मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रँड आजच माझ्या २ कलिग्स नी घेतलाय. फोन छान आहे पण जरा स्क्रीन रिझॉल्यूशन अजून चांगलं देता आलं असतं... लोअर रिझॉल्यूशन मुळे सगळे आयकॉन्स आणि टेक्स्ट जरा मोठं२ दिसतं...

व्हाया ब्लूटूथ टेथरिंग करता येईल. पण ते अ‍ॅक्चुअल हॉटस्पॉट नाही, म्हण्जे फोनचे डेटा कनेक्शन पीसीवर वापरता येईल; पण टॅब वा दुसर्‍या फोनवर सेम कनेक्शन शेअर नाही करता येणार...

याकरता वायफाय लागणारच नाही! तुमचा फोन ब्लूटूथ नी लॅपटॉप शी पेअर करा. नंतर लॅपटॉपच्या ब्लूटूथ सेंटिंगातून, कनेक्ट टू इंटरनेट / सिमिलर ऑप्शन निवडा.

ग्रँड आजच माझ्या २ कलिग्स नी घेतलाय. फोन छान आहे पण जरा स्क्रीन रिझॉल्यूशन अजून चांगलं देता आलं असतं... लोअर रिझॉल्यूशन मुळे सगळे आयकॉन्स आणि टेक्स्ट जरा मोठं२ दिसतं... scrolling pan kahi khup impressive nahiye Sad

त्यापेक्शा नोट१ वा एस२ ठीक राहील...

सॅमसंग गॅलेक्सी ऐस ड्युओस किंवा माय्क्रोमॅक्स ऐ ११६ कॅन्व्हास दोन्हीपैकी कोणता चांगला आहे मोबाईल.
कोणी दोन्हीपैकी वापरतय का ? असल्यास जरा फीडबॅक द्या ....

मायक्रोमॅक्स ए ११६ मिळतोय? त्याची किंमत वाढली तरी मिळायचे नाव नाहीये अजून. अगदी सुरुवातीला बुक केलेल्यांनाच मिळालाय फक्त.

A110 Canvas वर सुमारे २००० रुपये 'ऑन' सुरू आहे. छान फोन आहे, फक्त माबोवर मराठी टाईप करायला जीव खातो तो.

वर मी दिलेली लिंक कॅनव्हास, ग्रँड, व कॅनव्हास एचडी च्या तुलनेची लिंक आहे. किंमत अन फीचर्स चा हिशोब केला तर A110 Canvas सहज जिंकतो.

जर अ‍ॅन्ड्रॉईड ४ जेली बीन किंवा आईसक्रीम सँडविच फोन घेतला तर हिंदी किंवा मराठी भाषा चालते का?
यातही जेली बीन चांगले का? की आईसक्रीम सँडविच?

यात मुख्य म्हणजे एस एम एस मराठीतूनच दिसतात का?

माझ्या सध्याच्या सॅमसंग गॅलेक्सी W (GT-I8150T, २.३ जिंजर DULM 1) फोन मध्ये फक्त चौकोनच दिसतात.

जेलीबीन सॅमसंग एस २ वर चालते का?
की किमान सॅमसंग एस ३ घ्यायला हवा?

हिंदी किंवा मराठी सपोर्ट करणारा उत्तम फोन कोणता? (मायक्रोमॅक्स नको आहे. आणि सोनी झेपेरिया अजिबात नको आहे.)

एचटीसी, ब्लॅकबेरी किंवा सॅमसंग पैकी चालेल. नेमके कोणते मॉडेल मराठी हिंदीसाठी घ्यावे याची माहिती हवी आहे.

