राजस्थानी भरली भेंडी

Submitted by वर्षू. on 11 April, 2013 - 23:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो कोवळ्या भेंड्या
भाजक्या जिर्‍याची पूड, शोपेची पूड, धन्याची पूड्,थोडं अमचूर
थोडा गरम मसाला ,हळद्,तिखट्,मीठ- अंदाजे आणी आवडीनुसार प्रमाण घेणे
फोडणी करता तेल
लहान चमचा कलौंजी
१ टेबल स्पून बेसन
लहान कांदे-२,३

क्रमवार पाककृती: 

१) सर्व मसाला ( कलौंजी + कांदे वगळून) नीट एकत्रित करून भेंड्यांमधे भरून घ्या. उरलेला मसाला बाजूला राहू द्या.
२) तेल गरम करून फोडणीत कलौंजी टाका.
वरून कांदे घालून जरा वेळ परतून बेसन घाला.. बेसन मंद आचेवर खरपूस गुलाबी रंगावर भाजा.
३) आता भेंड्या अ‍ॅड करा. उरलेला मसाला ही वरून टाका. कोरड्या वाटल्यास अजून तेल ही अ‍ॅड करा.
४) थोड्या परतून , मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा.
५) मधून मधून हलक्या हाताने परता..

गरम फुलक्यां बरोबर आणी कोशिंबीरी सोबत सर्व करा..

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांकरता
अधिक टिपा: 

हलक्या हाताने न परतल्यास अश्या दिसतील तुमच्याही भेंड्या Proud

माहितीचा स्रोत: 
संजीव कपूर
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा... कसली तोंपासु दिसत्येय तयार डिश!!!! Happy

ताजी भेंडी मिळाली तर नक्की करुन बघेन Happy

माधवी. कलौंजी म्हंजे कांद्याच्या बिया.. कोणत्याही ग्रोसरी शॉप मधे विचार.. Happy
हो, ही रेसिपी पाहिली तेंव्हाच वाटलं खूप टेस्टी लागेल..
खर्रच, खूप छान लागते...

वर्षू, तिथे चीन मध्ये बरे राजस्थानी भेंडी!

मी इथे राजस्थानात असून पण मला नाही मिळाली! Sad

मस्त रेसिपी, पण ते कलौजी काय?

अर्र.. कृष्णा.. कलौंजी नही पता??? ( आप को पी एस ओ पी नही पता च्या चालीवर वाचणे Lol )

कलौंजी म्हंजे कांद्याच्या बिया..

मस्त.

kalonji.jpgkalonji.jpg

माधवी, ही बघ कलौंजी- कांद्याच्या वाळक्या बिया .. गरम मसाल्याच्या विभागात सापडतील
बंगाली जेवण आणी त्यांची लोणची कलौंजी बिना अधुरी असतात.. Happy

थोडं बेसन परतुन घाल्ते मी, नाहीतर फार तेलकट वाटते.

ह्यात भरा भरी नको अस्ले तर भेंडीचे पातळ काप करुन तळुन घ्यावे,, आणि बाकी मसाला वरुन घालावा!

कंदा अन भेंडी बरोबरीने घेतल्यास "भेंडी दो प्याझा" Happy

वर्षु ऐन जेवणाच्या वेळेला कसले गं हे तोंपासु फोटो टाकतेस? Angry कुफेहेपा? Proud

मस्त अहे... एकदम... नेक्स्ट भारत वारीत माझ्या घरी करून दे मला... Lol

अजुन एक टीपः मी भेंडीचे बाईट साईज कट करते.. नाहीतर पोळीशी खतान भयानक वात्तड प्रकार होतो. तुटता तुटत नाही भेंडीचा तुकडा.

वॉव वर्षू मस्त रेस्पी!
मी पण अशीच करते. पण कलौंजी नाही वापरत. जनरल स्वयंपाकातच. पण आता मुद्दम आणीन!
आणि हो..............मुझे कलौंजी पता हय!

Pages