खोकाळी’ अधिक योग्य वाटतं.

बाय द वे, इतकी सर्दी होऊन देखील शिंका का आल्या नाहीत ? शिंका येण्यात ’कुठे माशी शिंकली’ ?
याबद्दल गहन चर्चा घडणं आवश्यक आहे असं वाटतं...... तज्ञांना पाचारण करावे .... Wink

छान जमलंय !
( रच्याकने ही भूपाळी गाणारे आणि त्यावर अभिनय करणारे संगीत कोहीनूर पंडितराव नगरकर, माझ्या आत्याचे पति ! )

दाद, Rofl

सॉलिड हॉट अँड यलो.
दाद,
ऑनेस्टली, यक्स.
नाही पटलं मला. इट्स बोगस.. सॉरी.डझन्ट सूट युर इमेज.

सगळ्याच प्रतिसादांसाठी आभारी आहे.
इब्लिसा,
यक्स - पटलं.
पण... बोगस? का? आणि माझी इमेज?
काहीतरी गोंधळ आहे. मी विनोदी, विडंबन लिहिलं तर ते माझ्या इमेज(??)शी जुळत नाही म्हणून बोगस कसं काय होईल? विडंबनाचा विषय माझ्या नेहमीच्या विषयांना धरून नाही...... पण म्हणून तो बोगस कसा काय? मला ट्रीपला वगैरे फुल्ल टू धत्तिंग करताना कुणी बघितलय? ती माझी इमेज असेल का? का माझ्या इथल्य इमेजशी हटकून? का ते बोगस असेल?
हा... हे विडंबनच फसलय म्हटलं तर नक्की मानेन मी. पण हे लेखन बोगस कसं काय आहे?
मी मुळीच वाईट-बिईट वाटून घेत नाहीये.. मला त्या शब्दाचा अर्थच कळत नाहीये... ह्या कवितेच्या, माझ्या इमेजच्या वगैरेच्या संदर्भात Happy

Pages