वळचणीचा पाऊस

Submitted by सत्यजित on 11 April, 2013 - 04:49

सरींचा पडदा सारून तू आलीस
ती ही.. चिंब चिंब ओली
म्हंटलं पावसा.. तुझ्या शिवाय कोण भरणार
अशी जीवनानं झोळी

सारे पडाव पार करतं
पाणी टप.. टप... टप
जरा नजर वर नेता
कानात धप... धप... धप

हा पाऊस होता की
प्राजक्ताची प्रभात झड
इतकं कधीच झालं नव्हत
श्वास घेणंही अवघड

श्वास रोखता येतात पण
शहार्‍याच रान कस आवराव
मृदगंधाचा स्त्रोत सापडता
मन तरी कसं सावराव

वाटलं त्याच क्षणी ...लावावा
काय तो सोक्ष मोक्ष
पवसाच काय घ्या
काहीही करेल अपरोक्ष

वाटलं सरींचा जुडगा करुनं
त्याचा गुच्छ तुला द्यावा
तू घेतलस तर फुलं.. नाहीतर
त्यांचाही पाऊस व्हावा

पावसाच काय गं
तो पडेल तिथे ओल धरणार
पण हे पावसाच बीजं
मात्र आयुष्यभर तग धरणार...

-सत्यजित.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा ! ..... छान रोमॅंटिक कल्पना आणि कविता.
-------------------------------------------------------------------
काही टायपो असावेत असे जाणवले.
असल्यास कृपया ......

जुडका ..... जुडगा
ओलं ..... ओल
पावसाच बिजं ..... पावसाचं बीज

व्वा सत्यजीत. फारच तरल साधी सोपी सरळ सुंदर.

श्वास रोखता येतात पण
शहार्‍याच रान कसं आवरावं
मृदगंधाचा स्त्रोत सापडता
मन तरी कसं सावरावं

श्वास रोखता येतात पण
शहार्‍याच रान कसं आवरावं
मृदगंधाचा स्त्रोत सापडता
मन तरी कसं सावरावं

हे फारच अप्रतीम Happy लगे रहो. बहर मनोहर आहे.

भिडेकाका थॅंक्यू... तशीही माझ्या शुलेची बोंब आहे आणि त्यात झोपेत लिहीलेली कविता..

भिडे काका आणि सीएल तुमचा आशीर्वाद असाच मिळत रहावा... थॅंक्यू..