सर्वात आधी स्क्रिन चे रेझेल्युशन बघा........घेताना........एचडी म्हणुन घेतो आपण परंतु स्क्रिन रेझेल्युशन मधे मार बसतो..त्याच बरोबर रॅम आणि स्टोरेज सुध्दा बघा...कारण आपण अँड्रोईड फोन मधे जे काही अप्लिकेशन घेतो. त्यातले १०० पैकी ६० तरी फोन स्टोरेज मधेच असतात त्यांना आपण मेमरी स्टोरेज मधे पाठवु शकत नाही.. आणि जे जातात त्यातले १० एम बी असेल तर ३ एम बी तर फोन मधेच राहतात...
व्हॉट्सअप आणि स्कायपे सारखे अ‍ॅप्लिकेशन्स तर जस जसे चॅटींग आणि गृप वाढत जातो तस तसे त्यांची एमबी वाढत जाते..त्यामुळे असले अप्लिकेशन वापरायचे असतील तर जास्त रॅम आणि स्टोरेज असणारे फोन बघा...
.
.मगच घ्या...

कॅन्व्हास मधे १ जीबी रॅम आहे आणि १.७७ जीबी फोन स्टोरेज आहे परंतु त्यात ५०० पेक्शा जास्त एमबी चा तर जेलीबिन आहे..त्यामुळे १.२२ जीबी पेक्षा कमी जागा आपल्याला वापरता येते.. कॅन्व्हास चा रेझोल्युशन हा एचडी आहे तरी सुध्दा तुम्ही त्यात एचडी चित्रपट टाकला तर स्क्रिन वर हवा तो इफेक्ट देत नाही Sad

त्यापेक्षा सोनी चा आयओन हा छान आहे १२. मेगापिक्सल कॅमेरा
इंटर्नल मेमरी १३.५ जीबी
रॅम १ जिबी
प्रोसेसर १.५ ड्युअल कोर

२५०००/- येतो

उदयन काका,
स्पेक्स कंपेअर केलेत तसे किंमतीचे काय?
कॅनव्हासची किम्मत १० हजार ५०० रुपये आहे. २५ हजारच्या निम्म्यापेक्षा कमी. ४०% एक्झॅक्ट. १६ जीबीचे एसडी कार्ड केवढ्याला येते? स्टोरेज घ्या वाढवून हवे तितके.
*
५ इन्ची स्क्रीनवर कोणताही पिक्चर लावला तरी तो तितकाच इफेक्ट देतो. किती एचडी मूव्हीज विकत घेतो आपण? खरं तर एचडीचा अर्थ समजण्यासाठी ४०-५० इंचापेक्षा मोठ्या स्क्रीनवाले एलईडी टिव्ही हवेत Wink
*
१ जीबी पेक्षा जास्त रॅम लागते कशाला?
*
व्हॅल्यू फॉर मनी काही प्रकार असतो की नाही?
अन १०० अ‍ॅप्स? बापरे! यादी पोस्टा मला विपूत. बघू तरी कोणते नाहीयेत माझ्याकडे..
*
माझ्याकडे टॅब२ आहे, गॅलॅक्सी ३ आहे अन कॅनव्हासही आहे. जुना झाला म्हणून गॅलॅक्सीला किचनमधे टांगून ठेवलाय रेडिओ अन सीसी टीव्ही कॅम म्हणून. रोज वापरायला कॅनव्हास.

(अँड्रॉईड फोनचा क्यामेरा क्लोज सर्किट टीव्ही म्हणून वापरता येतो- बेबी कॅम. किंवा हापिसातून घरचे पहायला Wink एक फुकट अ‍ॅप आहे, डालो केले की झाले. मग वायफाय नेटवर्क असेल तर घरातल्या घरात/रेंज असेल तिथपर्यंत, किंवा आयपी फॉरवर्डिंग जमले तर वाट्टेल तिथून तो कॅमेरा वापरता येतो. जुन्या अँड्रॉईड फोनचा हा एक उत्तम उपयोग आहे.)
*
ता.क. कॅनव्हास एचडी : १५ हजारात क्वाड कोअर सीपीयू Wink

