कडूनिंबाष्टक-- चुर्ण

Submitted by प्रभा on 11 April, 2013 - 12:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

'' सर्व मायबोलीकरांना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा''
गुढीपाडव्याला कडूनिंब खातात. त्यानिमित्त कडूनिंबाचा एक प्रकार सुचवते. मी नेहमीच करते. पण हा प्रकार कुठल्या सदरात टाकावा- [आरोग्य कि पाककला] ते कळत नव्हत. म्हणून येथेच देते.
कडूनिंबाष्टक- चुर्ण
==============
हिंग, जिरे, मिरे, ओवा, सुंठ, आवळा चुर्ण,सैंधव मिठ, व कडूनिंब

क्रमवार पाककृती: 

साधारण अर्धी वाटी ओवा, पाव वाटी जिरे, अर्धा चमचा मिरे, अर्धा चमचा हिंग घेउन मिक्सर मधे बारीक करुन घ्याव. त्यात सुंठ पावडर अर्धा चमचा, आवळा पावडर अर्धा चमचा, सैंधव मिठ अर्धा चमचा व कडूनिंबाची पावडर एक चमचा घालुन मिक्सर मधे फिरवाव. चुर्ण तयार. प्रमाणात आवडीप्रमाणे बदल करता येइल. हे औषधी म्हणुनही उपयोगी आहे.
या दिवसात मी कडूनिंबाचा पाला वाळवुन [घरातच- उन्हात नाही] ठेवते. व त्याची पावडर करुन बरणीत भरुन ठेवते. जेव्हा लागेल तेव्हा यातील पावडर वापरते. आमच्या घरात आम्ही सगळेच हे चुर्ण खातो.
यामुळे पचनाचा ,उष्णतेचा त्रास होत नाही. रक्त शुद्ध होत. शरीर निरोगी रहात. कडू असल तरी चव
चांगली लागते . आवळा, सुंठ, जिरे , मिरे , हिग सैंधव ओवा, व कडूनिंब हे सगळेच औषधी गुणांनी परिपुर्ण आहेत. षड- रस ही मिळतात. मुखशुद्धी होते.
फोटोच तंत्र मला जमत नाही. कुणी सांगितल्यास प्रयत्न करेन.

वाढणी/प्रमाण: 
८-१० दिवस पुरत.
अधिक टिपा: 

तोंडाला चव येते. अनुभव घेतल्यावरच याचे महत्व कळेल.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोगातुन
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी आहे. एकदम चविष्ट लागत असणार. जिथे कडुनिंबाचा पाला मिळत नाही - अमेरिका - त्यांनी काय करावे. बाकीचे जिन्नस इथे मिळतात.

पुदिन्याचा पाला कदाचित चांगला लागेल.

जिथे कडुनिंबाचा पाला मिळत नाही - अमेरिका - त्यांनी काय करावे. >> !!! आ बैल मुझे मार कशासाठी? बिना कडूनिंब करावे Wink चवीला उलट चांगले लागेल, औषधी नाही होणार पण ठीकच आहे की...

इंडियन स्टोर मध्ये बैद्यनाथची नीम पावडर मिळते (सामान्यपणे) ती वापरावी.

धन्यवाद Happy
मला असाच प्रयोग विड्याचे पानाबाबत करुन बघायचा आहे. कुणाला काही कल्पना आहे का?
पूजेवरची विड्याचि पाने बरीच येतात, नुस्ती कोणच खात नाही, वाया जातात.

limbutimbu इथे विड्याची पाने वापरून मुखवासाची रेसिपी आहे,ती वापरून मुखवास छान होतो! मस्त लागतो!!!!

जिथे कडुनिंबाचा पाला मिळत नाही - अमेरिका - त्यांनी काय करावे. बाकीचे जिन्नस इथे मिळतात. पाठ्वु का कुरीयर्ने ? काय नियम आहेत ? फ्युमीगेशन नाहीना करावे लागत ?

