Submitted by दाद on 18 April, 2013 - 23:41
घन उष्ण पिवळा पीवळा
पडसोदय झाला
धरी लवकरी रुमाला, रुमाला
धरी लवकरी रुमाल नासिकातळी श्लेम आला॥
आणुनद्या लॉजिंजीस, ही बाटली
व्हिक्सची सरली
करी गार्गल मिठ-पाणी घेउनी
रेकी घसा शेकी
"गरम शेण लेपा" देती कुणी अचरटसा सल्ला.......॥१||
सायंकाळी एकेवेळी
खो-गो अवघे भक्षी
अरुणोदय होताच जळाची
गरम पिशवी कुक्षी
प्रभातकाळी उठुनी लावली
सुंठ निज वक्षी
करुनी सडा युकॅलिप्टस, झोपी.....
गुंडाळुन मफलरशी
शिंका, ताप, पडसे, ..... बरा हा होईल कधी खोकला?.......॥२||
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सडा युकॅलिप्ट्स! शलाकातै, यु
सडा युकॅलिप्ट्स!
शलाकातै, यु टू?
.
.
सायंकाळी एकेवेळी खो-गो अवघे
सायंकाळी एकेवेळी
खो-गो अवघे भक्षी
अरुणोदय होताच जळाची
गरम पिशवी कुक्षी
प्रभातकाळी उठुनी लावली
सुंठ निज वक्षी
करुनी सडा युकॅलिप्टस, झोपी.....
>>> हे झक्कास जमलंय.
जबरी जमलय शेंबडन आयमिन विडंबन
जबरी जमलय शेंबडन आयमिन विडंबन
धरी लवकरी रुमाल नासिकातळी श्लेम आला॥<<< यक्क.....
बेक्कार हसलो. नेमकं हेच गीत
बेक्कार हसलो.
नेमकं हेच गीत विडंबलं जाईल असं कुणाच्याच ध्यानी मनी आलं नसतं
आणि ते पण... पडसं
याला 'अमर खोकाळी' नाव द्या.
याला 'अमर खोकाळी' नाव द्या.
सही आहे असही लिहिता तुम्ही...
सही आहे असही लिहिता तुम्ही... तुम्ही काय काय लिहिता???
भारी विडंबन! दादच्या
भारी विडंबन!
दादच्या पाटोपाठ लाजो, मामी सुटल्यात!
शेंबडन काय, खोकाळी काय!
ओक्के दाद................गेट वेल सून!(तीच ती .......हसून दात काढणारी बाहुली!)
आता तुला काय झाल? हो सर्दी
आता तुला काय झाल? हो सर्दी पडसं... तुला लवकर आराम पडो
>>>करी गार्गल मिठ-पाणी
>>>करी गार्गल मिठ-पाणी घेउनी
रेकी घसा शेकी
करी गुळण्या मिठ-पाणी घेऊनी
शेकी घसा शेकी....हे कसं वाटतंय?
चालीत म्हणतांना एकदोन ठिकाणी थोडं गडबडायला होतंय..पण तबलापटू दादने हे विडंबन केलंय त्याअर्थी ते विचारपूर्वकच केलेलं असणार ही देखील खात्री आहेच.
(लॉजिंजीस आणि युकॅलिप्टस हे दोन शब्द चालीत बसवतांना माझी थोडी अडचण होतेय.)
विडंबन आवडलं.
धन्यवाद. खोकाळी..
धन्यवाद. खोकाळी.. शेंबडन...
नाही.. मला सर्दी झालेली नाही... आणि हे खूप जुनै. टाकलं होतं का नाही आठवत नाही... म्हटलं टाकूया. फारतर शिव्या बसतिल
प्रमोददा, झक्कं बसतय चालीत... म्हणून दाखवेन कधीतरी
इथे खोका खोकी चाले
इथे खोका खोकी चाले म्हणून
मास्क तोंडाला मी आलो लावुन
फुरफुरणा-या संगीता वरून
कविता ऐकवीन नेम धरून
चाल : तुझे देखा तो ये जाना सनम
कवीपासून पडसे सर्दीवालेही दूर राहतात.
