Submitted by उद्दाम हसेन on 13 April, 2013 - 23:57
काल माझ्या दाराशी देव उभा होता
म्हणाला तिचा पत्ता आज इथला होता
गोंधळून म्हणालो ये, आत ये देवा
स्वप्नात देखील तिचा रस्ता इथला नव्हता
वाट चुकलास कि मग चुकलास चुकून
नास्तिकाच्या घरी तर देवही ठरतो खोटा
घाम पुसत तेव्हां देव सांगता झाला
माझाच माझ्यावर विश्वास उरला नव्हता
भक्तांनी लुटण्याचा धक्का बसला होता
तिच्या पत्त्याचा तर हा बहाणाच होता
नास्तिका रे तुझा हा खांदा उरला होता
मी ही हसलो, सोनचाफा घेऊन आलो
तिच्या श्रद्धेचा, जो अमर, परिमळ होता..
Kiran...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काहीही फेकू नकोस किरण! मी कधी
काहीही फेकू नकोस किरण! मी कधी आलो होतो तिकडे?
वेगळी!!!!!!! आवडली
वेगळी!!!!!!!
आवडली
छान.. वैभवशी सहमत.
छान.. वैभवशी सहमत.
घाम पुसत तेव्हां देव सांगता
घाम पुसत तेव्हां देव सांगता झाला
माझाच माझ्यावर विश्वास उरला नव्हता
भक्तांनी लुटण्याचा धक्का बसला होता
हे आवडलं.
आवडली
आवडली
भक्तांनी लुटण्याचा धक्का बसला
भक्तांनी लुटण्याचा धक्का बसला होता
तिच्या पत्त्याचा तर हा बहाणाच होता
नास्तिका रे तुझा हा खांदा उरला होता
आवड्ली.
संदीप खरेंची 'नास्तिक' आठवली..
देवकाका मस्तच..... छान आहे
देवकाका मस्तच.....
छान आहे कविता.... आवडली...
फारशी नाही अवडली... "किरण" टच
फारशी नाही अवडली...
"किरण" टच नाही जाणवला.. वै म गै न