यातील ओवा, जिरेमिरे , हे थोडॅ भाजुन घ्यावे. मी सामान आणल्यानंतर ह्या वस्तु भाजुनच ठेवते. म्हणून वेगळे लिहायला विसरले. बैद्यनाथ ची निम पावडर वापरली तरी चालेल. भारता बाहेर राहणार्यांना उष्णतेचा त्रासही नसतो न' त्यामुळॅ कडुनिंब वापरला नाही तरी चालेल. पाचक चुर्ण होइल. वात, कफ, पित्त याचा त्रास कमी होइल. दात दुखत असेल, किंवा हिरड्या ची सुज असेल तर त्य जागी हे चुर्ण दाबुन धराव. आराम पडतो.. मुखशुद्धी होतेच. असे हे अल्पमोली, बहुगुणी , संग्रही असलेल चांगल.
विड्याच्या पानाचा वेलही आमच्या कडे आहे. मला काष्टोषधीची व असे प्रयोग करुन पाहण्याची आवड आहे. त्यामुळे असे झाड मी बगिच्यात लावतेच. विड्या च्या पानाचा तांबुल करुन ठेवु शकता.फ्रीझ मधे किंवा बाहेरही राहू शकतो. मी तर बनवुन ठेवते

मी एकदाच केला होता धनवन्ती बेलाचा मुरब्बा. पिकलेल्या बेलफळा चा गर काढून पुरणाच्या यंत्रातुन गाळून घेतला होता. व साधारण त्या गरा एवढीच साखर घेउन शिजवल होत. घट्ट होइपर्यंत . आणखी वेगळी पद्धत असेल तर पहावी लागेल. त्यात थोडा आल्याचा रस, व लिंबाचा रस घातला होता थंड झाल्यावर. या प्रकाराने थोडा करुन पहा. कळवा कसा झाला?

आभारी आहे प्रभाताई ! नक्की करेन आणि सान्गेन. विकतच्या मुरम्बा मधे मोठे मोठे तुकडे असतात, छान लागतात ते . . . तसा करुन बघायचा आहे.. पुन्हा एकदा आभार !!

मिरे म्हणजे काळेमिरी? अर्धा चमचा जास्त उष्ण नाही का होणार? साधारण किती दाणॅ?

देशातून येताना क्डूनिंबाचा पाला सुकवून आणून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवल्यास टिकतो (एक फु.स.)

छान वाटतेय कृती Happy

उष्णतेचा त्रास होत असेल तर कमी घ्यावेत. बाकी प्रमाण पण आपल्या आवडी प्रमाणे व प्रक्रुती नुसार कमी जास्त घेता येत.. वोवा, जिरे, मिरे , दाताखाली आले कि चांगले लागतात. मी अर्धा चमचा मिरे पावडर घेते ओवा जास्त घेते. भाजल्या ओव्याची चव छान वाटते.

उष्णतेचा त्रास होत असेल तर कमी घ्यावेत. बाकी प्रमाण पण आपल्या आवडी प्रमाणे व प्रक्रुती नुसार कमी जास्त घेता येत.. वोवा, जिरे, मिरे , दाताखाली आले कि चांगले लागतात. मी अर्धा चमचा मिरे पावडर घेते ओवा जास्त घेते. भाजल्या ओव्याची चव छान वाटते.

धन्यवाद ,तुम्ही करुन पाहिल्या बद्दल.पाचक- चुर्ण, मुखशुद्धी म्हणूनहि वापरता येइल. संग्रही ठेवण्यासारखी आहे.ही चीज..माझ सगळ्यांनाच सांगण आहे कि ज्यांनी हे चुर्ण बनवल असेल त्यांनी क्रुपया प्रतिक्रिया द्याव्यात. [फायदे, तोटे, प्रमाण कमी-जास्त करायच झाल्यास]ंम्हणजे त्यात आवश्यक ते बदल केल्या जातील व जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होइल.