Submitted by मउ on 16 April, 2013 - 01:32
धुंध ही हवा, हवेमध्ये हवाहवासा गारवा,
या पहिल्या पावसात चिंब भिजण्यासाठी
वाट पाहतेय तुझी सखी
ये ना..... ये सत्वरी आणि
घेउया अंगावरी पावसाच्या सरी
त्याच रस्त्याच्या वळणावर,
आजही आहे उभी तुझी सखी
हाती धरुन एक छोटीशी छ्त्री
छत्री फक्त नावालाच कारण
तुझ्या सवेत भिजताना पाहु नये कोणी
पण तू येशील ना?
ये ना..... ये सत्वरी आणि
घेउया अंगावरी पावसाच्या सरी
दिवस गेले महिने गेले,
रात्र ही आता संपत आली
वाट पाहुनी नेत्र थकले
गात्रे ही सर्व शिथील झाली
तरीही तिन्ही सांजेला वळ्णावरती,
वाट पाहतेय सख्या तुझी सखी
ये ना..... ये सत्वरी आणि
घेउया अंगावरी पावसाच्या सरी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वां चांगल्या आहेत भावना
वां चांगल्या आहेत भावना
सुंदर... तरल... त्याच
सुंदर... तरल...
त्याच रस्त्याच्या वळणावर,
आजही आहे उभी तुझी सखी
हाती धरुन एक छोटीशी छ्त्री
छत्री फक्त नावालाच कारण
तुझ्या सवेत भिजताना पाहु नये कोणी
पण तू येशील ना? >>>>>>> खुप आवडल
आवडली कविता मउ
आवडली कविता मउ
खुपच सुंदर मौडे
खुपच सुंदर मौडे
पण आशय आवड्ला, आणखी चांगली
पण आशय आवड्ला,
आणखी चांगली होउ शकते
कीप इट अप
वाव... सहीच गं सखे!!! फक्कड
वाव... सहीच गं सखे!!! फक्कड जमलिये!!! आवडेश
भावना पोहोचल्या लिहीत रहा.
भावना पोहोचल्या
लिहीत रहा.
आवडली
आवडली
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार
छान लिहिली आहे. अजून लिहा.
छान लिहिली आहे. अजून लिहा.
भावना सुन्दर . पावसाच्या
भावना सुन्दर .
पावसाच्या सरींची कमालच असते
वाह!! निरागस कविता अगदी
वाह!! निरागस कविता
अगदी तुझ्यासारखी