मायक्रोमॅक्स ए११६ कॅनव्हास एचडी काल खरेदी केला. क्वाडकोअर प्रोसेसरची अजून तरी प्रचिती चांगलीच आहे, पण अ‍ॅप्स टाकायचेत (दुकानदाराने टाकून दिलेले अ‍ॅप्स मी 'टाकून' दिले उगाच व्हायरस वगैरे चा धोका नको म्हणून.) व्हिडिओ रीजोल्यूशन कंपेरेटीव्हली चांगलंच आहे, पण माझा मित्र ज्याला आयफोन वापरायची सवय आहे, तो म्हणाला पिक्सेल्स फाटतात म्हणून. पण रात्रीचं थोडंफार असेलच ब्लर असं वाटलं. एरव्ही व्हिडिओज चांगले दिसतायेत, फोटोसुद्धा. हळुहळू सवय होईलच, पण इतने पैसे मे इतनाही मिलेगा असं म्हणून समाधान वाटून घेण्यापेक्षा चांगला आहे असं माझं मत Happy

तीन महीने झालेत. मायक्रोमॅक्स ए११० वापरतोय. काहिही त्रास नाही. दिवसभर व्हॉटसॅप टीव्टीव करायला लागल्यापासून बॅटरी ढेपाळत्येय. अर्धा एक तास मध्येच चार्ज केली तर नो प्रॉब.

स्पीड चांगला, स्क्रीन मोठा, सगळ्या चांगल्या गोष्टी एकत्रित. मराठी टायपायला काहीच प्रॉब्लेम नाही. अ‍ॅन्ड्रॉईड हिन्दी, मिन्ग्लिश आणि स्पर्श ह्या तीनही कीबोर्डस् चा चांगला अनुभव

भारतात ऑनलाईन मोबाईल घ्यायचा असेल तर कुठलि रिलायेबल वेबसाईट आहे का? मला खालिल वेबसाईट मिळाल्या, यातलि चांगलि कुठलि किंवा अजुन कुठलि माहिति असेल तर प्लिज सांगा.
www.flipkart.com
www.junglee.com
www.infibeam.com

मला CDMA फोन ऑनलाईन विकत घेउन आईला भारतात पाठवायचा आहे. तिचा फोन रोज बोलताना बंद पडतो,गेले २ महिने ती रोज म्हणते आहे मी आता जाऊन नविन फोन विकत घेउन येईन, मी नाहि घेतला तर अजुन २ महिने हेच होत राहिल म्हणुन मीच पाठवणार आहे आता.

टॅब वगैरे प्रकारांमधे मी बर्‍यापैकी अडाणी आहे.
लॅपटॉपचे ३ किलोचे धूड प्रवासात, शूटवर वागवणे शक्य नाहीये.
हाताळायला हलके आणि सोपे + माझ्या रिक्वायरमेंट + मोबाइल फोन असे प्रकरण मिळेल का? की फोन वेगळाच ठेवावा आणि नेटबुक घ्यावे?
माझ्या रिक्वायरमेंटस खालीलप्रमाणे
१. रेफरन्सचे फोटो मावायला हवेत, ते रेफर करायला स्क्रीनचा साइझ अगदीच पिल्लू असून उपयोगाचा नाही. (एकूण साधारण ७ जीबी व्हॉल्यूम आहे)
२. स्क्रिप्ट आणि कामाचे सर्व चार्टस रेफर करता यायला हवेत. म्हणजे यासाठीही स्क्रीनचा साइझ अगदीच पिल्लू असून उपयोगाचा नाही. (वर्ड किंवा एक्सेलमधे केलेले. बरहा किंवा श्री लिपीत केलेले टायपिंग दिसणार असेल तर फारच उत्तम)
३. कंटिन्युटीचे माझ्या डिपार्टमेंटसपुरते फोटो काढून ठेवायचे आहेत. त्यामुळे कॅमेरा ५ मे पि च्या वरचा हवा. त्या फोटोंचे वजन दर दिवशी वाढत जाईलच. म्हणजे तेवढी स्पेस असायला हवी.
४. मी बरेच ठिकाणी शिकवायला जाते तिथे पिपिटी प्रेझेंटेशन्स देते. एवढे यंत्र घेणार तर ती प्रेझेंटेशन्सही मावायला हवीत + प्रोजेक्टरला हे यंत्र जोडता यायला हवे.
५. इंटरनेट अर्थातच गरजेचे. लोकेशनवर असताना महत्वाचे इमेल्स बघणे पाठवणे यासाठी आणि विरंगुळा म्हणून कधीमधी फेबु, माबो यासाठीही.
६. थोडीफार गाणी बिणी भरून ठेवता आली तर मधे मधे विरंगुळा म्हणून बरे पडते.