(No subject)
मस्त जमलीये दाद, ऑडीओ पण
मस्त जमलीये
दाद, ऑडीओ पण येवु दे
मजेदार आहे. शेवटचं कडवं
मजेदार आहे.
शेवटचं कडवं विशेष.
याला 'अमर खोकाळी' नाव द्या. >>>> आयडिया छानच आहे मामी.
’अमर शिंकाळी’ असं नाव माझ्या मनात आलं होतं पण शिंकांचा उल्लेख नसल्याने ’खोकाळी’ अधिक योग्य वाटतं.
बाय द वे, इतकी सर्दी होऊन देखील शिंका का आल्या नाहीत ? शिंका येण्यात ’कुठे माशी शिंकली’ ?
याबद्दल गहन चर्चा घडणं आवश्यक आहे असं वाटतं...... तज्ञांना पाचारण करावे ....
शिंका आलेत की भिडेसाहेब..अगदी
शिंका आलेत की भिडेसाहेब..अगदी शेवटच्या ओळीत.
दाद. खरंच येऊ दे तुझ्या आवाजात..मी ऐकायला उत्सुक आहे.
दाद, ऑडीओ पण येवु दे >>>
दाद, ऑडीओ पण येवु दे >>> अनुमोदन.
आवाज मात्र सर्दटलेलाच हवा.....
मस्त लिहिलय खरच काय काय
मस्त लिहिलय खरच काय काय लिहिता तुम्ही?? सही आहे. दुसरं कडवं जास्त आवडलं.
जुई, पांढर्यावर काळंच
जुई, पांढर्यावर काळंच बरेचदा...
झक्कास विडंबन. शेवटचं कडवं
झक्कास विडंबन.
शेवटचं कडवं भारीच.
ईईईईईईईईईईईईईईईईईई
ईईईईईईईईईईईईईईईईईई
(No subject)
(No subject)
छान जमलंय ! ( रच्याकने ही
छान जमलंय !
( रच्याकने ही भूपाळी गाणारे आणि त्यावर अभिनय करणारे संगीत कोहीनूर पंडितराव नगरकर, माझ्या आत्याचे पति ! )
दाद,
दाद,
सगळ्या ओळी चालीत फिट्ट
सगळ्या ओळी चालीत फिट्ट बसल्यात
ही रचना मूळ कवयित्री कु.
ही रचना मूळ कवयित्री कु. श्लेष्मा पडसे यांच्याकडून ढापलेली आहे.
सॉलिड हॉट अँड
सॉलिड हॉट अँड यलो.
दाद,
ऑनेस्टली, यक्स.
नाही पटलं मला. इट्स बोगस.. सॉरी.डझन्ट सूट युर इमेज.
सगळ्याच प्रतिसादांसाठी आभारी
सगळ्याच प्रतिसादांसाठी आभारी आहे.
इब्लिसा,
यक्स - पटलं.
पण... बोगस? का? आणि माझी इमेज?
काहीतरी गोंधळ आहे. मी विनोदी, विडंबन लिहिलं तर ते माझ्या इमेज(??)शी जुळत नाही म्हणून बोगस कसं काय होईल? विडंबनाचा विषय माझ्या नेहमीच्या विषयांना धरून नाही...... पण म्हणून तो बोगस कसा काय? मला ट्रीपला वगैरे फुल्ल टू धत्तिंग करताना कुणी बघितलय? ती माझी इमेज असेल का? का माझ्या इथल्य इमेजशी हटकून? का ते बोगस असेल?
हा... हे विडंबनच फसलय म्हटलं तर नक्की मानेन मी. पण हे लेखन बोगस कसं काय आहे?
मी मुळीच वाईट-बिईट वाटून घेत नाहीये.. मला त्या शब्दाचा अर्थच कळत नाहीये... ह्या कवितेच्या, माझ्या इमेजच्या वगैरेच्या संदर्भात
पडसोदय दूसरं कडवं झ्याक
पडसोदय
दूसरं कडवं झ्याक जमलयं.
Pages