भेटते ना भाकरी हाच कल इथे

Submitted by डॉ. बंडोपंत on 16 April, 2013 - 02:03

(गझल नसल्यास अप्रकाशीत करण्यात येईल) एकदम तुटून पडू नये

काल कोणीही नव्हते दल इथे
चालला आहे कशाचा खल इथे

जाउ द्या देशोधडीला देश हा
भेटते ना भाकरी हाच कल इथे

खोदला जेव्हा नदीला कालवा
साठले थोडे तरी हे जल इथे

क्लेश नौटंकी मुद्दे झाले अता
पेटवू या आगळी दंगल इथे

घाव केले या मनावर तू असे
होत आहे आज त्याची सल इथे

..बंड्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम तुटून पडू नये<<< Biggrin

काही वृत्तभंग आहेत. काही मिसरे स्वच्छ आणि छान आहेत. शुभेच्छा बंडोपंत!

खोदला जेव्हा नदीला कालवा
साठले थोडे तरी हे ज इथे<<< बहुतेक टायपो झाला आहे. हा शेर पूर्ण वृत्तात आहे.

पेटवू या आगळी दंगल इथे<<< मस्त ओळ!

घाव केले या मनावर तू असे
होत आहे आज त्याची सल इथे<<< हाही शेर पूर्ण वृत्तात आहे. (सल हा शब्द पुल्लिंगी असतो ना?)

जत...... टायपो
वृत्त हाताळणी ....अजून थोडीशी मेहनत हवीये
कल हा काफिया अर्थासाठी चपखल बसतो की कसे? ....वैयक्तिक शंका

बाकी मलातरी आवडली रचना थोड्याश्या तांत्रिक सुधारणेने गझल ठरू शकते

रिस्क घ्यायला आवडत असेल तर देवपूरकरांची मदत घेवू शकता Happy

_____________________________
सल हा शब्द पुल्लिंगी असतो ना?>>> मीही कन्फ्यूज्ड आहे नैतर कल ऐवजी सल हा काफिया वापरा असे मी म्हणणारच होतो ........

गझलेत होणारे बदल स्विकारले जातील.
कॄपया विपुत द्यावे.

रिस्क घ्यायला आवडत असेल तर देवपूरकरांची मदत घेवू शकता >> ते मनमिळावू आहेत. देतीलच

सर्वांचे मनःपूर्वक आभार !

विजयराव गझल कशी वाटली यावर बोलला नाही !

प्रयत्न प्रामाणिक वाटला. देशोधडीला ह्या शेरातला विचार आवडला.

गझल लिहीण्याची इच्छा निर्माण होणे हे संवेदनशील असण्याचे एक द्योतक आहे माझ्यामते.

अनेक शुभेच्छा!

विजयराव गझल कशी वाटली यावर बोलला नाही !
>>
बोलला नाही वदला म्हणायच!

विजयराव गझल कशी वाटली यावर वदला नाहीत ! अस म्हणायचं!
कसे होणार तुम्ही पट्ट शिष्य?? Proud

बाकी गझलेतलं काहीही कळत नाही ..
काही काही शेर चांगले वाटले.

तिलकधारी आला आहे.

विविध ओळी विविध वृत्तात हा अभिनव प्रयोग ठरावा. काही मिसरे अर्थवाही. अपेक्षा वाढल्या आहेत.

जाउ द्या देशोधडीला देश हा
भेटते ना भाकरी हाच कल इथे

देशोधडीला लागतात, जात नाहीत. एक शेर आठवला.

राहिले जे मानती बाराखडीला
लागले बाकी म्हणे देशोधडीला

तिलकधारी निघत आहे.

आभार सर्वांचे !

उगाच रिस्क नको, म्हणून संक्षिप्त प्रतिासाद दिला बंडोपंत!>> प्रतिसाद अवश्य द्या ! गझलेच्या ५ पट नको. (लोभ असावा)

रिया Lol