प्रिया७, फ्लिपकार्टची सेवा उत्तम आहे. नवर्‍याने एक मोबाईल ऑनलाईन मागवला होता. चक्क दुसर्‍या दिवशी घरी आलापण मोबाईल.

नी, सॅमसंग चा गॅलेक्सी टॅब २ पहा. फोन + टॅब आहे. वायफाय + थ्रीजी/जिपीआरएस मिळेले... २०़ पर्यन्त. तू दिलेले सगळे पाँईंट्स कव्हर करेल हा पण ते प्रोजेक्टर वालं प्रकरण जरा कठीण वाटतय...

जर फोन + टॅब एकत्र नको असेल तर, आयपॅड आहेच... :p

इन्टेक्स नामक कंपनीचा टॅब आहे.
सिम, यूएसबी, एचडीएमआय आऊट इ. आहेत. त्यावर सगळे चालायला हवे. सॅमसंगला ९पिन आहे. त्रासदायक्प्रकार.

योगेश, आयपॅड वगैरे झेपणार नाही बा खिशाला.
मला एका मित्राने सॅ गॅ नोट २ सजेस्ट केलाय. त्याला कॅमेर्‍याला असते तसे छोटुसे यूएसबी पोर्ट आहे. प्रोजेक्टरला यूएसबी पोर्ट असेल तर त्यावरून प्रेझेंटेशन देता येतात. तो मित्र तरी तेच करतो. पण ते आत्ता मला जरा खर्चिक वाटतेय.

नाहीतर मग चांगला कॅमेरा असलेला फोन आणि लेनोव्होचे नेटबुक असे काहीतरी करायचे म्हणजे श्री लिपी पण वापरता येईल.

इन्टेक्सची लिंक मिळेल का?

नी, शोधून देतो लिंक. सुमारे ७ हजार रुपयांत बसतो तो टॅब. अजून ८-९०० रुपयांत एक कव्हर येते त्यात फिजिकल कीबोर्ड आहे. गुढीपाडव्याला एका मित्राला (त्याच्या खर्चाने) घेऊन दिला. (म्हणजे घे असे भरीस पाडले) मस्त आहे. अजून तरी मार मिळाला नाहीये.. पण नेट कनेक्टिविटि सीम वरून जरा त्रासदायक होतेय म्हणतोय. २जी ऐवजी ३जी प्लान घेतला तर जास्त मजा येईल. वाय्फाय वर मस्त चालतो, डाँगलवर देखिल.

हा चायनामेड आहे का? मला असाच एक प्रकार ३-४ च्या रेंजमधे मिळतोय असं कळलंय. तपशील अजून कळले नाहीयेत.

प्रोजेक्टरला कनेक्ट होतो का?
सिमवरून कनेक्टिव्हिटी हे कॉम्प्रोमाइझ करता येईल एक वेळ. रिलायन्सचं डाँगलच आहे प्रायमरी कनेक्शन म्हणून.

इब्लीस, नीधप
मला यातलं ज्ञान नाही. काही ट्राय केले. चायना मेड टॅब नेटला गंडतात. मधेच हँग होतात. जी कंपनी आकाश टॅब बनवते, तीच कमर्शियल वर्जन तीन दिवसांत देते. डेटाविंड असा सर्च दिला तर सापडेल. त्यांचं ७ सी + मॉडेल (फोन + टॅब) घेतलं. चांगलं चालतंय. नेट वगैरे मस्त आहे. स्पीड थोडासा कमी आहे.

प्रोजेक्टरला जोडण्यासाठी केबल मिळते त्याच्याबरोबर. पण स्क्रीन इतकी मोठी आहे कि मिनी कॉन्फरन्समधे त्याच्यावरच काम होतं.

