आजही

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 16 April, 2013 - 03:04

कायदा गुन्ह्यासवे जुंपणार आजही
काल वाकला तसा, मोडणार आजही

मारणार तोच अन्, तोच तारणारही
का पणास द्रौपदी, लागणार आजही

भरभरून सौख्य तू कैकदा दिले मला
जीर्ण पोतडी पुन्हा फाटणार आजही

वायदा करुन तू, तूच तोडणार तो
कायदा तुझा पुन्हा चालणार आजही

जाहला भल्याभल्या पुत्रमोह कालही
इंद्र कवचकुंडला मागणार आजही

जयश्री अंबासकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृत्त मस्त निवडलेत हाताळलेत
आशय-विषयही( एकंदर खयाल )आवडले

गायनानुकूलता हा तुमच्या गझलेत मला दिसून येणारा फार महत्त्वाचा गुण आहे तुम्हाला ते फार छान जमते

बेफिकीर, विजयजी, वैभव, उल्हासजी .......मनःपूर्वक धन्यवाद Happy

वैभव.... इतक्या बारकाईने तुम्ही गझल वाचता, लक्षात ठेवता आणि आवर्जून प्रतिसादातून ते सांगता........तुमचं खरंच कौतुक वाटतं Happy

खरं तर बेफिकीर, उल्हासजी सुद्धा असाच अभ्यासपूर्ण प्रतिसाद देतात. मला कधी असं करता येणार देव जाणे.

उत्तम खयाल...छान गझल.

मला वाचताना जाणवले,की तुम्ही ''चामर'' वृत्तात ही गझल करायला हवी होती. म्हणजे अधिक सहजता आली असती.

उदा. शेवटचा शेर..ज्यात दोन्ही मिसर्‍यात ''स'' अध्याहृत आहे.

जाहला भल्याभल्यां पुत्रमोह कालही
इंद्र कवचकुंडलां मागणार आजही

माझ्या सुचवणीबद्दल कृपया गैरसमज नसावा.

तिलकधारी आला आहे.

अभिव्यक्ती गुदमरल्यागत झाली आहे. विचारांमध्ये अभिनवता जाणवत आहे. खूप असा कोणताच शेर आवडला नाही आणि आवडलाच नाही असा एकही शेर नाही.

तिलकधारी निघत आहे.

अरविंद, अमेय, भारती, योग, डॉक्टर, तिलकधारी....... तहे दिल से शुक्रिया Happy

डॉक्टर...... अहो हक्काने सांगा, सुचवा...... गैरसमज अजिबात होणार नाही. तुम्हा लोकांमुळेच गझलप्रांतात खूप काही शिकायला मिळतंय.

शेवटल्या शेरात तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे..... !!

>>खूप असा कोणताच शेर आवडला नाही आणि आवडलाच नाही असा एकही शेर नाही

ही प्रतिक्रीयाच थोडी गुदमरल्यागत वाटते आहे Wink

मारणार तोच अन्, तोच तारणारही
का पणास द्रौपदी, लागणार आजही
.
वायदा करुन तू, तूच तोडणार तो
कायदा तुझा पुन्हा चालणार आजही

ज्वलंत शेर!

आवडली गझल. Happy

धन्यवाद Happy

भरभरुन सौख्य तू कैकदा दिले मला
जीर्ण पोतडी पुन्हा फाटणार आजही

हा शेर आवडला

( अवांतर : २-३ ठिकाणी "आजही" रदीफ पाहिली. काही दिवसांपूर्वी असेच २-३ ठिकाणी "कदाचित" दिसत होते. हा योगायोग आहे की तस्वीर तरही/संकेत तरही सारखा कुठला नवीन उपक्रम? असल्यास त्याची लिंक कुठे मिळेल ?)

मारणार तोच अन्, तोच तारणारही
का पणास द्रौपदी, लागणार आजही

भरभरुन सौख्य तू कैकदा दिले मला
जीर्ण पोतडी पुन्हा फाटणार आजही

व्वा ! आवडेश Happy

तिलकधारी परत आला आहे.

योग | 17 April, 2013 - 04:08
>>खूप असा कोणताच शेर आवडला नाही आणि आवडलाच नाही असा एकही शेर नाही पुढे एक पिवळे हास्य.

ही प्रतिक्रीयाच थोडी गुदमरल्यागत वाटते आहे

आजूबाजूला एखादे मांजर तर नाही ना हे बघायला बिळातून कसेबसे मुंडके बाहेर काढून पुन्हा बिचकून आत जाणार्‍या उंदराप्रमाणे पिंका टाकू नयेत. तिलकधारी दिलेल्या प्रतिसादाची जबाबदारी घेतो आणि त्याचे समर्थनीय स्पष्टीकरणही करू शकतो. तिलकधारी कार्य करतो.

तिलकधारी निघत आहे.

तहे दिल से शुक्रिया Happy
प्रसाद....... अरे फेसबुकवर "मराठी कविता समूह" नावाचा ग्रुप आहे. त्यात असे उपक्रम चालतात. तू जर तिथे असशील तर ग्रुप जॉईन कर म्हणजे तुला सुद्धा भाग घेता येईल Happy