ओके धन्स. सर्च करून बघते.

क्रीन इतकी मोठी आहे कि मिनी कॉन्फरन्समधे त्याच्यावरच काम होतं. <<
मला २५ जणांच्या वर्गाला शिकवायचं असतं. डिझाइनशी रिलेटेड विषय असल्याने मोठ्या स्क्रीनवरच बरे पडते. विद्यापीठात, फ्लेममधे प्रोजेक्टर्स/ मोठ्या स्क्रीनचे टिव्ही बरे पडतात.
फ्लेमचं राहूदे पण विद्यापीठांमधे नाटकाच्या विभागांच्यात खूप अद्ययावत टेक्नॉलॉजी नसते.

नाही मग तो टॅब दुकानात चक्क प्रोजेक्टरला लावून किमान दहा मिनिटे तरी चालवून पहायला हवा. मी फक्त दोन चार मिनिटे आणि ते ही पॉवरपॉईंट चेक केलं होतं.

नी, नोट २ आजच्या घडीला तरी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. मी हाच एक फॅब्लेट पाहिलाय ज्याची बॅट्री २ दिवस चालते अँड्रॉईड ओएस अस्तांनासुद्धा! पण मग किंमतही तशीच आहे... ३८,०००!

गाड्यांच्या सायटींवर आपल्याला हवी ती स्पेसिफिकेशन्स/ गरजा सिलेक्ट करून मग त्याप्रमाणे असलेल्या गाड्याच रिझल्टमधे समोर येतात असं जे असतं ते मोबाइल्स, टॆब्ज यांच्यात नसतं का?

नीरजा, मायक्रोमॅक्स कॅनवास एचडी बघ. 'प्रोजेक्टरला जोडणे' ही गरज सोडल्यास (मला त्याचा अजून अनुभव नाहीये) बाकी सगळ्या सुविधा त्यात आहेत. किंमत १५०००/- दुकानात १५५००/- मिळतो. १६ जीबीचे कार्ड, स्क्रीन गार्ड, कवर असे मिळून अजून ११००-१२००.

Quad core processor मुळे Office Suite सुसाट चालतो. हा Office Suite MS Office ला बर्‍यापैकी compatible आहे (थोडे formatting गंडते कधीकधी)

मी पण मोबाईल पाहून आलेय वीकेन्डला पण बर्‍यापैकी कन्फुजलेय. Sad
मला मायक्रोमॅक्स ए ११६ सजेस्ट केलाय अम्याने आणि दुकानदाराने आयबॉल अ‍ॅन्डी ४.५ असा काहीतरी... Uhoh पण मी फोनातले बेसिक फिचर्स सोडता काहिही वापरत नाही. (फोन/मेसेज्/गाणी) कॅमेरा पण अगदी क्वचितच.
मोबाईलातल्या नेट ला माझा बिग नो नो आहे. व्हॉट्सप वगैरे तर कोसो दूर. अशात मी मोबाईलपायी १५ हजार घालवणं योग्य आहे का? Uhoh
सध्या मी द्विधा मन:स्थितीत आहे. (कोतबो वर जाऊ का? :फिदी:)
जोक्स अपार्ट काय सुचवाल?

अशात मी मोबाईलपायी १५ हजार घालवणं योग्य आहे का? <<
एवढे? अजिबात घालवू नकोस.
तुला बोलणे, मेसेजिंग, गाणी आणि क्वचित कॅमेरा हवा असेल तर ५००० एवढेच बजेट ठेवलेस तरी उत्तम फोन्स मिळतील. नेट हा अ‍ॅडेड फायदा असेल कधी गरज पडली तर.

दक्षे, व्हॉट्स अ‍ॅप आणि नेट साठी १५ हजाराची अज्जाबात आवश्यकता नाही ते अगदी ५ हजारापासून पण आरामात मिळते. आयबॉल अज्जिबात घेऊ नकोस. कस्टमर केअर सर्विस बेक्कार आहे. जास्त कन्फूज होऊ नकोस मायक्रोमॅक्स घे चांगला आहे. Happy

Pages